Waki (वाकी)

वाकी, ता. भातकुली जि. अमरावती


वाकी येथील 1 स्थान वाकी गावाच्या पश्चिमेकडे गावालगतच पूर्णा नदीच्या काठावर मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

खोलापूरहून उत्तरेस वाकी (नावेड, वाठोडा शु. ढंगारखेडा मार्गे) 11 कि. मी. आहे. हा पायमार्ग आहे. खोलापूरहून वाकी, म्हैसपूर फाटा, वाठोडा शु.मार्गे 15 कि. मी. आहे. अमरावतीहून वलगाव म्हैसपूर फाटा, वाठोडा मार्गे वाकी 38 कि. मी. आहे व आष्टी मार्गे 28 कि. मी. आहे. वाकी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान वाकी गावाच्या वायव्य विभागी पूर्णा नदीच्या दक्षिण काठावर दक्षिणाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पांडेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना खोलापूरहन वाकीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 159 स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून थूगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वाकी चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 152
  • Waki : मार्गी चांगदेवोभटां जाडी पांगुरवणें :।।:
  • मग गोसावी तेथौनि बिजें केलें: मार्गी गोसावियांसि वस्ति होएः पहुड स्वीकरीतिः आपणेयासेजें चांगदेवोभटातें निजवीतिः रात्री गोसावियांसि पावो लागैल म्हणौनि तें परते परते सरतिः गोसावी म्हणतिः ‘‘बटिकाः आरूते ठाकाः’’ म्हणौनि दोहीं श्रीकरीं गोसावी ऐसें धरूनि आरूते आणीतिः स्याळे दिसः मां सीं वाजत असे म्हणौनि गोसावी म्हणतिः ‘‘बटिका आरूतीचि निद्रा कराः मग हें तुम्हांसि जाडी पांगुरविलः’’ तें म्हणतिः ‘‘हो जीः शीत वाजैल आणि पांगुरवावें:’’ गोसावी म्हणतिः ‘‘बटिका एथ म्हणावें होः’’ तें म्हणतिः ‘‘हो जीः’’ गोसावी निद्रा अंगिकरीतिः निदसुरपणें हस्तपाद लागति म्हणौनि चांगदेवभट परते होतिः शीतपिडित जालेया चांगदेवभट कुरकुरीतिः आणि गोसावी कृपावशें श्रीकरें करौनि आरूते आणीतिः जाडीचां पालवुं पांगुरवीतिः तें गात्रें संकोचुनि निद्रा करीति आणि अपार सुखनिद्रा येः ऐसें प्रत्यही करीति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-एळवन-लाखापुरी-सिंनापूर-वाठवड्यावरुन वाकि येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 153
  • Waki : तथा(चांगदेवभटी) जाडी परीत्यजणें :।।:
  • गोसावी उदेयांचि बिजें करीतिः स्याळे दिसः मां सीं वाजे म्हणौनि चांगदेवभट गोसावियां जाडीचें कोंगतें घालीतिः उन निगेः सीं फिटे आणि गोसावी उभेयां राहौनि श्रीमुगुट ऐसा लववीतिः श्रीमुकुटेंचि जाडी मागुतवाणी खाली घालीतिः परि तें तयासि चांगदेवभटासि स्फूरेनाः गोसावी म्हणतिः ‘‘बटिका जाडी घेयाः अग्नीचां संबंधु तवपर्येंत करावयाः जैसे पैर्‍हा गेलेया वातश्लेष्में न बधीतिः’’ चांगदेवोभट जाडी घेतिः झाडूनि घडी करौनि खांदावरि घालीतिः ऐसें प्रत्यही करीति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-एळवन-लाखापुरी-सिंनापूर-वाठवड्यावरुन वाकि येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)
  • Purvardha Charitra Lila – 159
  • Waki : वाकिये पांडेश्वरीं वसति :॥:
  • मग गोसावी वाठवडांसि बीजे केले : पांडेश्वरीं आसन जालेः मग चांगदेवभटी गोसावीयांसिं उदक ओळगविलेः आणि भिक्षे गेलेः भिक्षा करौनि आलेः गोसावीयांसिं झोळी दृष्टपुत केलीः पदार्थ निवडिलेः गोसावीयांसिं आरोगणे ओळगविलेः मग गोसावीयांसिं आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा ओळगविलाः मग तेथचि वसति जाली :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी वाठवड्यावरुन आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: