लेणे क्रमांक 33: जगन्नाथ सभा (मल्हार वसैए)

लेणे क्रमांक 33.


लेणे क्र.33 - आताचे नाव-जगनन्नाथसभा लेणे (जुने नाव-मल्हारवसैए लेणे) - जगनन्नाथसभा लेन्या दुमजली आहेत, पश्चिमाभीमुख पूर्वाभीमुख दोन्ही लेन्या मधे 3 विहरण स्थाने, 2 अवस्थान स्थाने आहेत. - येथील 5 स्थान.
वरचा मजला- 
1) विहरण स्थान - लेण्यातील दुसर्या मजल्यावरील चौक नमस्कारी आहे. 4 खांबा पैकी मधील 2 खांबामधील जागेतुन नमस्कार करण्याची पद्धत आहे. 
2) विहरण स्थान - याच लेण्यातील गाभारा नमस्कारी आहे. 
खालचा मजला 
1) मादने स्थान - खालच्या मजल्यावरील लेण्यातील प्रवेशद्वाराजवळचा पूर्ण चौक नमस्कारी आहे. 
2) अवस्थान स्थान - खालच्या मजल्यावरील लेण्यातील डाव्या व उजव्या दोन्ही बाजुला तीर्थंकाराच्या मुर्ती सामरील दोन्ही ओटे नमस्कारी आहेत. 3) आसन स्थान - पश्चिमाभिमुख देवळीतील ओटा नमस्कारी आहे. 
4) विहरण स्थान - मल्हारवसैए अंतर्गत आठ पायर्या उतरल्यावर पटीशाळेचा चौक नमस्कारी आहे.


`जगन्नाथ सभा’ ह्या नावाचे हे लेणे दुमजली आहे. तळमजल्यातील लेण्यात मातंग आणि सिद्धायिका यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत. वरच्या मजल्यावर बारा खांबांचा मंडप असून भिंतीत व गर्भगृहात तीर्थंकर प्रतिमा आहेत. महावीर प्रतिमेलाच जगन्नाथ समजून या लेण्याला त्याचे नाव दिले गेले असावे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

34. विहरण स्थान :

हे स्थान जगन्नाथ सभा लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील मंडपाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. (वे.स्था.पो.) काटैवसैएच्या पूर्वाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील चौकाच्या नैऋत्य कोपऱ्यातून जगन्नाथ सभा लेण्याच्या दुसऱ्या मजल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे.


नमस्कारी पायऱ्या


नमस्कारी खोली


35. विहरण स्थान :

हे स्थान जगन्नाथ सभा लेण्याच्या खालील मजल्याच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आह. (वे.स्था.पो.) खालील मजल्याकडे जाण्यासाठी दुसऱ्या मजल्याच्या मंडपाच्या आग्नेय कोपऱ्यातून जिना आहे.


36.37. अवस्थान स्थाने :

चौकाच्या दोन्ही बाजूला देवळ्या आहेत. एक पूर्वाभिमुख व एक पश्चिमाभिमुख आहे. दोन्हीही देवळ्यांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ति कोरलेल्या आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओट्यांना प्रत्येकी दोन हत्तीच्या सोंडी आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओटे अवस्थानाच आहेत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूचे चतुर्विधाच्या मढात वास्तव्य असताना ब्रह्मसानाने आपल्या शिष्यांकरवी दोन वेळा विषात घोळलेल्या सुपारीच्या फोडी त्यांना अर्पण केल्या. पहिल्या वेळेस अर्पण केलेल्या फोडी सर्वज्ञांनी दृष्टीने अवलोकून निर्विष केल्या. दुसऱ्या वेळेस अर्पण केलेल्या सुपारीच्या विषारी फोडींचा त्यांनी स्वीकार केला. त्या विषाचा परिहार सर्वज्ञांनी येथे राहुन केला. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 203, स्था.पो.)


पूर्वाभिमुख देवळी


पश्चिमाभिमुख देवळी


38. विहरण स्थान :

मल्हार बसैएच्या शेजारी पूर्वाभिमुख लेणे आहे. लेण्यात चढून जाण्यासाठी 8 पायऱ्या आहेत. चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. हे लेणे 33 क्रमांकामध्येच अंतर्भूत आहे. (वे.स्था.पो.)


लेणे क्रमांक 33 चे स्थान : 5


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: