Shiral (शिराळ)

शिराळ, ता. आष्टी, जि. बीड.


येथील स्थान शिराळ गावाच्या इशान्येकडे कडी नदीचे काठावर भीलेश्वर महादेव मंदीरात सभामंडपात डाव्या बाजुस 2 खांबाच्या मधे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

शिराळ हे गाव, मिरजगाव आष्टी मार्गावर वाकीहून ईशान्येस 5 कि. मी. आहे व आष्टीहून नैर्ऋत्येस 9 कि. मी. आहे. शिराळ्याला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान शिराळ गावाच्या ईशान्य विभागी माध्यमिक शाळेजवळ कडी नदीच्या पश्चिम काठावर भीलेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या सभामंडपात दक्षिण बाजूस (डाव्या बाजूस) आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात आष्टीहून शिराळ्याला आले. त्यांच या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 345, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून वाकीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


शिराळ्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 345
  • Shiral : सीराळां भिलेश्वरीं वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: