लेणे क्रमांक 12 : तीन ताल (थोरला राजविहार)

लेणे क्रमांक 12.


लेणे क्र. 12 - आताचे नाव-तिन ताल लेणे (जुने नाव-थोरला राजविहार लेणे) - येथील 7 स्थान.
खालचा मजला - 
या मजल्यावर प्रवेश करतांना पाषानाचा उत्तर-दक्षिण पटीशाळेचा उत्तरेकडचा ओटा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 
तिसरा मजला -
1) अवस्थान स्थान - तिसऱ्या मजल्यावर प्रवेश करतांना पाषानाचा उत्तर-दक्षिण पटीशाळेचा उत्तरेकडचा माचा/ओटा नमस्कारी आहे. 
2) आरोगणा स्थान - ओट्या उत्तरेकडची लहान खोली नमस्कारी आहे. 
3) मादने स्थान - माचा/ओटा याच्या नैऋत्येकडे पटीशाळेचा पहील्या खांबांजवळील जागा नमस्कारी आहे.
तीन्ही मजले
1,2,3) वेढेस्थान - तीन्ही मजल्यावरील पटीशाळा नमस्कारी आहेत. 


दो ताल लेण्याच्या शेजारी `तीन ताल’ या नावाने ओळखले जाणारे हे तीन मजली लेणे आहे. साधे स्तंभ पण लेण्यात शिल्पाकृतींची रेलचेल हे या लेण्याचे वैशिष्ट्य.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

4. अवस्थान स्थान :

राजविहार लेणे तीन मजली असून पश्चिमाभिमुख आहे. तिसऱ्या मजल्यावर अवस्थान स्थान आहे. पहिल्या मजल्याहून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पहिल्या मजल्याच्या प्रारंभीच्या पटीशाळेच्या दक्षिण बाजूने जिना आहे. दुसऱ्या मजल्याहून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दुसऱ्या मजल्याच्या प्रारंभीच्या पटीशाळेच्या उत्तर बाजूने जिना आहे. तिसऱ्या मजल्यावर प्रवेश करताच समोरच पाषाणावर कोरलेला उत्तर-दक्षिण ओटा आहे. तेच अवस्थान स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू पूर्वार्धात पहिल्या वेळेस गदान्याहून वेरूळला आले. त्यावेळी त्यांचे येथे तीन दिवस वास्तव्य होते. त्यांना या ओट्यावर आसन, श्रीचरण-प्रक्षाळण,गुळळा, विडा,पहूड, उपहुड होत असे व तिन्हीही पूजावसर याच ओट्यावर होत असत. (पू.ली.179,स्था.पो.)

(2) घोर शब्द श्रवण, (पू.ली. 180)


5. आरोगणा स्थान :

अवस्थानाच्या ओट्याच्या उत्तर बाजूस दक्षिणाभिमुख खोली आहे. खोलीतच आरोगणा स्थान आहे. खोली नमस्कारी आहे. बाहेरूनच नमस्कार करावा.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू या खोलीत बसून आरोगणा करीत होते. (स्था.पो.)


6. मादने स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानाच्या नैर्ऋत्येस प्रारंभीच्या पटीशाळेच्या दुसऱ्या खांबाशीच आहे. (वि.स्था.पो.क्र.892 व 1625)


7,8,9. वेढे स्थाने :


राजविहार लेण्याच्या तिन्हीही मजल्यांच्या प्रारंभीच्या पटीशाळा नमस्कारी आहेत. या नमस्कारी पटीशाळा म्हणजेच वेढे स्थाने होत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आरोगणा झाल्यावर तिन्हीही मजल्यांच्या प्रारंभीच्या पटीशाळेवर वेढे करीत होते. (स्था.पो.)


खालचा मजल्यावर प्रवेश करतांना पाषानाचा उत्तर-दक्षिण पटीशाळेचा उत्तरेकडचा ओटा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते)


लेणे क्रमांक 12 चे स्थान : 6


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: