Yeli (येळी)

येळी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर


येथील स्थान येळी गावाच्या आग्नेयेस एक फाग अंतरावर नदीच्या दक्षिण काठी 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

येळी हे गाव, पाथर्डी-पाडळशिंगी मार्गावर भेटीच्या बडापासून वायव्येस 3 कि. मी. आहे व पाथर्डीहून पूर्वेस 20 कि. मी. आहे. येळीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान येळी गावाच्या आग्नेयेस एक फाग अंतरावर नदीच्या दक्षिण काठी आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे सिद्धनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात खरवंडीहून येळीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 577, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आव्हाण्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


येळीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: