दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिर (गोमटदेवाचे लेणे)

गोमटदेवाचे लेणे.


आताचे नाव- दिगांबर पार्श्वनाथ जैन मंदीर (जुने नाव-गोमटदेवाचे लेणे) - येथील 5 स्थान.
वरील लेणे - 
1,2) विहरण स्थान - लेण्यात प्रवेश करताच लेण्यातील डाव्या व उजव्या दोन्ही बाजुला तीर्थंकाराच्या मुर्ती सामरील दोन्ही ओटे नमस्कारी आहेत, डाव्या ओट्याजवळुन नमस्कार करण्याची पद्धत आहे. 
खालील लेणे - 
3,4) विहरण स्थान व आसन स्थान - या लेण्यातील चौक नमस्कारी आहे. तसेच लेण्यातील डाव्या व उजव्या दोन्ही बाजुला दोन्ही ओटे नमस्कारी आहेत.
चरणविहीरा - 
4) आसनस्थान - या लेण्यातील दोन्ही दारसंका नमस्कारी आहेत. उजव्या बाजुकडील ओटा नमस्कारी आहेत.


गोमटदेवाचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. गोमटदेवाच्या लेण्याकडे जाण्यासाठी लेणे क्रमांक 32 व 33 पासून रस्ता आहे. हे लेणे आता दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिर म्हणून ओळखले जाते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

40,41. आसन स्थान :

गोमटदेवाचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. गोमटदेवाच्या लेण्याकडे जाण्यासाठी लेणे क्रमांक 32 व 33 पासून रस्ता आहे. लेण्याच्या दोन्ही बाजूला उत्तर-दक्षिण पटीशाळा होत्या. त्या पटीशाळेवर सर्वज्ञांना आसन झाले. सध्या लेण्याच्या ठिकाणी नवीन देवळाचे काम झाल्याने पटीशाळांचे अस्तित्व राहिले नाही; परंतु स्थानांच्या जागा निश्चित आहेत. (स्था.पो.)


42,43. विहरण स्थाने :

गोमटदेवाच्या लेण्याकडून अनकैए लेण्याकडे जाताना मध्येच एक पश्चिमाभिमुख लेणे आहे. त्याचे सध्याचे नाव दिगंबर पार्श्वनाथ जैन (पहाड) मंदिर आहे. लेण्याच्या दोन्ही बाजूला हत्ती कोरलेले आहेत. या लेण्यातील उत्तर व दक्षिण बाजूचे ओटे विहरण स्थानाचे आहेत. (वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र. 892)

44. चरणविहिरा, लोंबता श्रीचरणी आसन स्थान :

लेण्याच्या दक्षिण बाजूच्या हत्तीच्या पुढील बाजूस (पश्चिम बाजूस) दोन देवळ्या आहेत. त्यापैकी दक्षिणेकडील देऊळी ही चरणविहिरा होय.
त्यातील दक्षिण बाजूच्या ओट्यावर सर्वज्ञांना लोंबता श्रीचरणी आसन झाले. (स्था.पो.)



गोमटदेवाचे लेणे चे स्थान : 5


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: