Shivare (शिवरे)

शिवरे, ता.निफाड, जि. नाशिक


येथे 1 स्थान - शिवरे गावाच्या पश्चिमेकडे 1.50 कि.मी.अंतरावर कादवा नदीच्या काठावर आहे.


जाण्याचा मार्ग :

शिवरे हे गाव, निफाड – नांदूर मार्गावर निफाडहून आग्नेयेस 6 कि.मी. आहे. मार्गी आसन स्थानापासून आग्नेयेस दीड कि.मी. अंतरावर शिवरे येथील आसन स्थान आहे. शिवरे येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. शोध मार्गी पव्हे आसन स्थान :

हे स्थान शिवरे गावाच्या पश्चिमेस दीड कि.मी. अंतरावर अंतरावर कादवा नदीच्या पूर्व काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पाणपोई होती. त्या लगतच खांडेभडाड देवतेचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू निफाडहून नांदुरला जात असताना त्यांना येथे आसन झाले. सकाळचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. मग त्यांनी विश्रांती घेतली. उठल्यावर गुळळा विडा झाला. त्यानंतर सर्वज्ञ येथून नांदुरला गेले. (पू.ली.266,स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


शिवऱ्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 266
  • Shivare : खांडेभडाडी आसन :।।:
  • मार्गी खांडेंभडाडींचें देवालय तेथ पव्हे होतीः तेथ गोसावियांसि आसन जालें :।।:
  • (टिप – स्वामीचे येथे हे पहील्यांदा येने. स्वामी आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात नासिक-अडगाव-सुकिणां वरुण निफाड येथे आले व स्वामीचे निफाड येथे पाच दिवस अवस्थान होते. पुढे स्वामि नांदौरकडे निघाले. निफाड व नांदौर यांचे मधे ही लीळा झाली)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: