लेणे क्रमांक 8 :

लेणे क्रमांक 8.


लेणे क्र. 8 - लेण्याला नाव नाही - येथील 1 स्थान. 
1) विहरण स्थान - बुद्धमुर्तीसमोरील दोन खांबामधील जागा नमस्कारी आहे. व दोन खांबापैकी पश्चिमेकडील खांब नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


या लेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, गाभाऱ्यातभोवती प्रदक्षिणापथाची सोय हे होय. स्वतंत्र गर्भगृह व बोधिसत्त्व (अवलोकितेश्वर, वज्रपाणी), जंभाल (पांचिक) व हारिती (एक देवता) यांच्या मूर्ती येथष आढळतात. गर्भगृहात प्रलंबपादासनातील बुद्धमूर्ती असून तिच्या दोन्ही बाजूंस वज्रपाणीची आणि मंजुश्रीची मूर्ती आहे. मंजुश्रीच्या शिरोभूषणात स्तूप कोरलेला आहे. या मूर्तीची स्त्री- सेविका तिच्या वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे लक्षणीय वाटते. अंतराळाच्या उजव्या भिंतीवर महामयूरीची मूर्ती आहे. गर्भगृहासमोर मंडप आहे. यात तारा त्याचप्रमाणे जंभाल व हारिती यांच्या मूर्ती आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

विहरण स्थान :

बुद्धमुर्तीसमोरील दोन खांबामधील जागा नमस्कारी आहे. व दोन खांबापैकी पश्चिमेकडील खांब नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 8 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: