अनकैएचे लेणे

अनकैएचे लेणे


जुने नाव-अनकैचे लेणे -  येथील 5 स्थान.
1) विहरण स्थान - अनकैच्या लेण्यातील अग्निष्टीका खोलीतील चौक नमस्कारी आहे. 
2) संतोष नामकरण स्थान - अनकैच्या लेण्याजवळील लिंगाचे लेण्यातील चौक नमस्कारी आहे, व दारवंठ व दारसंका नमस्कारी आहेत. 
3) जळक्रिडा स्थान - अग्निष्टीका खोलीतील पाण्याचे टाके नमस्कारी आहेत. 
4) विहरण स्थान - अनकैच्या लेण्यापूढील लिंगाचे लेण्यातील चौक नमस्कारी आहे. 
5) जळक्रिडा स्थान - अनकैच्या लेण्यातील खोलीतील पाण्याचे टाके नमस्कारी आहेत.


अनकैएचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. चरणविहिरापासून अनकैए लेण्याकडे जाण्यास रस्ता आहे

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

45. विहरण स्थान :

अनकैएचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. चौकावर सिमेंटची फरशी बसविलेली आहे. चरणविहिरापासून अनकैए लेण्याकडे जाण्यास रस्ता आहे. (स्था.पो.)


46. संतोषा भेटी, नामकरण स्थान :

अनकैएच्या लेण्याजबळ दुसरे एक दक्षिणाभिमुख लिंगाचे लेणे आहे. त्या लेण्याच्या दारसंका व दरवाजातील जागा नमस्कारी आहे.

लीळा : एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू अनकैएच्या लेण्याकडे विहरणासाठी आले. दक्षिणाभिमुख लिंगाच्या लेण्यात एक अन्य जोगी महात्मे बसले होते. सर्वज्ञांनी लेण्याच्या दोन्ही दारसंका धरून त्यांना विचारले, “माहात्मा:आपण एथ असिजे?” तीही म्हणीतले : “असो सुखे संतोखे’ ए नगरीची भिक्षा कीजे?” “कीजे सुखेसंतोखे:”एथ जेविजे?””जेऊ सुखेसंतोखे:” “एथ नीद्रा करा?” “करूं सुखेसंतोखे” यावरून सर्वज्ञांनी त्यांचे संतोष असे नाव ठेवले आणि त्यांना सर्वज्ञांच्यापासून स्थिती झाली. तेव्हापासून ते सर्वज्ञांच्या सान्निध्यातच राहू लागले. (पू.ली. 205, वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र.892)


47. जळक्रीडा स्थान :

अनकैएच्या लेण्याजवळ उत्तराभिमुख पाण्याचे टाके आहे. तेच जळक्रीडा स्थान होय.

लीळा : सर्वज्ञांनी या पाण्याच्या टाक्यामध्ये जळक्रीडा केली. (वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र.892)


48. विहरण स्थान:

अनकैए लेण्याच्या पुढच्या बाजूस तिसरे एक दक्षिणाभिमुख लिंगाचे लेणे आहे. त्या लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. (स्था.पो.)


49. जळक्रीडा स्थान :

दक्षिणाभिमुख लेण्याजवळ नैर्ऋत्याभिमुख पाण्याचे टाके आहे. तेच जळक्रीडा स्थान होय.

लीळा : सर्वज्ञांनी या पाण्याच्या टाक्यामध्ये जळक्रीडा केली. (वे.स्था.पो.)


अनकैएचे लेणे चे स्थान : 5


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: