Sillod (सिल्लोड)

सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - हे स्थान सिल्लोड गावाच्या पश्चिमेकडे गावालगतच महादेव (वामेश्वर) मंदीर आहे, या मंदीराच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. (येथील महादेवाचे पूजारी विचारल्यास सांगतात.)


जाण्याचा मार्ग :

सिल्लोड हे गाव, औरंगाबाद-जळगाव मार्गावर औरंगाबादहून ईशान्येस 61 कि.मी. आहे व अजिंठ्याहून किंचित् नैर्ऋत्येस 29 कि.मी. आहे. सिल्लोड येथे महानुभाव आश्रम आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान सिल्लोड शहराच्या पश्चिम विभागी बामेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. चौकावर फरशी बसविलेली आहे. देवळापुढे प्राचीन बारव आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भोकरदनहून सिल्लोडला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 427, स्था.पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आन्व्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

(1) देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान


सिल्लोडची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 427
  • Sillod : सेलवाडे बामेश्वरीं वसति :॥:
  • गावावायव्यें कोनीं पूर्वामुख बामेश्वराचे देउळः पूढा बारव असेः तेथ गोसावीयांसी वसति जाली :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने…विसृत लीळा नाही. एवढीच लीळा चरीत्रात आढळते… स्वामींच्या आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदनवरुन पूढे आन्व्याकडे जाताना सिल्लोड येथे स्वामी वसतिस थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: