Vambori (वांबोरी)

वांबोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर


येथील स्थाने वांबोरीच्या भव्य मंदीरात मुख्य स्थाना सहीत 7 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

वांबोरी हे गाव, राहुरी ते पांढरीचा पूल या मार्गावर राहुरीहून आग्नेयेस 17 कि. मी. व पांढरीच्या पुलापासून वायव्येस 12 कि. मी. आहे. (राहुरी हे गाव नगर-मनमाडमार्गावर आहे व पांढरीचा पूल नगर-औरंगाबाद मार्गावर आहे.) डोंगरगण ते वांबोरी 6 कि. मी. अहमदनगर ते वांबोरी 25 कि.मी. बेलापूर ते वांबोरी 37 कि. मी. वांबोरी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. वांबोरी हेदौंड मनमाडलोहमार्गावरील नगर वराहरीमधील रेल्वेस्थानक आहे. वांबोरी रेल्वेस्थानकापासून वांबोरी गाव 6 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. अवस्थान व वसती स्थान :

हे स्थान वांबोरी गावाच्या दक्षिणेस दोन फर्लाग अंतरावर कर्परा नदीच्या पश्चिम काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे दक्षिणेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात डोंगरगणंहून वांबोरीला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते (पू.ली. 367, स्था पो.) व उत्तरार्धात नागापूरहून वांबोरीला आले. त्यावेळी त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (उ.ली. 239 ख प्रत)

अवस्थान स्थानाच्या पूर्व बाजूचे स्थान, पूजा आरोगणास्थान असल्याचे स्थान मार्गदर्शक ग्रंथात नमूद केलेले आहे. परंतु पूजा आरोगणेचे स्वतंत्र स्थान असल्याचा उल्लेख लीळाचरित्रात व स्थानपोथीत नाही.

देवळाच्या सभामंडपातील गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दक्षिण बाजूचे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. मर्दना स्थान :

हे स्थान निर्देशरहित स्थानापासून ईशान्येस 5 फूट 8 इंच अंतरावर आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. मादने स्थान :

हे स्थान मर्दना स्थानापासून आग्नेयेस 3 फूट 6 इंच अंतरावर आहे. (स्था.पो)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. परिश्रय स्थान :

हे स्थान देवळाच्या पाठीमागे आहे. (स्था. पो. शा. खा. प्रत) परिश्रय स्थानापासून ईशान्येस 50 फूट अंतरावरील देवळाच्या उत्तरेचे ‘खिडकी स्थान’ म्हणून ओळखले जाणारे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. आसन स्थान :

हे स्थान निर्देशरहित खिडकी स्थानापासून आग्नेयेस 24 फूट अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू डोंगरगणन आल्यावर प्रथम बाइसा देऊळ झाडण्यासाठी गेल्या. तेव्हा तेथे खूप डास होते. बाइसा सर्वज्ञांना म्हणाल्या, “जी जी येथे खूप डास आहेत.” सर्वज्ञ म्हणाले, “दरवाजा लावून लिंबाच्या काड्यांचा धूर करा, म्हणजे डास निघून जातील.” त्याप्रमाणे बाइसांनी दरवाजा लावून लिंबाच्या काड्यांचा धूर केला. देऊळ झाडले, तोपर्यंत सर्वज्ञ येथे बसलले होते. (पू.ली.367, स्था.पो.उ.शा.खा.द. प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. आसन स्थान :

हे स्थान आसन स्थान क्रमांक 5 पासून आग्नेयेस 17 फूट अंतरावर भिंतीच्या कमानीत आहे. (स्था, पो. को, मा. प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. मळेसंदी, महात्मेया वैराग्य कथन स्थान :

हे स्थान देवळाच्या परकोटाच्या पूर्व दरवाजा बाहेर उत्तर बाजूच्या ओट्यावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विहरणाला जात असताना येथे उभे राहिले. दक्षिणेश्वराच्या देवळाच्या पूर्वेस दोन मळ्यांमध्ये एक संन्यासी महात्मा उघडाच भर थंडीमध्ये उभा होता. बाइसा सर्वज्ञांना म्हणाल्या, “महात्मा किती विरक्त आहे ! भर थंडीमध्ये उघडाच उभा आहे !” यावर सर्वज्ञांनी, या महात्म्याचे वैराग्य विषयासाठी आहे, याचा खुलासा केला. (पू. ली. 368 स्था. पो.)

पूर्वार्धातील 3 दिवसांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून सोनईला गेले व उत्तरार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून आव्हाण्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वांबोरीची एकूण स्थाने : 7


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: