लेणे क्रमांक 15: दशावतार लेणे (धुमेश्वराचे लेणे)

लेणे क्रमांक 15.


लेणे क्र. 15 - आताचे नाव-दशावतार लेणे (जुने नाव-धुमेश्वराचे लेणे) - येथील 3 स्थान.
खालचा मजला -
1) विहरणस्थान - लेण्यात प्रवेश मोठ्या लेण्यासमोरील लहान पूर्वाभीमुख लेण्यातील चौक नमस्कारी आहे. 
2) आसणस्थान - खिडकीखालचा पाषानाचा उत्तर-दक्षिण ओटा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 
दुसरा मजला - 
1) आसणस्थान - दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करतांना उत्तरेकडचा डाव्या बाजुचा पाषानाचा पूर्ण ओटा नमस्कारी आहे. तथापी या ओट्यास परंपरने डाव्या बाजुने नमस्कार करण्याची पद्धत आहे.


हे लेणे `दशावतार’ लेणे म्हणून प्रख्यात आहे. गतिमान शिल्पे, राष्ट्रकूट दंतिदुर्गाचा उत्कीर्ण लेख आणि पुराणातील कथा दाखविणारे शिल्पपट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत. हे लेणे दुमजली आहे. त्याच्या दर्शनी खांबाच्या माथ्यावर भूमिस्पर्शमुद्रेतील बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

11. विहरण स्थान :

दशावतार लेण्यात चढून जाण्यासाठी 49 पायऱ्या आहेत. लेण्याचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दुमजली पश्चिमाभिमुख लेण्यासमोर पूर्वाभिमुख लेणे आहे. त्या लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभ येथे विहरणासाठी आल्यावर त्यांना या लेण्याच्या चौकात आसन होत असे. (वे.स्था.पो.वि.स्था.पो.क्र.892)


आसन स्थान :

खिडकीखालचा पाषानाचा उत्तर-दक्षिण ओटा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते)


12. विहरण स्थान :

हे स्थान पश्चिमाभिमुख लेण्याच्या दुसऱ्या मजल्यावर आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पहिल्या मजल्याच्या उत्तर बाजूने जिना आहे. दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करताच उत्तर बाजूस (डाव्या हातास) ओटा आहे, तेच विहरण स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ विहरणासाठी आल्यावर त्यांना याही ओट्यावर आसन होत असे. (वे.स्था.पो.बि.स्था.पो.क्र. 892)


लेणे क्रमांक 15 चे स्थान : 2+1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: