Wadadhe (वडधे)

वडधे, ता.भडगांव जि.जळगांव


येथील 1 स्थान जुने वडधे गावाच्या नैर्ऋत्य विभागी गिरणा नदीच्या काठावर आहे.


जाण्याचा मार्ग :

जुने वडधे हे गाव भडगावहून नैर्ऋत्येस 6 कि.मी. आहे. येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानाजवळच महानुभाव आश्रम ही आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन व आरोगणा स्थान :

हे स्थान जुने वडधे हे गावाच्या नैर्ऋत्येस गावाबाहेर गिरणा नदीच्या पूर्व काठावर पश्चिमाभिमुख मंदिरात आहे. या स्थानाचे संचालक प.पु. श्री सचिन दादा बिडकर आहेत, त्यांनी येथे नदी काठी तैयार केलेली कमळ फुलांची बाग अवलोकनीय आहे. येथे सुमारे 170 कमळाच्या प्रजाती पाहायला मिळतील.

लीळा : नदी शेजारी वडाच्या झाडाखाली सर्वज्ञांना आसन झाले, महादाइसा, उमाइसा आणि बाइसा एका घरी भिक्षेला गेली तिथे त्यांना खूप चांगले चांगले भिक्षान्न मिळाले, त्या परत स्वामीजवळ येत असता स्वामींनी त्यांना दुरूनच पाहून म्हणाले की ‘आज यांना कामधेनू मिळाली.’ आणि स्वामींनी त्या भिक्षेला ‘कामधेनू’ नाव ठेवले, मग आरोगणा केली. (पु.ली. 388)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वडधे चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 388
  • Wadadhe : मार्गी कामधेनु नामकरण :।।: / मार्गी कामधेनु नामपुर्वक भीक्षान आरोगण :।।:
  • मार्गी बिजें करितां नदी होतीः ऐलाडीपैलाडी वांकी वडजि दोनी गावं: वडजिएपासी तेथ वड असेः तया वडातळीं गोसावियांसि आसन जालें: तिये दिसीं बारसीः पैलाडिला गावां वडजैएसि महादाइसें: उमाइसें: बाइसें मुंजीघरां एकां भिक्षे गेलीः तयातें आधिले दिसीं मुंजी जाली होतीः तेही ‘‘आइः याः’’ म्हणौनि बैसो घातलेः आधिली दिसीचे सिळे वडेः मांडेः पुरीयाः घारियां: उंबरेः लाडूः तिळवेः अमृतफळें: जेतुकें वर्‍हाडाचें तेतुकें सुदलेः चैवनी सेवैसरवळें वेळूनि सुदलीं: शाकवती रांधुनि सुदलीं: उष्ण भात रांधुनि सुदलाः तुपा भरली वाटी दिधलीः झोळीया भरीलियाः घेउनि आलीः गोसावी येतां दुरूनि देखिलेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मेयांचिया कामधेनू पातलिया गाः’’ झोळी गोसावियांसि दृष्टीपूत केलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘अन्न राशी एक आले मां:’’ खांडुवा पसरिलाः वरि झोळीया ठेविलियाः मग गोसावियांसि पूजा केलीः धुपार्ति मंगळार्ति केलीः भक्तिजनासहित आरोगणा जालीः गोसावियांसि गुळळाः विडा जालाः मग नावेक पहूडु जालाः उपहूडु जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने.. स्वामीचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात वेरुळ येथे 15 दिवस वास्तव्य होते. त्यानंतर स्वामी हातनुर-कन्नड-सायगव्हाण-वागुळिवरुण कनाशीला आले. येथे स्वामीचे काही काळ वास्त्व्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी वडजैएला आले नावेक पहूडु जालाः तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: