लेणे क्रमांक 16 : कैलास लेणे (माणिकेश्वर लेणे)

लेणे क्रमांक 16.


लेणे क्र.16 - आताचे नाव-कैलास लेणे (जुने नाव-मानीकेश्वर लेणे) - येथील 7 स्थान.
खालचा मजला - 
1) आसन स्थान - लेण्याताच शिरताच गजलक्षमिच्या मूर्ती सामोरचा ओटा नमस्कारी आहे. 
दुसरा मजला - 
1) आसन स्थान - दुसऱ्या मजल्यावर मोठ्या देवळाच्या उत्तरेकडे मोठ्या गुप्त माणिकेश्वर लेण्यासमोरील पटीशाळेचा पूर्ण चौक नमस्कारी आहे. 2) विहरण स्थान - दुसऱ्या मजल्यावर पश्चिमाभिमुख देवळाच्या माणिकेश्वर लेण्यासमोरील पटीशाळेचा चौक व वर जातानाचा उंबरवट नमस्कारी आहे. 
3) विहरण स्थान - दुसऱ्या मजल्यावर पाचदेवळ्याच्या उंबरवटाचे आतील भाग नमस्कारी आहे. (परंपरने) 
4) भुयार स्थान - नन्दी साज्या जवळील दक्षिणाभीमुख भुयाराची जागा (उंबरवटाचे आतील भाग) नमस्कारी आहे. 
5) नाचानी चोरी स्थान - मानीकेश्वर लेण्या जवळील तीन मजली लेण्यातील दुसर्या मजल्यावर लेण्यासमोरील पटीशाळेचा चौक व भींतीजवळच्या खांबांच्या पटीशाळेच्या मधील जागा नमस्कारी आहे.
तिसरा मजला
1) जळक्रीडा स्थान - तिसऱ्या मजल्यावर लेण्यासमोरील पटीशाळेचा चौक नमस्कारी आहे. 
2) पूजा/आरोगणा स्थान - जळक्रीडास्थान पूर्वेकडे खिडकी खालची जागा नमस्कारी आहे.


हे कैलास लेणे म्हणून ओळखले जाते. `माणकेश्वर’ असाही त्याचा उल्लेख सापडतो. सर्वच दृष्टींनी हे लेणे भव्य असून, ते वेरूळचा मुकुटमणी मानले जाते. `आधी कळस मग पाया’ हे वचन ह्या वास्तुरूपात पाहावयास मिळते. या लेण्याच्या निर्मितीस राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत प्रारंभ होऊन, पहिल्या कृष्णराजाने (कार. सु. 756-773) त्यास पूर्ण रूप दिले. पुढील राजांच्या काळात या शिवमंदिराच्या ओव्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर इ. खोदण्यात आली.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

कैलास लेणे पश्चिमाभिमुख आहे. हे लेणे भव्य व प्रेक्षणीय आहे. या लेण्यात सर्वज्ञांची एकूण सात स्थाने आहेत. लेण्यात जाण्यासाठी 25 रुपयांचे तिकिट काढावे लागते. दर शुक्रवारी प्रवेश विनाशुल्क आहे.

13. विहरण स्थान :

लेण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच समोरच, पाषाणावर कोरलेल्या गजलक्ष्मीच्या मूर्तीखाली उत्तर-दक्षिण ओटा आहे. तेच विहरण स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आल्यावर कधी कधी त्यांना या ओट्यावर आसन होत असे.(वे.स्था.पो.)


14. विहरण स्थान :

लेण्याच्या मध्यभागी पाषाणातच कोरलेले एकसंघ माणिकेश्वराचे पश्चिमाभिमुख भव्य देऊळ आहे. त्या देवळाच्या उत्तरेस दुसऱ्या मजल्यावर गुप्त माणिकेश्वराचे पश्चिमाभिमुख भव्य लेणे आहे. सभामंडपाच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. गुप्त माणिकेश्वराकडे जाण्यासाठी लेण्यातील उत्तर बाजूच्या हत्तीजवळच्या पूर्व-पश्चिम पटीशाळेच्या पूर्व बाजूने जिना आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आल्यावर कधी कधी त्यांना या लेण्याच्या चौकात आसन होत असे. (वे.स्था.पो.)


15. विहरण स्थान :

लेण्यात मध्यभागी असलेल्या माणिकेश्वराच्या पश्चिमाभिमुख देवळाच्या सभामंडपाच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे. माणिकेश्वराकडे जाण्यासाठी उत्तर व दक्षिण बाजूने जिना आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभ कैलास लेण्यात विहरणासाठी आल्यावर माणिकेश्वराच्या सभामंडपाच्या चौकात त्यांना आसन होत असे. सर्वज्ञ येथे भक्तजनांना परावर शास्त्राचे निरूपण करीत असत. (पू.ली. 187,214,216 स्था.पो.)


16. भुयाराचे स्थान :

माणिकेश्वराच्या देवळापुढे तीन नंदीचे साजे आहेत. पश्चिमेच्या तिसऱ्या साजेयाच्या उत्तराभिमुख दरवाजासमोर दक्षिणाभिमुख भुयार आहे. भुयारातील जागा नमस्कारी आहे. (भुयार बुजवून बंद केलेले आहे.)

लीळा : एके दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आले. नंतर ते या भुयारापाशी आले. सर्व भक्तजनांसहित सर्वज्ञ या भुयारातून इशाळुवाच्या लेण्याकडे गेले. (पू.ली. 187, स्था.पो.)


17. पेखणीका चोरी कथन स्थान :

माणिकेश्वराच्या दक्षिणेस तीन मजली उत्तराभिमुख लेणे आहे. दुसऱ्या मजल्यावरील लेण्यात हे स्थान आहे.

लीळा : एके दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू कैलास लेण्यात विहरणासाठी आले. माणिकेश्वराच्या चौकात त्यांना थोडा वेळ आसन झाले. नंतर ते दुसऱ्या मजल्यावरील लेण्यात आले. भुयाराच्या दारापाशी चरणचारी उभे राहून सर्वज्ञ म्हणाले, “या लेण्याच्या चौकात नृत्य होत होते. त्यावेळी चोरांनी येऊन नृत्य करणाऱ्या स्त्रियांचे या भुयारातून अपहरण केले.” असे म्हणून त्यांनी भुयाराची जागा भक्तजनांना दाखविली. (पू.ली. 202 ख.प्र.स्था.पो.वि.स्था.पो.892)


18. जळक्रीडा स्थान :

हे स्थान तिसऱ्या मजल्यावरील लेण्यात आहे. लेण्याच्या चौकातील जागा नमस्कारी आहे. बाहेरूनच नमस्कार करावा.

लीळा : या ठिकाणी सर्वज्ञ भक्तजनांसोबत जळक्रीडा खेळले. (पू.ली. 216, वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र. 892)


19. पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान जळक्रीडा लेण्याच्या पूर्व-पश्चिम पटीशाळेत पूर्व बाजूस खिडकीच्या खाली आहे.
लीळा : जळक्रीडा खेळल्यानंतर सर्वज्ञांना येथे आसन झाले. बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. मग दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. (पू.ली. 216, स्था.पो.)



लेणे क्रमांक 16 चे स्थान : 6


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: