Panchaleshwar (पांचाळेश्वर)

पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड.

पांचाळेश्वर येथील मंदीरे पांचाळेश्वर गावाच्या उत्तरेकडेकडच्या भागात, गोदावरी नदीच्या काठावर व पात्रात स्थित आहेत.
येथील स्थाने - 
पांचाळेश्वर येथे 3 ठीकाणी मुख्य 3 मंदीरे आहेत. 1) श्रीदत्तात्रेयप्रभूंचे भोजन स्थान. 2) श्रीदत्तात्रेयप्रभूंचे भोजन स्थान दाखवने. 2)अवस्थान स्थान.
तसेच अतीरीक्त नदीच्या पात्रात मोकळी जागा आहे तीथेही स्थाने आहेत. पांचाळेश्वर येथे एकुन ९ स्थाने आहेत.
1) श्रीदत्तात्रेयप्रभूंचे भोजन स्थान - येथे 1 स्थान आहे. तीन्ही अवतारांच्या संबंधाचे हे स्थान गोदावरी नदीच्या पात्रात मधोमध अष्टकोनी मंदीर आहे. श्रीदत्तात्रेयप्रभूंचे नित्य भोजनाचे हे स्थान होय.
2) श्रीदत्तात्रेयप्रभूंचे भोजन स्थान दाखवने - येथे 1 स्थान आहे. आमच्या स्वामींच्या संबंधाचे हे स्थान पांचाळेश्वर गावात बाबाच्या आश्रमात मंदीर आहे.
3) अवस्थान स्थान - येथे 4 स्थाने आहेत. आमच्या स्वामींच्या संबंधाचे हे स्थान पांचाळेश्वर गावात उंचावर मोठे मंदीर आहे.
4,5,6) तसेच अतीरीक्त नदीच्या पात्रात मोकळी जागा आहे तीथेही 3 स्थाने आहेत.

जाण्याचा मार्ग :

पांचाळेश्वर हे गाव, पैठण – शहागड मार्गावरील आपेगाव (विज्ञानेश्वराचे) फाट्यापासून दक्षिणेस 2 कि. मी. आहे. पैठण ते आपेगाव फाटा 29 कि. मी. शहागड ते आपेगाव फाटा 12 कि. मी. शहागड-गेवराईमार्गावरील खामगाव जवळून राक्षसभुवन पांचाळेश्वरकडे जाण्यासाठी सडक आहे. खामगाव ते पांचाळेश्वर 15 कि.मी. आपेगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी व खामगाव मार्गे पांचाळेश्वरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. रोकडा ते पांचाळेश्वर पायमार्गे चार फाग आहे. पांचाळेश्वर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाची माहिती :

1. श्रीदत्तात्रेयप्रभूचे भोजन स्थान :

हे स्थान पांचाळेश्वर गावाच्या उत्तरेस गोदावरी नदीच्या मध्यपात्रात अष्टकोनी देवळात आहे. या स्थानास तीन अवतारांचा संबंध आहे.

लीळा : 1) श्रीदत्तात्रेयप्रभू दररोज मध्यानकाळी येथे भोजन करीत असतात. (पू. ली. 545, स्थान पोथी)

(2) श्रीगोविंदप्रभूनी साष्टी पिंपळगाव ला संन्यास घेतला. त्यानंतर ते येथे आले. या ठिकाणी श्रीगोविंदप्रभूना श्रीदत्तात्रेयप्रभुंचे दर्शन झाले. दोन्ही अवतारांची एकत्र क्रीडा. (पू. ली. 15, 545)

(3) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू अवधूताच्या खांद्यावर बसून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. मग सर्वज्ञ येथून बळेगावला गेले. (पू. ली. 551, स्थान पोथी)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

2. अवधूताच्या खांद्यावर आरोहण होणे स्थान :

हे स्थान श्रीदत्तात्रेयप्रभूच्या भोजन स्थानापासून दक्षिणेस पाऊण फर्लाग अंतरावर गोदावरी नदीच्या पात्रात दक्षिण काठाला आहे. स्थानावर लहानसे देऊळही आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून अवधूताच्या खांद्यावर बसून श्रीदत्तात्रेयप्रभूच्या भोजन स्थानाकडे गेले. (पू.ली. 551, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

3. गुंफा करविणे स्थान :

हे स्थान अवधूताच्या खांद्यावर आरोहण होणे स्थानापासून पूर्वेस 99 फूट अंतरावर आहे.

लीळा : आपेगावच्या अनंतदेव ब्राह्मणाचे स्त्री-व्यभिचाराच्या आळंच दोषापासून रक्षण केल्यावर त्यांना सर्वज्ञांनी कुदळ व फावडे आणण्यास सांगितले. मग सर्वज्ञांनी भक्तजनांच्याकडून गुंफा करवून घेतली. (पू.ली.550,551,स्था.पो)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

4. भोजनता आसन स्थान :

हे स्थान गुंफा करविणे स्थानापासून पूर्वेस 211 फूट अंतरावर देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञांनी येथे भक्तजनांना शुक्राची कथा सांगितली. (स्था.पो.उ.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

5. श्रीदत्तात्रेयप्रभूचे भोजनस्थान दाखविणे स्थान :

हे स्थान पांचाळेश्वर गावाच्या वायव्येस गावालगत गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूनी येथून भक्तजनांना गंगेच्या मध्यपात्रातील श्रीदत्तात्रेयप्रभूचे भोजनस्थान दाखविले; व परमेश्वर संबंधाचे महत्त्व सांगितले. (पू. ली. 545, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

6. अवस्थान स्थान :

हे स्थान पांचाळेश्वर गावामध्ये उत्तराभिमुख देवळात आहे. हे देऊळ ‘अवस्थान मंदिर’ या नावाने ओळखले जाते. सर्वज्ञांच्या वेळी येथे पांचाळेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात रोकड्याहन पांचाळेश्वरला आले. त्यांचे या ठिकाणी पाच दिवस वास्तव्य होते. (पू. ली. 544, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील सर्व स्थान एकाच मंदिरात)

7. वेदिका स्थान :

हे स्थान देवळाच्या पूर्व पटीशाळेत देवळाच्या ईशान्य कोपऱ्यास लागून आहे.

लीळा : जोमाइसा, बेसाइसा, उपाध्ये यांची व सर्वज्ञांची भेट येथे झाली. (पू. ली. 546, 547, स्था. पो.)

8. पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान वेदिका आसन स्थानापासून किंचित ईशान्येस 6 फूट अंतरावर आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाची देऊळी होती. त्या देऊळीतील हे स्थान होय.

लीळा : (1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना पूजावसर व आरोगणा येथे होत असे. (पू. ली. 544, स्था. पो.) (2) जोमाइसाच्या उपहाराचा सर्वज्ञांनी येथे स्वीकार केला. (पू. ली. 546)

9. मादने स्थान :

हे स्थान पूजा आरोगणा स्थानापासून किंचित नैर्ऋत्येस 11 फूट अंतरावर आहे. (स्था. पो.)

देवळाच्या पश्चिम बाजूचे स्थान निर्देशरहित आहे.

गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर वेशीच्या उत्तरेस श्रीदत्रात्रेयप्रभूचे मांडलिक स्थान आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

अनुपलब्ध स्थान :

(1) राजला देवीच्या देवळातील आसन स्थान

(2) पांचाळेश्वराच्या देवळाच्या दक्षिण भिंतीलगतच्या पिंपळाखालील आसन स्थान

(3) गावाच्या उत्तरेच्या पिंपळाखालील आसन स्थान

(4) पांढरी पिवळी दांडी कथन स्थान

(5) पिंपळाच्या पूर्वेचे अग्नीष्टका आसन स्थान

(6) गुंफेच्या अंगणातील मादने स्थान

(7) परिश्रय स्थान

(8) विश्वनाथ देवता तेथ आसन स्थान.

पांचाळेश्वरची एकूण स्थाने : 17

  • Purvardha Charitra Lila – 544
  • Panchaleshwar : पांचाळेश्वरीं अवस्थान :॥: पांचाळेश्वर
  • गोसावी गावांतु पांचाश्वराचेया देउळा बिजें केलेंः तया पुढीलीये लिंगाचिये देउळिये दों पाहाराचां पूजावसर होयेः आरोगणा होयेः गुळुळा होयेः विडा होयेः पांचाळेश्वरीं चौकीं पहुड होयेः तेथ अवस्थान जालेः दिस पांच :॥:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 545
  • Panchaleshwar : श्रीदत्तात्रेयप्रभुंचे गुंफास्थान दाखवने :॥: पांचाळेश्वर
  • मग(म्ह.रोकड्यावरून) गोसावी श्रीदत्तात्रेयप्रभुंचिये गुंफेपासी बिजें केलेंः तेथ उत्तराभिमुख नावेक चरणचारी उभे राहिलेः मग उपान्हौ फेडुनि दोन्ही श्रीकरीं जय केलेः मग म्हणितलेंः हे श्रीदत्तात्रेयप्रभुंचे गुंफास्थान गाः येथ श्रीदत्तात्रेयप्रभुंची गुंफाः एथ श्रीदत्तात्रेयप्रभु प्रतिदिनी बीजें करीरातिः तीन पाहार गुंफेसि क्रिडा करीरातिः तें हें स्थानः मग गोसावी तीर अवलोकिलेः आणि उजवेनि श्रीकरें दाखवित भक्तिजनातें म्हणितलेंः हे देखिले गाः हें इतुकें तीर श्रीदत्तात्रेयप्रभुंचां चरणी चरणांकितः घाला घाला दंडवतेः मग बाइसे मुख्य करौनि समस्ती भक्तिजनी दंडवतें घातलींः गोसावी दोन्ही श्रीकरीं जय केलेः मग सर्वज्ञें म्हणितलेंः अद्यापि एथ प्रतिदिनी श्रीदत्तात्रेयप्रभु पाणिपात्र करौनि आरोगणा करीतातिः आन एथ श्रीप्रभुंशी श्रीदत्तात्रेयप्रभुंचे दर्शण जालेंः एथचि दोहीं देवां एकत्र क्रिडाः ये तीरी श्रीदत्तात्रेयप्रभुंचे भोजनस्थानः आत्मतीर्थः एथ श्रीदत्तात्रेयप्रभुं आणि श्रीप्रभुंशी एकत्र आरोगणा जालीः तें हें गुंफा स्थान कीं गाः म्हणौनि गोसावी श्रीकरें गंगेमध्यें तें स्थान दाखविलेंः सर्वज्ञें म्हणितलेंः परमेश्वरू भज्यः संबंधु वंध्यः वस्तुसंबंधें शक्तिनिक्षेपः वस्तुस्मरण तें शुद्धाचें स्मरणः वस्तुस्मरण तेंहीं एक स्मरणचि कीं गाः भक्तिजनी जाउनी तें स्थान नमस्करिलेंः गोसावी तेथौनि जय केलेः भक्तिजन गोसावीयांपासि आलेंः भक्तिजनीं म्हणितलेंः जी जी येथ दोहीं देवांसि आरोगणा कव्हणी काळी जालीःः सर्वज्ञें म्हणितलेंः श्रीप्रभु ऋद्धपूर प्रांती अवतार स्विकरिलाः वेदाध्ययन केलेंः मग बावेचा मठी क्षेत्रसंन्यास स्विकरिलाः तया गुरुंचे नाव कमळारण्यः मग गुरु समवेत गंगातीरा सासटीचां पिंपळगावा बीजें केलेंः श्रीप्रभू दंडधारी संन्यास स्विकरिलाः एकु दिसीं श्रीप्रभू पांचाळेश्वरां पुडियेसि श्रीप्रभू बीजें केलेंः पुडी केलीः भोजनालागीं श्रीदत्तात्रेयप्रभुंचिया गुंफास्थाना बिजें केलेंः तव तेथ मध्यान्हकाळी श्रीदत्तात्रेयप्रभु बिजें केलेंः दोहीं देवां एकत्र क्रिडाः दोहीं देवां भेटीं जालिः तें एथ दोहीं देवां एकत्र भोजन जालेंः मग श्रीदत्तात्रेयप्रभु सैह्याद्रासि बिजें केलेंः एरिकडे श्रीप्रभू आत्मतीर्थावरौनि विज्ञानेश्वरा बिजें केलेंः तैसेचि पांचदेउळियासि बिजें केलेंः तेथ सकळ प्रतिमासि खेलु केलाः मग गुरु कमळारण्य तें पिंपळगावीं राहिलेंः श्रीप्रभू दुंडीराउळ शुक्लभट्टा समवेत द्वारावतियेसि बिजें केलेंः मग आमचे गोसावी पांचाश्वरांतु बिजें केलें :॥:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 546
  • Panchaleshwar : जोमाइचां उपहार :।।: / जोमाइसां भेटि वरप्रदान :।।:
  • जोमाइसांची माता वेसाइसें: दादोस काही तेयासि सोइरे होतिः तिहीं दादोसांतें म्हणितलें: ‘‘रामाः ये जामेायेसि लेंकुरवें जीतिनाः तरि तुझेनि काही होइल? तरि लेंकरू जीति ऐसें काही करी कां?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘माझेनि होए ऐसेंही आतिः नव्हे ऐसेंहीं आतिः परि आमचीयां गोसावियांचिया दरीसना जाल आणि होइलचिः’’ तिया पुसिलें: ‘‘ना तुमचे गोसावीं कव्हणे ठांइं असति?’’ दादोसीं म्हणितलें: ‘‘ना पांचाळेस्वरीं:’’ मग तियें गोसावियांचिया दरीसना पांचाळेस्वरासि आलीं: गोसावियांसि उदेयाचां वेळीं उत्तरीला सिहाडेयाकडें पटिशाळे वेदिकेवरि आसन जालें: गोसावियांपुढें सगडी असेः जोमाइसें तियें आलीं: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः नारियेळ दरीसनासि केलें: बैसलीं: गोसावीं तयाचि पाठ श्रीकरें स्पर्शिलीः गोसावी नारीयळ श्रीकरीं घेतलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें काइ बाइ?’’ तिया म्हणितलेः ‘‘जी जीः एक फळः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ बाइः लेंकरूवी सिनविलींति ना?’’ तिया म्हणितलेः ‘‘हो जीः’’ मग वेसाइसीं मागील दादोसांचें शब्द अवघेचि सांघितलें: गोसावी उगेयाचि आइकीलेः मग तिहीं गोसावियांतें उपहारालागी विनविलें: गोसावी विनती स्वीकरिलीः मां तेहीं उपाहारू निफजविलाः उपहारू आणिलाः गोसावियांसि लिंगाचीए देउळीं पूजा केलीः ताट केलें: आरोगणा दिधलीः गुळळा जालाः विडा जालाः मग मडकीं वोपितां गोसावी बाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः नाव नाव अवघां ठाइं राखाः’’ मग बाइसीं कणुकणु अवघां मडकां राखिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हांडियां अन्न उरलें असेः तें तुम्हीं जेवाः’’ ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि मग तें अन्न तियें जेविलीं: मग तयांसि तिघे लेकरूवें जालीः तें जियालीं: एक परसरामबासाचे पीतेः तयां नांव खेइदेवपंडितः एक चुलतेः एकीं आति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 547
  • Panchaleshwar : उपाध्यां भेटि :।।:
  • उदेयाचा पूजावसरू जालेयानंतरें रीगतां उजवेया हातीं पटिशाळे सिंहाडेनिसी तियेची वेदिके गोसावियांसि आसन जालें: तेथ बाइसें उदेया विळीचां दोहीं सांजा सगडी करीतिः तें चाकाची सगडीः गोसावियांपुढें असेः गोसावी तापत असतिः तेधवां उपाध्यांसीं भेटि जालीः पानेंपोफळें गोसावियांसि ओळगवीलीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: श्रीमूर्ति अवलोकीत बैसले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 548
  • Panchaleshwar : निंबातळी द्रव्यकथन :।।:
  • गोसावी मागुते विहरणा बिजें केलें: गोसावियांसि पुढीला पारावरि आसन जालें: भवते भक्तिजन बैसले असतिः तवं बाइसीं गोसावियांतें पुसिलें: ‘बाबायें पीवळीदांडी करूं म्हणितलीः किजो कां बाबाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पीवळीयेसि सायासि लागति आणि अवघड पडेः मां तें जें करावें तें हेंचि कां न करावेः’’ म्हणौनि गोसावी तेथुनि बिजें केलें: पूर्विलीकडें निंब तयाचां पसिमीली पालवी आसन जालें: मग गोसावी पौळीचेया कोनटेयाकडें दाखविलें: ‘‘एथ या निंबातळी द्रव्य असे गाः’’ नाथोबासीं म्हणितलें: ‘‘कव्हणाचें द्रव्य जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ चैंडा रायाचीं बरी बैसलीः नव घट द्रव्य तें नेववेचिनाः तें एथचि पुरीले असेः’’ मग गोसावी तेथुनि बिजें केले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 549
  • Panchaleshwar : विस्वनाथदेवां धातुर्वाद कथन :।।: / विस्वनाथदेवां धातुर्वाद प्रश्नें सामर्थ्य निराकरणें :।।:
  • एकु दिसीं विहरणौनि बिजें केलें: गोसावियांसि जखिनीचिए देउळीये जगतिआंतु पींपळाचां दक्षिणीली पालवीं आसन असेः तवं विस्वनाथदेव तें नाथपंथी महात्मेः गंगेकडौनि गावांकडें जात होतें: तिहीं गोसावियांतें देखिलें: आणि आलेः कायाप्रणित करौनि पासी बैसलें: गोसावियांतें पुसिलें: ‘‘जींजीं: आपण पीवळीदांडी करूं जाणिजेः’’ गोसावी श्रीमुगुटें निराकरिलें: ‘‘तरि पांढरी दांडी करूं जाणिजे?’’ तेही गोसावी श्रीमुगुटें निराकरिलें: तें नावेक होतेः मग निगालेः मग नाथोबाये पुसिलें: ‘‘जी जीः पीवळी दांडी म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तांबेयाचें सोने किजेः’’ नाथोबाये पुसिलें: ‘‘जी जीः तरि पांढरी दांडी म्हणिजे काइ?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कथिलाचें रूपें:’’ नाथोबाये पुसिलें: ‘‘हां जीः तरि सोने केलेयां होए?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘होएः’’ नाथोबाये पुसिलें: ‘‘जीजीः तें कैसे किजे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते काइ करावी असे? एथ काइ सायास अवघड असे? हा पैलु सेनाचा पो आणि तांबतौली आणाः तुमचीये पानवैयेवरि झाड आहे तें आणाः मां तुम्हां करौनि दीजैलः’’ परि तें उगेचि राहिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पोरे हो परि तुम्ही नासाल कीः मग हें तुम्हां नाहीं:’’ नाथोबाये म्हणितलें: ‘‘तयाची आम्हा चाड नाहीं जीः’’ मग गोसावी बिढारासि बिजें केलें: गोसावियांसि दुपाहाराचां पूजावसरू जालाः आरोगणा जालीः गुळळाजालाः विडा ओळगवीलाः पहूड जालाः उपहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 550
  • Panchaleshwar : पुस्चळीके अभियोगें ब्राम्हणु रक्षणें :।।:
  • उदेयाचा पूजावसर जालेयानंतरें गोसावी विहरणासि बिजें केलें: पांचाळेस्वराचेया देउळापूर्वे इशान्य कोना आश्राइत थडी पींपळुः तया पींपळातळी उभे असतिः अनंतदेव नांव ब्राम्हणुः तें आपेगावीचें: तयासि प्रथम दोषा(पुस्चळकैचा) अभियोगु आलाः म्हणौनि गावीचें तयातें मारावेया राखत होतें: तवं तयाते अवचटें देखिलें: आणि शस्त्रांसीं धाविनलेः तें अनंते देखिले आणि पळालेः तें गंगेवरि पाठीं लागलें: तवं अनंतदेवीं गोसावियांतें देखिले आणि उजूचि गंगेआंतु घालौनि पव्हतपव्हत गोसावियांपासी आलेः इतुलेनि तयाची रोखबुद्धी गेलीः तें गंगेपासौनि गावांतु गेलेः अनंतदेवीं गोसावियांतें देखिलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: ‘‘शरण आला जीः’’ म्हणौनि पासी बैसले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 551
  • Panchaleshwar : अवधूतां स्कंधारोहणीं गंगा उतरणें :।।:
  • तैसेचि गोसावी विळीचां वेळीं तेथौनि बिजें केलें: अवधूतयाचेया खांदावरि आरोहण करौनि गंगा उतरलेः उजूचि बळ्हेग्रामिचेया भोजनतेया बिजें केलें: तेथ नावेक आसन जालें: भक्तिजनें भिक्षा करौनि आलीं: झोळीया गोसावियांसि दृष्टीपूता केलियाः बाइसीं पदार्थ निवडीलें: मग गोसावियांसि पूजावसर जालाः भिक्षान्नाची आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः भक्तिजनें जेविलीं: धुळीरा समेतवं गोसावियांसि तेथचि आसन जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 551
  • Panchaleshwar : गंगातटीं गुंफा करवणें :।।:
  • नावेक बैसले होतें: गोसावियांसि गुंफा करावेयाची प्रवृत्तिः मग गोसावी तयांते पुसिलें: ‘‘भटोः तुमचेनि कुदळीपावडें जोडेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः जोडे परि मज अव्हिळावो आला जीः तें मातें मारावेया पाठीं लागलेः गोसावियांकडें आलां म्हणौनि तें राहिलेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आता जाः तुमतें कव्हणीं काही न करी हो’’ तेहीं म्हणितलेः ‘‘ना जी तें माते मारीतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ना न मारीतिः आतां तुमतें कोण्हीं काही करीनाः जाः कुदळीपांटी आणाः’’ ते मागुते गावां गेलेः तें अवघे पारावरि बैसले असतिः तया अवघेया वरूनिचि आलेया वाटां घरां गेलें: तवं एरांची ओखटी बुद्धी निवर्तलीः तेही म्हणितलें: ‘‘हा रेः हां जरि ऐसां होएः तरि मागुता घरांसि ये?’’ तवं तें पारेसि अवघे बोलो लागलें: ‘‘आरेः तुवां देखिलाः’’ तो म्हणेः ‘‘मजपुढां एकें ऐसें सांघितलें:’’ ऐसें एर एरातें पुसेः ऐसें लटिकें जालें: तयांतु एकें म्हणितलें: ‘‘ओखटे जालें होतें: ब्राम्हणु कपाळीं बैसला होताः एया रेः एसणा विघात चुकलाः’’ तयातें तिहीं क्षेमाविलें: मग तें घरा गेलेः माता म्हणितलें: ‘‘तूं कां रे बा आलासिः तुमतें मारावेया धाविनलेः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘भेयो नकोः माझे तें कोण्हीं काही न करीतिः’’ माता म्हणितलेः ‘‘पारीं बैसले होतेः तेही तुमतें देखिलें?’’ तेणें म्हणितलें: ‘‘हो देखिलें:’’ माता म्हणितलेः ‘‘मग काइ म्हणति?’’ तेहीं म्हणितलेः ‘‘ना मातें देखिलें आणि म्हणितलें: ‘हा तैसा जरि होए तरि मागौता ये?’ एर म्हणेः ‘एणें सांघितलेः’ एर म्हणेः ‘एणे सांघितलेः’ ‘आ रेः एसणा विघात चुकलाः देखिलेयावीन ब्राम्हण मारीलाचि होता माः’ मग मज तेहीं क्षेमाविलेः’’ मग तेणें म्हणितलें: ‘‘आइः गोसावियांचि पूरता उपहार करीः’’ तेही कुदळीपावडे पांटीं गोसावियांपासी आणिलें: गोसावियांपुढें अवघें सांघितलें: उपाहारालागी विनविलेः आणि मागौते घरासि गेलेः मग तयाचीया माता तयाहाती गोसावियांपूरतां उपहारू पाठविलाः गोसावीयांसि गुंफा करावेयाची प्रवृत्तिः गोसावी तयाची पींपळाचेया पूर्विला पालवीपासी श्रीकरें पालवी धरूनी उभे राहिलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथः गुंफा करा गाः’’ बाइसीं विनविलें: ‘बाबाः बापुडीं बटिकुरूवें काइसेया सिनवीजतें असिजतिः बाबासि काइ एथ असावें ठाकलें असे?’’ यावरि गोसावी अंध्रदेशीचेया तैल्यकाराचीं गोष्टि सांघितलीः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तें एथ तैसीं प्रवृत्तिः जे तान्हैलेया पाणी न मागिजेः आता एथ ऐसीं प्रवृत्ति असे जे गुंफा करविजेः गुंफा केलियावीण आरोगणा न किजेः घेयाघेयाः बापेया वेगु कराः’’ मग भक्तिजनी कुदळींपाउडें घेउनि गुंफा केली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 552
  • Panchaleshwar : भोजनता सुकृदरीसनीं ज्योतिष प्रशंसा :।।:
  • तवं सुकृ निगालाः बाइसीं पुसिलें: ‘बाबाः हें कव्हण नक्षत्र?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः बटिकातें पुसाः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘बटिकाः हें कव्हण नक्षत्र?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘हा शुक्रः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः हें कैसेनि जाणिजे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा शुक्रः ज्योतिष्शास्त्रातवं जाणिजेः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः परि गगनीचें कैसेनि जाणिजे?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः ज्योतिष्शास्त्रातवं हा ठावोंवेर्‍हीं जाणिजेः’’ याउपरि गोसावी सांघितलें: ‘‘बाइः गर्गाचार्ये वार्धिक्य देहीं आपुलेया पुत्राकरवी सुक्राकरवी ज्योतिष्यास्तवं एक जन्म वर्तविलें: तवं तेणें आपुलीं सात जन्में वर्तविलीं: सातवे जन्म तें कुष्टियाचें देखिलेः आणि तो मूर्छा येउनि पडिलाः तें पीतेनि देखिलेः ‘हें काइ?’ मग उठविलाः सावधु केलां: तेणें म्हणितलें: ‘हे काइ?’ मग तेणें म्हणितलें: ‘ना ताताः तुम्हीं मजकरवी एक जन्म वर्तविलें: तें मियां आपुलीं सात जन्में वर्तविलीः सातवें जन्म कुष्टियाचें देखिलें: आणि मज मूर्छा आलीः’ तेहीं म्हणितलें: ‘तुज एतुलेया जावेया काइ कारण? तुजकरवी एकु जन्म वर्तविलें: तुआं सात जन्में कां वर्तविली?’ मग सुक्रें म्हणितलें: ‘ताताः आतां मज काइ करणीए?’ तवं पीतेन म्हणितलें: ‘ते तू जाणत अससिः’ मग तेही समाधी अंगिकरौनि योगअभ्यासें सात शरीरें विसेर्जलीं: मग उपासना बहुतचि केलीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तो लौकिचा ब्रम्हविदुः जगीचीयां ब्रह्मविदां: अवघेयां आचार्या अग्रगण्य होउनि वर्तत होताः पहिलें आंगुळीयासि पढिजेः तेणें समाधीमध्यें सात देहें विसर्जलीः एसणीए सामग्रीचाः एसणेंयां सामर्थचां: सेवटीं जन्मांतीं गगनी नक्षत्र होउनि पडिलाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘लोकीचां श्रेष्ठ तो एथीचां नष्टः एथीचां श्रेष्ठ तो लोकीचां नष्टः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Panchaleshwar : गुंफे मार्जनोदक गंगागमनी भृत्यां स्नानें करवणें :।।:
  • बाइसीं गावांतुनि डेरा आणिलाः पाणी ठेविलेः गोसावियांसि गुंफे मर्दना जालीः मार्जनें जालें: गोसावियांचिया मार्जनयांचें उदक गंगेसि मिनलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथें स्नानें करा गाः धारेचें उदक कुंडासि मिनलें: संपूर्ण सोमवारी वर्तत असेः’’ तियें संगमीं भक्तिजनें स्नानें केलीं: मग गोसावी तेथ बीजें केलें आणि म्हणितलें: ‘‘घेया गा अवभृत्य स्नानें होतें असतिः’’ ‘‘जीजीः पूर आलाः’’ मग गोसावियांसि पूजावसरू जालाः गोसावियांसि आरोगणा जालीः पहूड उपहूड जालाः मग गोसावियांसि तेथ आसन जालें: भक्तिजनासि गावं वाटिलेः सांगात पालटिले आणि भक्तिजन भिक्षेसि पाठविले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Panchaleshwar : :।। पंचाळेश्वरीं तीर प्रशंसा प्रसंगें श्रीदत्तात्रेयप्रभु: श्रीप्रभु अेकत्र भोजन कथन:।। 1 ।। ।। धानाइसे :।। आत्मतीर्थ लीळा (धानाइसा पाठ):
  • सर्वज्ञ पंचाळेश्वरासि बिजे केले: तेथ अवस्थान जालें:।: उदयाचा पुजाअवसरू जालेयानंतरें सर्वज्ञ बाइसा भक्तिजनासमवेत गंगातीरा बिजे केलें: श्रीदत्तात्रेयप्रभुचया भोजनगुंफास्थाना बिजे केलें: तेथ उत्तराभिमुख चरणचारी उभया राहुनि उजवेनि श्रीकरें आत्मतिर्थाकडे दाखविले: आन भक्तिजनातें सर्वज्ञें म्हणितलें: हे देखीले गा हे तीर श्रीदत्तात्रेयप्रभुचां चरणीं चरणांकीत आत्मतीर्थ: ये तीरी श्रीदत्तात्रेयप्रभुचे भोजनस्थान: अेथ श्रीदत्तात्रेयप्रभु आन श्रीप्रभु अेकत्र आरोगणा जाली: ते हे गुंफास्थान कीं गा:।: तवं भक्तिजनीं म्हणितलें: जी जी येथ दोही देवांसि आरोगणा कवणे काळीं जाली:।: श्रीदत्तात्रेयप्रभु: श्रीप्रभु रूद्धिपुर प्रांतीं अवतारू स्वीकरीला: वेदाध्ययण केलें: मग बारवेचा मठीं क्षेत्रसंन्यांस घेतला: तया गुरूचे नावं कमळारण्य: मग तया गुरू समवेत गंगातीरी सासटि पींपळगावां बिजे केलें: तेथ तेथ पांचगंदेउळीया सप्तरात्र अवस्थान जालें: तेथ श्रीप्रभु दंडधारी सन्यास स्वकरीला: मग अेक दिस श्रीप्रभु सर्वज्ञ पंचाळेश्वरा पुडियेसि बिजे केलें: पुडी केली: भोजनालागि गुंफास्थाना बिजे केलें: तवं मध्यान्नकाळी तेथ श्रीदत्तात्रेयप्रभु बिजे केलें: दोही देवां भेटि जाली: दोही अेकत्र भोजन जालें: मग श्रीदत्तात्रेयप्रभु सैहाद्रा बिजे केलें:।: अेरीकडे श्रीप्रभु आत्मतीर्थावरूनि विज्ञाणेश्वरा बिजे केलें: तयासि तर्पण केले: तैसेचि पांचदेउळीया बिजे केलें: तेथ सकळ प्रतिमासीं खेळु केला: मग श्रीप्रभुचे गुरू कमळारण्य ते पींपळगावीं राहीले: आन श्रीप्रभु दुंडीराउळाशुक्लभटा समवेत द्वारावतीये बिजे केलें:।।००।।
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात हिवरळिला १ महिना १ दिवस अवस्थान होते. नंतर रावसगाव येथेव ११ दिवस अवस्थान होते. पुढे पूरीं(पांढरी) ३ दिवस अवस्थान होते. पुढे संगमजळगावला ५ रात्र अवस्थान होते. पुढे नंदापूर(नांदौर)ला येथे १५ दिवस अवस्थान होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस अवस्थान होते. तेथुन रोकड्या वरून स्वामीं पांचाळेश्वरला आले स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: