Suregaon (Dahigaon) (सुरेगाव-दहिगाव)

सुरेगाव (दहिगाव), ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील 1 स्थान सुरेगावच्या ईशान्येस 5 कि. मी. अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर दक्षिणाभिमुख देवळात आहे. कोटेश्वर येथील स्थानांपासून सुरेगावचे स्थान 3 कि. मी. अंतरावर पायमार्गे आहे.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

गळनिंबहून सुरेगाव 2 कि. मी. आहे.

अ) कोटेश्वर येथून पूर्वेस सुरेगाव येथील स्थानाची पायी अंतर 3 कि. मी. आहे. ब) कोटेश्वर गळनिंब-नवीन गळनिंब कमानीपासून पूर्वेस वरखेडकडे वळा सुरेगाव-पाण्याच्या टाकीजवळून अमरधाम- चौफुली-डावीकडे सरळ नदीच्या तिरी जुने सुरेगाव- महानुभाव मंदिर अंतर 5 कि.मी.


स्थानाची माहिती :

जुने सुरेगाव नाथसागरात बुडाले असून नवीन सुरेगावचे पुनर्वसन झालेले आहे. आपले मंदिर जुन्या गावात आहे.

नवीन सुरेगावात श्री दत्त मंदिर असून तेथे श्री दत्तात्रेय प्रभुंचा विशेष आहे. तेथे व्यवस्था आहे. गावात उपदेशी राहतात.

1. वसती स्थान :

हे स्थान सुरेगावच्या ईशान्येस 5 कि. मी. अंतरावर गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर दक्षिणाभिमुख देवळात आहे. कोटेश्वर येथील स्थानांपासून सुरेगावची स्थाने 3 कि. मी. अंतरावर पायमार्गे आहेत. सर्वज्ञांच्या वेळी येथे अग्नीष्टिका होती.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात गळनिंबहून सुरेगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (उ. ली. 314, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून आगरवाडगावला गेले.

येथील इतर चार स्थाने निर्देशरहित आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


विद्यापीठ स्थानपोथी : सुरेगावीं अग्नीष्टीके वस्ति || गावा पसिमे गंगेचीए थडीए अग्नीष्टीका पूर्वामूख ।।


सुरेगावचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: