Apegaon (आपेगाव)

आपेगाव, ता. अंबड, जि. जालना

येथील 1 स्थान - गोदावरी नदीच्या पैल (उत्तरेकडील) काठावर विज्ञानेश्वराचे मंदीरात महादेवाचे लींग-पींड आहे, याला 2 अवतारांचा संबंध आहे.

जाण्याचा मार्ग :

पांचाळेश्वर च्या उत्तरेस 500 मीटर अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठी आपेगाव आहे.

स्थानाची माहिती :

1. विज्ञानेश्वरा विडा वाहणे स्थान :

आपेगावच्या पश्चिम विभागी गोदावरी नदीच्या उत्तर काठावर विज्ञानेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळात हे स्थान आहे. विज्ञानेश्वराचे लिंग नमस्कारी आहे. या लिंगास श्रीदत्तात्रेयप्रभू व सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या दोन अवतारांचा संबंध आहे.

लीळा : (1) पुरोहिताच्या विनंतीस मान देऊन श्रीदत्तात्रेयप्रभूनी या लिंगास तर्पण केले. (पांचाळेश्वर माहात्म्य, आत्मतीर्थावरील काव्य)

(2) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात साष्टी पिंपळगावहन आपेगावला आले. त्यांनी या लिंगास विडा अर्पण करून दोन्ही श्रीकरांनी लिंगास स्पर्श केला. (पू. ली. 532, स्था. पो.) त्यानंतर ते येथून बळेगावला गेले.

पंचाळेश्वर नरेश यांना विज्ञानेश्वर, आत्म, राजाळ आणि तेजाळ असी चार मुले होती. विज्ञानेश्वर हा कट्टर शिवभक्त.
एकवेळ पांचाळ नगरीवर कुंभ व निकुंभ नामक दानवांनी आक्रमण केले. पंचाळेश्वर जवळील राक्षसभुवन या ठिकाणी घनघोर युद्ध झाले. त्यामधे विज्ञानेश्वर हा घायाळ झाला. पांचाळ राजाला खुप वाईट या गोष्टीचे वाटले की, विज्ञानेश्वर देवता भक्ति करत होता, उर्वरीत तिनही मुले श्री दत्तात्रेय प्रभुची भक्ति करीत. तेंव्हा विज्ञानेश्वराला परमेश्वर व्हावा ही वडीलांची मन:पूर्वक इच्छा.
राजाने आपली इच्छा विज्ञानेश्वरांचे गुरु आत्मोत्तम यांना सांगीतली. तेंव्हा गुरु आत्मोत्तम यांनी श्री दत्तात्रेय प्रभुंना विनंती केली. श्री दत्तात्रेय प्रभु प्रकट झाले. त्यांनी विज्ञानेश्वर पुजा करत असलेल्या या लिंगावर मुठी रोउन त्यास संबंध दिला. विज्ञानेश्वराने पिंडीचे दर्शन घेउन देह ठेवला.
आमचे स्वामींनी सुध्दा पंचाळेश्वर आले असता, विज्ञानेश्वर पिंडीस विडा वाहून संबंध दिल्यामुळे हे स्थान आपल्या साठी वंदनिय आहे.

विशेष : परमेश्वर अवताराने लिंगाला विडा वाहण्यामागचे कारण म्हणजे, परमेश्वरांनी ज्याच्या पतित देह स्वीकारला होता त्या हरीपाळ देवाचा पंचलिंगी पूजा करण्याचा मनोदय परमेश्वर पुर्ण करीत होते. तसेच अचलपुर चा अंबीनाथ, त्र्यंबक चा त्र्यंबकेश्वर, नांदुर चा मध्यमेश्वर, आपेगाव चा विज्ञानेश्वर आणि ब्राह्मणी चा घटसिद्धनाथ अशा पाच लिंगाना परमेश्वरांनी विडा वाहीला होता. अर्थात परमेश्वर ज्या ठिकाणी जडत्वाचा जीव घातलेला असेल अशाच लिंगाला श्रीकराने स्पर्श करून विडा वाहत असत. त्यामुळे हरीपाळच्या इच्छापूर्ती बरोबरच तेथील जीवाला संबंधाचे दान होत असे आणि तेथील देवतेलाही आल्हाद लाभत असे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

अनुपलब्ध स्थाने :

1. माहाजना भेटी स्थान.

2. देवळाच्या पटीशाळेवरील आसन स्थान.

3. देवळाच्या चौकातील आसन स्थान.

4. दक्षिण बाजूच्या लिंगाच्या देवळातील आसन स्थान.

5. लिंबाच्या झाडाखालील आसन स्थान.

आपेगावची एकूण स्थाने : 6

  • Purvardha Charitra Lila – 531
  • Aapegaon : आपेगावीं महाजनां भेटि :।।:
  • तेथौनि गोसावी आपेगावां बिजें केलें: वेसीपासी महाद्वारीं महाजन बैसले होतेः तेहीं गोसावियांतें देखिलें आणि अवघे महाजन उठिलेः आणि गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव वरुण आपेगावला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 532
  • Aapegaon : विज्ञानेस्वरा विडा वाणें :।।: / विज्ञानेस्वरीं उपाध्या देवविडानुवादु :।।:
  • गोसावी तैसेचि विज्ञानेस्वरासि बिजें केलें: पटिशाळेवरि पसिमामुख आसन जालें: बाइसीं गोसावियांचे चरणक्षाळण केलें: गुळळा जालाः मग गोसावी भितरीं बिजें केलें: चैकी वस्त्रें ठेविलीं: आंगीटोपरे फेडिलेः फुटा प्रावर्ण करौनि भितरीं लिंगापासी बिजें केलें: गाभारां आसन जालें: मग माधानीचें उदक गोसावी श्रींकरीं घेउनि लिंगस्तर्पण केलें: मग उपाध्यातें म्हणितलें: ‘‘बटिकाः विडा द्याः’’ तेही साधारणें ऐसीं दोनि पानें: साने ऐसें एक पोफळ दिधलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे काइ बटिका? देवविडा देत असाः हा नकोः आणिक देयाः चोखटु आणाः’’ मग तिहीं बरवी पानें: बरवी पोफळें ऐसा विडा ओळगवीलाः मग गोसावी माधानेसि विसुळिलाः मग लिंगासि वाइलाः दोही श्रीकरीं लिंग स्पर्शिलेः मग गोसावी बाहीरि बिजें केलें: नासीपासी आडदांडी होतीः तेथ गोसावी उभे राहिलेः उपाध्यीं गोसावियांतें पुसिलें: ‘‘जी जीः देवविडा म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कव्हणी एक सदर्थ देवां जाएः तो चैकी वस्त्रें ठेवीः आपण साउमा जाः देवतेसि तर्पन करी आणि हडपीयातें वीडें मागेः तों चोखटु देः चोखटे पानें: बरवे पोफळ ऐसें देः तो म्हणेः ‘आरेः देवविडा देः हा ठेवीः’ मग तो काळी पानें: घोटे पोफळ ऐसां विडा देः मग तो देवतेसि वाएः चोखट तांबुळ आपण खाएः तें देवतेतें वंचीः देवतेतें नाडीः तरि देवता कोणे कामे नारायेः’’ ऐसें गोसावी निरूपण केलें: तैसेचि गोसावी देउळ सव्य घालुनि बिजें केलें: दक्षिणें उत्तरामुख देउळीं: तिचेया दारवंडा दोहीं श्रीकरीं धरूनि भितरीं अवलोकिलेः बाइसें चरणक्षाळण केलें: मग पटिशाळें आसन जालें: तेथ बाइसीं गोसावियांसि वस्त्रें ओळगवीलीः गुळळा जालाः विडा जालाः बाइसीं दुपाहारचा पूजावसरू केला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव वरुण आपेगावला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 533
  • Aapegaon : निंबातळीं विष्णुभटां भेटिः पाठीं स्पर्शणें :।।:
  • गोसावी तेथौनि बिजें केलें: जगतिबाहिरी टेकाखाली पसिमें थडीये पींपळाचां वाव्यें पालवीं परता ऐसां निंबू होताः तेथ आसन जालें: तवं जपीये विष्णुभट हातीं तांभाणः तांभाणीं तुळसीः तांबवटीः तांबटीये उदक ऐसें गंगेकडुनि विज्ञानेस्वरासि जात असतिः तवं गोसावियांतें देखिलेः आणि गोसावियांकडें आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: मग गोसावियांचे श्रीचरण उदकें सिंचन केलें: तुळसी वाइलीः गोसावी श्रीकरें तयाचि पाठीं स्पर्शिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः कैसा ब्राम्हण तापसुः जैसी तें बाइलः कैसी पाठीं उन्हें करपौनि गेलीः तीन पाहारवरि आत्मतीर्थ अनुष्ठान करीतिः तिसरा पाहारीं विज्ञानेस्वरासि तुळसी वातिः मग गावासि जातिः ऐसिया तीन्हीं ऋतु सोधली असतिः जैसा योगियाः’’ याउपरि गोसावी मुक्ताबाइचीया वैरागची गोष्टि सांघितलीः मग विष्णुभटी गोसावियांते पुसिलेः ‘‘जी जीः गोसावी केव्हळी बिजें केलें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे आतांची आलेः’’ म्हणौनि अवघी गोष्टि सांघितलीः विष्णुभटी विनविलेः ‘‘जी जीः अवघेया सांघो जावो? गोसावी बिजें केलें असेः ऐसें तें नेणतिः’’ गोसावी मानिलेः मग तैसेचि तें निगालेः महाजन महालक्ष्मीयेचां देउळीं बैसले असतिः तवं विष्णुभटीं म्हणितलें: ‘‘हां गाः काइ बैसले असाः उठा उठाः गोसावी बिजें केलें असेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘कोणी ठाइं असति?’’ विष्णुभटीं म्हणितलें: ‘‘ना विज्ञानेस्वरीचेया निंबातळीं बैसले असतिः’’ तैसेचि तें महाजन उठिलेः आपुलालेया घरांसि गेलेः भेटिची आइती केली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव वरुण आपेगावला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 533
  • Aapegaon : तथा(आपेगावी) निंबातळीं महाजनां भेटिः विनती स्वीकारू :।।:
  • गावीं घरोघरीं सडेसमार्जनें केलीः चौकरंगमाळीका भरीलियाः गुढीया उभीलियाः तराळु बोलाविलाः मखरें तोरणें करावेयाः वेसीद्वारीं तोरण बांधलेः मादळेः कहाळाः कासोळीः ताळघोळः ऐसेंनसी नगर श्रुंगारूनि थोरू महोत्सावो केलाः मग जे जयातें होतें तें तेणें दरीसनां घेतलेः तें अवघे दरीसनां आपेगावासि निगालेः गोसावियांपासि आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः पानेंपोफळेः नारियेळें: जयातें जे होतें तें तेणें दरीसन केलें: मंत्र म्हणितलें: श्रीमूर्ति अवलोकितु बैसलेः मग गोसावी तयासि प्रत्यक्षाकारें पुसिलें: गोसावी अपूर्व तें अपूर्वापरी संभाषिलें: सपूर्व तें सपूर्वापरी संभाषिलेः मग महाजनीं विनविलेः ‘‘जी जीः गोसावी बळ्हेग्रामासि बिजें करावेः तेथ सत्यादेवीचें देउळ असे जीः बरवी गुंफा असेः तेथ गोसावी बिजें करावे जीः’’ गोसावी उपाध्याची वास पाहिलीः आणि म्हणितलें: ‘‘हा बटिकाः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘तरि काइ जीः गोसावी तेथ बिजें करावेः’’ मग गोसावी विनवणी स्वीकरिलीः गोसावी बळ्हेग्रामां बिजें केलें: सरिसें भक्तिजनः महाजनः गोसावी उपाध्यांचेया खांदावरि श्रीकरू घातलाः वरि भक्तिजनीं चांदोवा धरिलाः ऐसें गोसावी बळ्हेग्रामासि गाजतवाजत बिजें केलें: गुंफेसि पटिशाळेवरि उजीवेयाकडें आसन जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव वरुण आपेगावला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: