लेणे क्रमांक 10: विश्वकर्मा सुतार झोपडी (कोकसवाढयाचे लेणे)

लेणे क्रमांक 10.


लेणे क्रमांक 10 - आताचे नाव-विश्वकर्मा लेणे (जुने नाव-कोकसवाढ्याचे लेणे) - येथील 3 स्थान.
खालचा मजला - 
1) विहरण स्थान - बुद्धमुर्तीसमोरील चौक नमस्कारी आहे. 
2) आसन स्थान - बुद्धमुर्तीसमोरील उजव्या पाया जवळची ओट्यावरील जागा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 
वरचा मजला - 
1) विहरण स्थान - वरचा मजल्यावरील जाळीच्या दारा आतील जागा व उंबरठा नमस्कारी आहे.


हे लेणे ‘विश्वकर्मा लेणे’ किंवा ‘सुतार लेणे’ या नावाने विख्यात आहे. जुने नाव कोकसवाढ्याचे लेणे आहे. यात लाकडी बांधणीच्या चैत्यगृहाचा ठसा उमटलेला दिसतो व त्यामुळे या लेण्याला सुतार लेणे असे नाव पडले असावे. येथे काष्ठकामाची परंपरा खडकाच्या कोरीव कामातही जोपासली गेली. त्यामुळेच या लेण्याच्या दक्षिणेकडील व्हरांड्यात तुळ्या आणि लगी खडकातच कोरलेल्या आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

1. विहरण स्थान :

कोकसवाढयाचे लेणे पश्चिमाभिमुख आहे. लेण्याच्या चौकात विहरण स्थान आहे. बुद्धमुर्तीसमोरील चौक नमस्कारी आहे.

लीळा ; सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी आल्यावर त्यांना लेण्याच्या चौकात आसन होत असे. (स्था.पो.)


2. विहरण स्थान :

या लेण्यातील दुसरे विहरण स्थान दुसऱ्या मजल्यावर आहे. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पूर्व-पश्चिम, दक्षिणाभिमुख पटीशाळेच्या पश्चिम बाजूने जिना आहे. वर गेल्यावर कमानीच्या खाली लाकडी चौकट बसवलेली पश्चिमाभिमुख ओसरी आहे. त्या ओसरीत विहरण स्थान आहे. (स्था.पो.)


बुद्धमुर्तीसमोरील उजव्या पाया जवळची ओट्यावरील जागा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते)


लेणे क्रमांक 10 चे स्थान : 3


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: