Warkhed (Ghatsiddnath) (वरखेड-घटसिद्दनाथ)

वरखेड (घटसिद्धनाथ), ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील 5 स्थान रामडोह लिफटच्याजवळ आहेत.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

सुरेगावहून वरखेड 9 कि. मी. आहे. मात्र रस्ता खडीकरण झालेला आहे. सुरेगावहून वरखेड सलाबतपूर, शिरसगाव मार्गे 18 कि. मी. आहे. नेवासा-शेवगाव मार्गावरील कुकाणा गावापासूनही वरखेडकडे जाण्यास मार्ग आहे. वरखेडपासून तीन कि. मी. अंतरावर रामडोह लिफटजवळ स्थाने आहेत.


स्थानाची माहिती :

वरखेड आणि रामडोह या दोन गावांच्यामध्ये वरखेड गावाच्या हद्दीत घटसिद्धनाथ नावाचे प्राचीन आणि प्रसिद्ध शिवालय होते. स्वामींच्या वेळी या मंदिराची कीर्ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर पसरली होती. स्वामींच्या देहाच्या आई माल्हनदेवी यांनी सुद्धा या मंदिरात दर्शनासाठी येण्याचा मानसिक संकल्प केलेला होता. तो पूर्ण करण्याच्या हेतुने स्वामी येथे आले असावे.

घटसिद्धनाथाचे मंदिर नाथसागरात बुडाले, त्यामुळे त्याची पडझड झाली. सध्या तेथे नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. जुन्या मंदिराचे अवशेष पाहावयास मिळतात.

आचार्य केशराजव्यास हे याच वरखेडचे काळे कुटुंबातील असल्याचे संशोधन डॉ. रमेश अवलगावकर यांनी केलेले आहे. (स्मृति क्र. 43) या संशोधनानुसार असे म्हणता येते की, केशराजव्यास याच मंदिराच्या परिसरात दररोज येत असतं. त्यांच्या घरच्यांनी त्यांना घरी परत आणल्यावर याच मंदिराच्या परिसरात ते विजन करत असत आणि याच परिसरात त्यांनी ‘रत्नमाला स्तोत्र’ या अपूर्व ग्रंथाची रचना केली. मराठी भाषेतील ग्रंथाचा संस्कृतमध्ये झालेला हा ‘पहिला अनुवाद’ आहे. म्हणजेच आद्यग्रंथ लीळाचरित्र या मराठी गद्यग्रंथावरील रत्नमाला स्तोत्र हा ‘पहिला संस्कृत पद्यग्रंथ’ आहे.

ठिकाणाचे महत्त्व :

1. आचार्य श्री केशराज व्यास यांची वरखेड ही जन्म भूमी आहे.

2. आद्यग्रंथ लीळाचरित्र या मराठी गद्यग्रंथावरील रत्नमाला स्तोत्र हा ‘पहिला संस्कृत पद्यग्रंथ’ वरखेड येथे रचला गेला आहे. (स्मृतिस्थळ, डॉ. र. अवलगावकर)

सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी उत्तरार्धात आगरवाडगाव येथून घटसिद्धनाथ येथे आले. हे मंदिर वरखेड गावातून सरळ रस्त्याने गोदावरी नदीच्या दक्षिण काठी आहे.

1. घट सिद्धनाथ लिंगास विडा वाहणे स्थान :

हे स्थान लिफटच्या वायव्येस गोदावरी नदीच्या दक्षिण काठी उंचवट्यावर मुख्य देवळाच्या पश्चिम विभागी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी येथे उत्तराभिमुख बसून लिंगास श्रीकराने स्पर्श करून विडा वाहिला. (उ. ली. 319, स्था, पो.)

विशेष : परमेश्वर अवताराने लिंगाला विडा वाहण्यामागचे कारण म्हणजे, परमेश्वरांनी ज्याच्या पतित देह स्वीकारला होता त्या हरीपाळ देवाचा पंचलिंगी पूजा करण्याचा मनोदय परमेश्वर पुर्ण करीत होते. तसेच अचलपुर चा अंबीनाथ, त्र्यंबक चा त्र्यंबकेश्वर, नांदुर चा मध्यमेश्वर, आपेगाव चा विज्ञानेश्वर आणि ब्राह्मणी चा घटसिद्धनाथ अशा पाच लिंगाना परमेश्वरांनी विडा वाहीला होता. अर्थात परमेश्वर ज्या ठिकाणी जडत्वाचा जीव घातलेला असेल अशाच लिंगाला श्रीकराने स्पर्श करून विडा वाहत असत. त्यामुळे हरीपाळच्या इच्छापूर्ती बरोबरच तेथील जीवाला संबंधाचे दान होत असे आणि तेथील देवतेलाही आल्हाद लाभत असे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. दारसंका धरणे स्थान :

हे स्थान लिंगास विडा वाहणे स्थानाच्या पूर्वेस आहे.

लीळा : सर्वज्ञांनी येथे उभे राहून दोन्ही दारसंका दोन्ही श्रीकरांनी धरल्या. (उ. ली.318)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. अवस्थान स्थान :

हे स्थान दारसंका धरणे स्थानाच्या पूर्वेस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात आगरवाडगावहून वरखेडला आले. त्यांचे येथे काही दिवस वास्तव्य होते, (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. उत्तर दारवठा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या उत्तरेस देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ आगरवाडगावहून घटसिद्धनाथला आले, त्यावेळी त्यांनी उत्तराभिमुख दरवाजातून देवळात प्रवेश केला. (उ. ली. 318)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. मादने स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या पूर्वेस देवळात आहे. (स्था. पो.) येथे स्वामींना स्नान होत असे.

मादने स्थानाच्या उत्तरेचे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


विद्यापीठ स्थानपोथी : घटसिधनाथा उत्तरे गंगेचिए थडीए कपाट तेथ आसनः 0 ।।: ब्राम्हणाचा दधीभातु आरोगनाः मग घटसिद्धनाथी लींगापासी आसनः ।। लिंग श्रीकरेस्पर्शनं ।। तथा चौकी वस्ती : ।। घटसिधनाथ पूर्वाभिमूखः।।उंबरवटुः।। जगतीचा दारवठा पूर्वाभिमुखः।।उत्तरे खिडकीः।।दक्षीणे परीश्रय ।। स्थाने ७ः ।।


अनुपलब्ध स्थान :

1. कपाटी दहीभात आरोगणा करणे स्थान.

2. परिश्रय स्थान.


वरखेडची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: