Sonori (सोनोरी)

सोनोरी, ता. चांदूरबाजार जि. अमरावती


सोनोरी येथील 2 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) 2 ठीकाणी आहेत - येथील 1 स्थान गावातच पश्चिमेकडे मंदीर आहे. तर 1 स्थान गावापासून 1 कि.मी. अंतरावर शेतातील मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

नानोरीहुन उत्तरेस सोनोरी 3 कि. मी. आहे. चांदूरबाजार ते सोनोरी 6 कि. मी. सोनोरीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आड अवलोकणे स्थान :

हे स्थान सोनोरी गावाच्या नैर्ऋत्य विभागी गुरे पाणी पिण्याच्या मोठ्या हाळाजवळ उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी रिद्धपूरन देऊरवाड्यास जाताना येथे पालखी थांबवून आड अवलोकन केला. (भी. प्र. ली. 137, स्था, पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. सोनजयेशी खेळ करणे स्थान :

हे स्थान सोनोरीपासून एक कि.मी. अंतरावर सोनोरी-जालनापूर बैलगाडी रस्त्याच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे,

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे सोनजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्र. ली. १०३, स्था. पो.)

या देवळाच्या गाभाऱ्याच्या दरवाजाच्या उत्तर व दक्षिण बाजूचे दोन मोठे चिरे नमस्करी असल्याचे बोलले जाते. लेखी आधार नाही.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. वडाच्या झाडाखालील आसन स्थान 


सोनोरी ची एकूण स्थाने : 3




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: