Suregaon-Sangvi (सुरेगाव-सांगवी)

सुरेगाव (सांगवी), ता. कोपरगाव, जि. अहमदनगर


येथे 1 स्थान - सुरेगांव गावाच्या इशान्येकडे गावाच्या जवळच गोदावरी नदीच्या काठावर मंदीरात हे स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

सुरेगाव, कोळपेवाडी साखर कारखान्यापासून उत्तरेस 3 कि.मी. आहे कोळपेवाडी, विंचूर-सावळे विहीर मार्गावर आहे. कोपरगावहून धारणगावमार्गे कोळपेवाडीस जाण्यास मार्ग आहे. चासहून सुरेगाव (कोळपेवाडी मार्गे) 13 कि.मी. आहे व पायमार्गे 8 कि.मी. आहे. कोळपेवाडीपर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. सुरेगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान सुरेगावच्या ईशान्येस गावा लगतच गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात चासहन सुरेगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. २७४, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सोनारीला गेले.

वसती स्थानापुढील दोन स्थाने निर्देशरहित आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


सुरेगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 274
  • Suregaon (Savangi) : सुरेगावीं आदित्यीं वसति :॥:
  • सुरेगावांपूर्वे कुंभरवाडां आदित्यः तेथ वसति जाली :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने. येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे… स्वामी नासिक-सुकिना-नांदौर-कांदळदवरुण आले व संवत्सरकडे निघले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: