Yelwan (येळवण)

येळवण, ता. जि. अकोला


येळवण येथील 1 स्थान येळवण गावाच्या पश्चिमेकडे 1 कि. मी. अंतरावर मंदीरात आहे. या मंदीराला 'विघ्नेश्वर मंदीर' म्हणुन संबोधतात.


जाण्याचा मार्ग :

घटाळीच्या स्थानापासून ईशान्येस येळवण (एरंडा मार्गे) 6 कि. मी. आहे. अकोला ते येळवण (शिवणी, कुंभारी, विजोरा मार्गे) 20 कि. मी. आहे. व बोरगावमंजु, सोनाळामार्गे 26 कि. मी. आहे. अकोला मूर्तिजापूर मार्गावरील रंभापूरहून कानशिवणी मार्गे येळवणला जाण्यास मार्ग आहे. घटाळीहून विजोरा अथवा कानशिवणीमार्गे येळवणला जाता येते. येळवणला जाण्यासाठी अकोला येथून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान येळवण गावाच्या नैर्ऋत्येस एस. टी. बस थांब्याजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण ‘विघ्नेश्वर संस्थान’ या नावाने ओळखले जाते. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो. उ. को. द. प्र.)

2. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना बार्शीटाकळीहुन येळवणला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 149, स्था. पो. को, शा. प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून लाखपुरीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. परिश्रय स्थान

हे स्थान वस्ती स्थान देवळाच्या वायव्येला 50 फुट अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


देवळाच्या सभामंडपातील स्थान निर्देशरहित आहे.


निर्देशरहित स्थान : 1


येळवणची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 149
  • Yelwan : एळवनी(वेळूवनी) वसति :॥:
  • तेथौनि गोसावी एळवना(वेळूवना)सि बीजे केले : गावां नैऋत्यें लिंगाच्या देउळीं चौकीं आसन जालेः बाईसीं चरणक्षाळण केलेः दुपाहारचा पूजावसरु केलाः उपहार निफजविलाः गोसावीयांसि आरोगणा जाली: गुळुळा जालाः विडा जालाः पहूड जालाः उपहुड जालाः विळीचा पूजावसरु जालाः तेथची लिंगाच्या देउळीं वसति जालीः उदयाची परिश्रयो सारुनि बीजे केले :॥: (.. येथे स्वामी दुसर्यांदा आले. पुढे स्वामी लाखापुरीला गेले.. येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे :॥:)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: