लेणे क्रमांक 32: इंद्रसभा (काटैवसैए)

लेणे क्रमांक 32.


लेणे क्र.32 - आताचे नाव-इंद्रसभा लेणे (जुने नाव-काटवसैए लेणे) - येथील 8 स्थान.
खालचा मजला - 
1) विहरण स्थान - लेण्यात जाळीच्या दारातून प्रवेश करताच लेण्यातील चौक नमस्कारी आहे. परंपरने पश्चिम खांबाजवळुन नमस्कार करण्याची पद्धत आहे. 
दुसरा मजला
2) विहरण स्थान - दुसर्या मजल्यावरील दक्षिणाभिमुख लेण्यातील चौक नमस्कारी आहे. परंपरने पश्चिम खांबाजवळुन नमस्कार करण्याची पद्धत आहे. 
3) विहरणस्थान - पश्चिमाभीमुख लेण्यातील चौक नमस्कारी आहे. 
4,5) आसणस्थान - दुसर्या मजल्यावरील याच पश्चिमाभीमुख लेण्यातील डाव्या व उजव्या बाजुचे दोन्ही ओटे नमस्कारी आहेत. 
6) विहरणस्थान - दुसर्या मजल्यावरील पूर्वाभीमुख लेण्यातील चौक नमस्कारी आहे. 
7,8) आसणस्थान - दुसर्या मजल्यावरील याच पूर्वाभीमुख लेण्यातील डाव्या व उजव्या बाजुचे दोन्ही ओटे नमस्कारी आहेत.


हे इंद्रसभा नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या प्रांगणात मधोमध एका उंच चौथऱ्यावर तीर्थंकराचे सर्वतोभद्र प्रतिमागृह आहे. या प्रतिमागृहाला चारही बाजूंस दोन खांब असलेले अग्रमंडप आहेत. मंदिरावर द्राविड पद्धतीचे शिखर आहे. मंदिरनिर्मितीचे तंत्र कैलासाप्रमाणेच म्हणजे वरून खाली आहे. प्रांगणाच्या तिन्ही बाजूंस दुमजली लेणी कोरलेली आहेत. या लेण्यांच्या कक्षासनांवर कैलासाशी साम्य दर्शविणारी गजमुखे कोरलेली आहेत. प्रांगणाच्या दक्षिण आणि उत्तरेकडील भिंतींत पार्श्वनाथ, गोमटेश्वर, सिद्धायिका, मातंग यक्ष आणि इतर काही तीर्थंकर यांची शिल्पे आहेत. मंडपाचे खांब घटपल्लव आणि इतर शिल्पे यांनी सुशोभित केले आहेत, छतावर कमळ कोरलेले आहे. मंडपाच्या मागील भिंतीत पार्श्वनाथ, महावीर व गोमटेश्वर यांच्या प्रतिमा आहेत. या मंडपाच्या छतावर चित्रकारीचे पुसट अवशेष दिसतात.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

इंद्रसभा लेण्याचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. इंद्रसभा लेणे दुमजली असून प्रवेशद्वाराच्या आत दक्षिणाभिमुख, पूर्वाभिमुख व पश्चिमाभिमुख लेणी आहेत. या लेण्यात सर्वज्ञांची एकूण आठ विहरण स्थाने आहेत. ही स्थाने म्हणजे सर्वज्ञांची विहरण प्रसंगीची बसण्याची ठिकाणे होत.

26. विहरण स्थान :

दक्षिणाभिमुख लेण्याच्या खालील मजल्याच्या मोठ्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. (वे.स्था.पो.)


27. विहरण स्थान :

दक्षिणाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील मंडपाच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. (वे.स्था.पो.)
दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पहिल्या मजल्याच्या पूर्व बाजूने जिना आहे.


28. विहरण स्थान :

हे स्थान पश्चिमाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावर चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. पश्चिमाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्याकडे जाण्यासाठी दक्षिणाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील मंडपाच्या आग्नेय कोपऱ्यातून रस्ता आहे. (वे.स्था.पो.)


29,30. विहरण स्थाने :

चौकाच्या दोन्ही बाजूला देवळ्या आहेत. एक उत्तराभिमुख व एक दक्षिणाभिमुख आहे. दोन्हीही देवळ्यांत तीर्थकरांच्या मूर्ति कोरलेल्या आहेत.
दोन्हीही देवळ्यांतील ओटे विहरण स्थानाचे आहेत. (वे.स्था.पो.)


दक्षिणाभिमुख देवळी


उत्तराभिमुख देवळी


31. विहरण स्थान :

हे स्थान पूर्वाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावर चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. (वे.स्था.पो.) पूर्वाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्याकडे जाण्यासाठी दक्षिणाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील मंडपाच्या नैर्ऋत्य कोपऱ्यातून रस्ता आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


32,33. विहरण स्थाने :

चौकाच्या दोन्ही बाजूला देवळ्या आहेत, एक उत्तराभिमुख व एक दक्षिणाभिमुख आहे. दोन्हीही देवळ्यांमध्ये तीर्थंकरांच्या मूर्ति कोरलेल्या आहेत. दोन्हीही देवळ्यांतील ओट्यांना प्रत्येकी दोन हत्तीच्या सोंडी आहेत. दोन्हीही देवळ्यातील ओटे विहरण स्थानाचे आहेत. (वे.स्था.पो.)


दक्षिणाभिमुख देवळी


उत्तराभिमुख देवळी


लेणे क्रमांक 32 चे स्थान : 8


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: