Takali Bhan (टाकळी भान)

टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान - हे स्थान टाकळी गावाच्या आग्नेयेकडे 1 कि.मी.अंतरावर शेतात आहे.


जाण्याचा मार्ग :

टाकळीभान हे गाव, श्रीरामपूर-नेवासा मार्गावर श्रीरामपूरहून पूर्वेस 14 कि.मी. आहे. व नेवाशाहून वायव्येस 18 कि.मी. आहे. खोकर ते टाकळी पायमार्गे 5 कि.मी. आहे. खोकरफाटा ते टाकळी 5 कि.मी. आहे. टाकळीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान टाकळी गावाच्या आग्नेयेस एक फलांग अंतरावर श्री. पांडुरंग पाटील कापसे यांच्या शेतात पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात सराळ्याहून टाकळीला आले. त्यांच्या वेळी येथे रानमळा होता. पिंपळाची व निंबोणीची दाट झाडे होती. येथे सर्वज्ञांना आसन झाले. दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा, विडा झाला. मग त्यांनी थोडा वेळ निद्रा घेतली. उठल्यावर पुन्हा गुळळा, विडा झाला. नंतर ते येथून नेवाशाला गेले. (उ.ली.214,स्था.पो.उ.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


टाकळीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Takali : टाकळीये मळां आरोगणाः पहूड :।।:
  • एकु दी डोंबेग्रामुनि गोसावी निधिवासया बिजें करितां: टाकळीएसि मळेया बिजें केलें: दुपाहाराचां पूजावसर जालाः गोसावियांसि आरोगणा जालीः पहूड जालाः उपहूड जाला :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि नेवास्याकडे जाताना, डोमेग्राम-सरालां असा मार्ग क्रमण करित टाकळी येथे प्रथमच आले. येथे आरोगणा, पहूड, उपहूड जाला तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Takali : भट डो आणूं धाडणें :।।: / टाकळीये डो विसरणें :।।:
  • मग तेथौनि गोसावी बिजें केलें: तवं गोसावियांचा तुपाचा डो तो निंबोणीचां फांटां घातला होताः तो भट तेथचि विसरलेः मार्गी आठवलाः भटोबास गजबजों लागलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ गाः विसरलेति?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः डो विसरलाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जाः निंबोणीचां फांटां असेः’’ भटोबास गेलेः तवं तो तेथचि होताः घेउनि आलेः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘निगतां स्थानशुध्दि किजे गाः’’ ‘‘जी जीः’’ म्हणोनि श्रीचरणां लागलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि नेवास्याकडे जाताना, डोमेग्राम-सरालां असा मार्ग क्रमण करित टाकळी येथे प्रथमच आले तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: