Vitkheda (विटखेडा)

विटखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान विटखेड गावाच्या पूर्वेकडे गावातच जुन्या मंदीरात आहे. मंदीरास कुलुप असते चावी मागावी लागते.


जाण्याचा मार्ग :

विटखेडा हे गाव, देवगाव (रंगारी) : वेरूळ सडकेवर देवगावहून पूर्वेस 5 कि.मी. आहे व वेरूळहून पश्चिमेस 9 कि.मी. आहे. देवगाव, गंगापूर कन्नड सडकेवर आहे व वेरूळ, औरंगाबाद-धुळे सडकेवर आहे. लासूरहून देवगाव (लासूर स्टेशन मार्गे) 14 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान विटखेडा गावाच्या पूर्व विभागी दक्षिणाभिमुख देवळात आहे. देवळात प्रवेश केल्यावर आपणास दोन ओटे दिसतील, त्यापैकी पश्चिम बाजूचे वसती स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात माटेगावहून विटखेड्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 229, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून लासूरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वसती स्थानाच्या पूर्वेचे 4 फूट 10 इंच अंतरावरील स्थान निर्देशरहित आहे.


विटखेड्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Vitkheda : इटखेडां वसति :॥:
  • मग (म्ह.माटखेड्यावरुण)गोसावी इटखेडयांसि बीजे केले : बाइसीं गोसावीयांचे श्रीचरणक्षाळन प्रक्षाळिलें: मग उपहारु निफजविलाः गुळुळा जालाः विडा ओळगविलाः पूजावसरु जालाः आरोगणा जाली : भक्तिजनां प्रसाद जालाः गोसावी पहुड स्विकरीलाः इटखेडां वसति जाली :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी वेरुळ-माटखेड्यावरुण आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: