Sukene (सुकेणे)

सुकेणे, ता.निफाड जि. नाशिक


येथील 2 स्थान - सुकेणे गावात दत्तमंदीर आहे. या मंदीरात येथील दोन्ही स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

सुकेणे हे गाव, ओझर-निफाड मार्गावर ओझरहून पूर्वेस 9 कि.मी. आहे व निफाडहून किंचित वायव्येस 15 कि.मी. आहे. (ओझर हे गाव, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिकहून वायव्येस 20 कि.मी. आहे.) आडगावहून सुकेणे (सय्यदपिंप्रीमार्गे) 15 कि.मी. आहे व ओझर मार्गे 19 कि.मी. आहे. मुंबई-भुसावळ लोहमार्गावरील नाशिक व मनमाड मधील सुकेणे हे रेल्वे स्थानक आहे. सुकेणे रेल्वे स्थानक ते सुकेणे गाव सव्वा कि.मी. आहे. सुकेणे येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवाही उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान मौजे सुकेणे गावामध्ये टेकावर पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने प्रख्यात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात आडगावहून सुकेण्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली.264, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून निफाडला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. परिश्रय स्थान :

हे स्थान देवळाच्या पश्चिमेस आहे.


सुकेण्याची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 264
  • Sukene : सुकियाणां वसति :॥:
  • गोसावी सुकियानेयासि बीजे केले : तेथ धाकुटिया सुकियाणां आदित्याचा मढी बाइसीं गोसावीयांचा ठाइं आपुला प्रतीदिनीचा विधी केलाः तेथ वसति जाली :॥:
  • (.. येथे हे पहील्यांदा येने. स्वामी नासिक-अडगाव वरुण आले व निफाडकडे निघले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: