Waghali (वाघळी)

वाघळी, ता.कन्नड जि.जळगांव


येथील 1 स्थान - हे स्थान वाघळी गावातच गावाच्या पूर्वेकडे कृष्णपुरा भागात गावातच मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

वाघळी हे गाव, मालेगाव मुक्ताईनगर मार्गावर चाळीसगावहून ईशान्येस 12 कि.मी. आहे व भडगावहून नैर्ऋत्येस 24 कि.मी. आहे. सायगव्हाण ते वाघळी पायमार्गे 12 कि.मी. आहे. व नागद, कजगाव मार्गे 26 कि.मी. आहे. वाघळीला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. मुंबई-भुसावळ रेल्वेमार्गावरील चाळीसगाव-पाचोरा मधील वाघळी हे रेल्वे स्थानक आहे. वाघळी रेल्वे स्थानक ते वाघळी गाव 6 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान वाघळी गावाच्या पूर्व विभागी कृष्णपुरा विभागात पूर्वाभिमुख देवळात आहे. हे स्वामींच्या काळात हेमांडपंथी सिद्धेश्वर मंदिर होते, म्हणून आजही हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे. व सरकारी कागदावर ‘सिद्धेश्वर मंदिर’ म्हणून असले तरी हे मंदिर ‘श्रीकृष्ण मंदिर’ म्हणून प्रख्यात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सायगव्हाणहून वाघळीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते, (पू.ली. 380, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून कनाशीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वाघळीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 380
  • Vaghadi : वागुळिये गोपाळीं वस्ति :।।:
  • बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिलेः गोसावियांसी पूजावसर केलाः आरोगणाः गुळळाः विडाः पहूड जालाः वस्ति जाली :।।: (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे १५ दिवस वास्त्व्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाणवरुण वागुळिला आले व कनाशीकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: