Walsawangi (वालसावंगी)

वालसावंगी, ता. भोकरदन, जि. जालना


येथील 4 स्थान - हे स्थान वालसावंगी गावाच्या नैर्ऋत्य विभागी गावालगतच मंदीर आहे. येथेच चारही स्थान आहेत.


जाण्याचा मार्ग :

वालसावंगी हे गाव, पारध-विझोरा मार्गावर आहे. विझोरा हे गाव, अजिंठा-बुलढाणा मार्गावर आहे. अजिंठा ते वालसावंगी 28 कि.मी जाळीचा देव ते वालसावंगी 13 कि.मी. पद्मावती ते वालसावंगी 2 कि.मी. वालसावंगीला जाण्यासाठी एस.टी.बस सेवा उपलब्ध आहे. वालसावंगी हे गाव, अजिंठा-बुलढाणा मार्गावरील वालसावंगी फाट्यापासून 6 कि.मी. आहे. बुलढाणा ते वालसावंगी फाटा 30 कि.मी. अजिंठा ते वालसावंगी फाटा 22 कि.मी.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान वालसावंगी गावाच्या नैर्ऋत्य विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे म्हाळसेचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सावळदबाऱ्याहून वालसावंगीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 423, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून ईशान्येस 5 फूट अंतरावर आहे.


3. तपोवन अवलोकणे स्थान :

हे स्थान आरोगणा स्थानापासून पूर्वेस 6 फूट 9 इंच अंतरावर आहे.

लीळा : दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ अंगी टोपरे घालून येथे उभे राहिले. येथून तपोवनाचे अवलोकन केले आणि म्हणाले, “आता पलीकडील देवळात जाऊ या.” मग ते येथून तपोवनला गेले. (पू.ली. 423, स्था.पो.)

तपोवन अवलोकणे स्थानापासून नैर्ऋत्येस 6 फूटावर असलेले स्थान निर्देशरहित आहे.


4. परिश्रय स्थान :

हे स्थान देवळाच्या सभामंडपात दक्षिण बाजूस आहे. (स्था.पो.)


वालसांगवीची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 423
  • Walsavangi : वालसेंगे वसति :॥:
  • गोसावीयांसि जोगेश्वरीसि आसन जालेंः गावानैऋत्ये कोनी म्हाळसेचे देउळ पूर्वामुखः तेथ गोसावीयांसि पूजाः आरोगणा: गुळुळाः विडा जालाः तेथची वसति जालीः एरी दिसी उदयाचा पूजावसरु जालेयानंतरे तेथौनि गोसावी आंगीटोपरे लेउनि आंगणीं उभे ठाकलेः मग तपोवन दृष्टी अवलोकीलेः आणि म्हणितलेः आता पैल देउळा जाइजैलः तैसेची गोसावी तपोवनासी बीजें केलें :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने.. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात सेंदुर्णींवरुन सावळदबार्‍याला आले. सावळदबार्‍याला २० ते ३० दिवस वास्तव्यानंतर मासरुळकडे जाताना स्वामींचे जाळीचादेव येथे आसन झाले. तेथुन स्वामी वालसावंगीला आले व येथे वसति झाली…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: