Vandev (वनदेव)

वनदेव, ता. जि. अहमदनगर


वनदेव हे गाव नसुन स्थानाचे नाव आहे. हे ठिकाण अहमदनगर ते पाथर्डी रोडवरील मराठवाडी गावापासुन उत्तरेस 1.5 कि.मी.अंतरावर उंच टेकडीवर आहे.


जाण्याचा मार्ग :

अहमदनगर-पाथर्डी मार्गावरील मराठवाडी गावापासून उत्तरेस दीड कि. मी.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान अहमदनगर-पाथर्डी मार्गावरील मराठवाडी गावापासून उत्तरेस दीड कि. मी. अंतरावर डोंगराच्या आडोशाला पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना, त्यांच्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात खांडगावहून केळीपिंपळगावला जाताना येथे थोडा वेळ आसन झाले, असे परंपरेने बोलले जाते. अद्याप लेखी पुरावा उपलब्ध झालेला नाही, येथे फाग पोर्णिमेला यात्रा सुद्धा भरते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वनदेव चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: