लेणे क्रमांक 29 : सिता की न्हाणी (शंकर लेणे/दुमार लेणे)

लेणे क्रमांक 29.


लेणे क्र.29- आताचे नाव-सिता की न्हानी लेणे (जुने नाव-शंकर/धुमाळाचे लेणे) - येथील 3 स्थान.
1) विहरण स्थान - या लेण्यात प्रवेश केल्यावर आठ खांबामधील चौक नमस्कारी आहे. परंपरने डावीकडच्या खांबापैकी 3 व 4 चे खांबामधील जागेतुन नमस्कार करण्याची पद्धत आहे. 
2) विहरण स्थान - उत्तरेकडील 8 पायर्या उतरल्यावर पटीशाळेचा मोठा ओटा नमस्कारी आहे.
3) विहरण स्थान - दक्षिणेकडील खाली जानार्या बाजुस 25 पायर्या आहेत त्यातील पहील्या पायरीवर नमस्कार करण्याची पद्धत आहे. (परंपरने बोलले जाते) 


हिंदू धर्मीय लेण्यांमध्ये `सीता की नहाणी’ या नावाने हे लेणे (45·11 X 45·41 मी.) प्रसिद्ध आहे. यातील शिल्पे भव्य असूनही कलाहीन आहेत. अग्रमंडपाच्या अधिष्ठानावर भव्य सिंहशिल्पे आहेत, तर भिंतीवर रावणानुग्रह आणि अंधकासुरवध यांचे शिल्पपट आहेत. सभामंडपाच्या मागील गर्भगृहात शिवलिंग आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

24. विहरण स्थान :

शंकर लेणे पशिचमाभिमुख असून भव्य आहे. उत्तराभिमुख व दक्षिणाभिमुख असे आणखी दोन दरवाजेही या लेण्यास आहेत. तिन्हीही दरवाजांच्या सोंडीवर सिंह कोरलेले आहेत. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.

लेण्यात प्रवेश केल्यावर आठ खांबामधील चौक नमस्कारी आहे. परंपरने डावीकडच्या खांबापैकी 3 व 4 चे खांबामधील जागेतुन नमस्कार करण्याची पद्धत आहे.

लीळा : (1) सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना लेण्याच्या चौकात आसन होत असे. (स्था.पो.) (2) शंकरेश्वरी बोणे कथन. (पू.ली. 212)


25. विहरण स्थान : दुमार लेणे (धुमाळाचे लेणे)

शंकर लेण्याच्या उत्तराभिमुख दरवाजातून उत्तराभिमुख 8 पायऱ्या उतरल्यावर उजव्या हातास वायव्य-आग्नेय, नैर्ऋत्याभिमुख पटीशाळा आहे. पटीशाळेत मोठा ओटा आहे. तेच विहरण स्थान होय. हे लेणे, क्रमांक 29 मध्येच अंतर्भूत आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या लेण्यात विहरणासाठी आल्यावर त्यांना या ओट्यावर आसन होत असे. (स्था.पो.)


विहरण स्थान :

दक्षिणेकडील खाली जानार्या बाजुस 25 पायर्या आहेत त्यातील पहील्या पायरीवर नमस्कार करण्याची पद्धत आहे. (परंपरने बोलले जाते)


लेणे क्रमांक 29 चे स्थान : 2+1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: