Wathoda Shukleshwar (वाठोडा शुक्लेश्वर)

वाठोडा शुक्लेश्वर, ता. भातकुली जि. अमरावती


वाठोडा शुक्लेश्वर येथील आता उपलब्ध झालेले 1 स्थान गावाच्या पश्चिमेस आहे. हे ठिकाण 'लक्षेश्वर मंदिर' म्हणून ओळखले जाते.


जाण्याचा मार्ग :

खोलापूरहून उत्तरेस वाठोडा शु. (नावेड, ढंगारखेडा मार्गे) 8 कि. मी. आहे. हा पायमार्ग आहे. खोलापूरहून वाठोडा शु., चंडिकापुर मार्गे 11 कि. मी. आहे. वाकीहून उत्तरेस 6 कि. मी. आहे. अमरावती येथून वाठोडा शुक्लेश्वर (अमरावती-वलगाव-धामोरी-म्हैसपूर फाटा मार्गे) 32 कि.मी. असुन बस सेवा नियमितपणे उपलब्ध आहेत. म्हैसपूर फाट्यावरुन वाठोडा शुक्लेश्वर उत्तरेस 4 कि.मी. वाठोडा शु. येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. गावातच आश्रम आहे. गावातील श्री फुलारी मठ व श्री दत्त मंदिर संस्थान येथील प्रसाद वंदन हे विशेषच


स्थानाची माहिती :

1. लिंगाच्या देउळी वसति स्थान :

हे स्थान वाठोडा शुक्लेश्वर गावाच्या नैर्ऋत्य विभागी पूर्णा नदीच्या पूर्व काठावर पूर्भिवाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण ‘लक्षेश्वर मंदिर’ म्हणून ओळखले जाते. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या ठिकाणी एकदा शिंगणापूरवरून आणि एकदा आष्टीवरून असे दोन वेळा येथे आलेत. तेव्हा स्वामींचा एक रात्र मुक्काम होता. (पू.ली. 173 स्था.पो.)  श्रीचक्रधर स्वामी श्रीगोविंदप्रभू महाराजांची भेट घेण्याकरीता पैठन वरुण ऋद्धपूरच्या दिशेने निघाले तेव्हाच्या लीळांची ही ठीकाण.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वाठोडा शुक्लेश्वर चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 173
  • Wathoda Shukleshwar : वाठवडां वसति :॥:
  • गोसावी वाठवडेया बीजे केले : लाखमठीं चौकीं आसन जालेः बाईसीं चरणक्षाळण केलेः मग बाईसीं उपहार निफजविलाः गोसावीयांसिं आरोगणा जाली : विडा ओळगविलाः पहुडः उपहुड जालाः तिये दिसीं तेथचि वसति जाली :॥:
  • (..येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी आष्टीवरूण आले.. :॥:)
  • Purvardha Charitra Lila – 173
  • Wathoda Shukleshwar : वाठवडां लाखमठीं वसति :॥:
  • तेथौनि गोसावी वाठवडेया बीजे केले : लाखमठीं वसति जाली :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी लाखापुरीवरुन आले .. येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे :॥:)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: