Shirala (शिराळा)

शिराळा, ता. अमरावती जि. अमरावती


येथील 2 स्थान - शिराळा गावाच्या पश्चिमेस महादेवाच्या मंदिरात आहेत. 


जाण्याचा मार्ग :

शिराळा हे गाव अमरावती चांदुरबाजार सडकेवर पुसदाहून 5 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. नागनाथी वसति (श्रीचक्रधर प्रभू चरणांकित) :

हे स्थान शिराळा गावाच्या पश्चिम विभागी गावालगतच महादेवाच्या पूर्वाभिमुख देवळात आहे. डावा चौक नमस्कारी आहे, चौकात फरशी बसवलेली आहे. ओळखी फुल व चंदन लावलेले असतात, किंवा महादेवाचे पुजारी विचारल्यास सांगतात, स्वामींच्या वेळेस याला ‘नागनाथ’ नाव होते, आता हे मंदिर “ज्ञानेश्वर संस्थान महादेव मंदिर” नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू हे श्रीगोविंदप्रभू महाराजांची भेट घेऊन ऋद्धपूर वरून बेलोरा मार्गे निघाले तेव्हा प्रथम भैरवाच्या देवळात त्यांना आसन झाले, नंतर या देवळात त्यांना आसन व वसती झाली. दुसऱ्या दिवशी ते येथून टाकरखेड्याला गेले. (पू. ली. 170, स्था. पो.)


2. नागनाथाचे लिंग श्रीकरे स्पर्शने स्थान (श्रीप्रभू चरणांकित) :

हे स्थान म्हणजे गाभाऱ्यातील महादेवाचे लिंग पिंड, पूर्ण लिंग पिंड नमस्कारी आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू महाराजांची येथे दांडी थांबवलेली होती. व धावत जाऊन नागनाथाचे लिंगाला स्पर्श करून “आवो मेली जाय : तुं यथ आहासि म्हणे :” म्हणत खेळ केला. (ऋद्धपुर चरीत्र 228)

Google Map Location Link 👈 (दोन्ही स्थाने) (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. भैरवी अवस्थान

2. परिश्रय स्थान


शिराळाची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 170
  • Shirala : सिराळां नागनाथीं वसति :॥:
  • गोसावी उदेयाचि सिराळयांसि बीजे केले :तेथ नावेक भैरवाचिये देउळिये आसन जालेः मग सिराळां नागनाथाचे देउळ पूर्वामुखः तेथ चौकीं आसन जालेः बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिलें: उपहारु निफजविलाः पूजावसरु केलाः आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा ओळगविलाः भक्तिजनां पांती प्रसादु जालाः गोसावीयांसिं पहुड जालाः तेथचि वसति जाली :॥:
  • (…येथे हे पहील्यांदा येने. स्वामी ऋद्धपूरवरुन बेलौरांमार्गे आले…)
  • Govind Prabhu Charitra Lila – 228
  • Shirala : सीराळां दांडी खालवर्णे :॥:
  • मग गोसांवी सीराळेयासि बीजें केले : तळेयाचीय दक्षीणीली पाळी दांडी खालावीली : आणि तैसीचि दुडु दुडु करि नागनाथाचीया देउळासि धांव घेतली : लींगापासि बीजें केलें : लींग श्रीकरें स्परीसीले : मग म्हगीतलें : “आवो मेली जाय : तुं यथ आहासि म्हणे :” मग तैसेचि बीजे केले : ॥२२८॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: