Sonai (सोनई)

सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर


येथील स्थान सोनई गावाच्या पश्चिमेकडे गांवातच सामाजीक शाळेच्या जवळ असलेल्या महादेव मंदीरात सभामंडप/चौक म्हणजे हे 1 स्थान होय.


जाण्याचा मार्ग :

सोनई हे गाव राहरी-घोडेगाव मार्गावर राहरीहून पूर्वेस 23 कि. मी. आहे. (राहरी, नगर-मनमाड मार्गावर आहे व घोडेगाव, नगर औरंगाबाद मार्गावर आहे) सोनईला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान सोनई गावाच्या पश्चिम विभागी समाज केंद्र शाळा नं. 1च्या जवळ वनदेवाच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वांबोरीहून सोनईला आले. त्यांना प्रथम चौकात आसन झाले. बाइसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. पूजावसर झाला. आरोगणा झाली. गुळळा झाला व येथेच एक रात्र मुक्काम झाला. (पू. ली. 369, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून कानडगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या वायव्येचे परिश्रय स्थान.


सोनईची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: