Shirajgaon Band (शिरजगाव बंड)

शिरजगाव बंड, ता. चांदूरबाजार जि. अमरावती


येथील एक मांडलिक मंदिर गावाच्या उत्तरेस आहे, हे मंदिर 'रांजनेश्वरी मंदिर' म्हणून ओळखले जाते.


जाण्याचा मार्ग :

शिरजगाव बंड हे गाव, वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील शिरजगाव बंड फाट्या पासून पश्चिमेस दीड कि.मी. अंतरावर आहे. व अचलपूर-चांदूरबाजार मार्गावरील शिरजगाव बंड फाट्या पासून दक्षिणेस 1 कि.मी. अंतरावर आहे.

शिरजगाव बंड पासून नैऋत्येस 3 कि. मी. आखतवाडा आहे, आखतवाडा येथे रांजणाचा दुसरा भाग आहे.


स्थानाची माहिती :

1. शिरजगाव बंड येथिल श्रीप्रभु संबधित तिकोपाध्ये च्या (रिद्धपूर) आवारातिल रांजन :

त्या रांजणा चे हे मांडलिक स्थान आहे, हे मंदिर शिराजगाव बंड गावाच्या माली पुरा विभागात आहे, या स्थानाला ‘रांजनेश्वरी मंदिर’ म्हणून ओळखले जाते,

हा रांजण “परमेश्वरपुर” येथे तिकोपाध्यांचेया आवारामध्ये सध्याचे स्थान क्र. ४८ येथे होता. हा रांजन शिरजगांव बंड तसेच आखतवाडा येथे कसा आला त्या विषयी माहिती खालील प्रमाणे आहे. 

मुगल काळामध्ये एक मुस्लिम राजाला अचलपुर येथील सुभेदारी 15 वर्षे करीता मिळाली होती. त्यावेळी रिध्दपुर हा परगना होता. त्या ठिकाणी व्यवस्था पाहण्यासाठी मुस्लिम राजा गेला असतांना हा मोठा रांजन पाहून म्हणाला ” हा रांजन पाणी पिण्यासाठी अचलपुर येथे घेऊन जाऊ ‘म्हणौन बैलगाडीवर ठेऊन हा रांजन कामगार निघाले. आज शिरजगांव बंड येथे जे भव्य रांजणेश्वराचे मंदिर आहे त्या ठिकाणी त्या वेळेस गावाचे स्मशान होते. तसेच चिंचेचे मोठे बन होते. ह्या ठिकाणावरून रिध्दपुर ते अचलपूर कुरळपुर्णा मार्गे बैलगाडीचा रस्ता होता. आजही नाल्याच्या पलीकडे कुरळपुर्णा रस्ता आहे. ह्या ठिकाणी बैलगाडी आल्यानंतर बैलांकडून गाडी पुढे ओढल्या जाईना. तेव्हा आणिक बैलांची ‘आगुळ (एकाच बैलगाडीला पुढे समोर आणिक बैल लाऊन ओढणे) लावून रांजन नेण्याचा प्रयत्न केला परंतु रांजनाला बांधलेल्या साखळीच्या ताणामुळे रांजनाचा वरील भाग वेगळा होऊन येथे पडला. (मुळ रांजन खरपाच्या जातीच्या दगडाचा असुन 2 भागात तयार करुन त्याला मध्ये चुन, अंबाडी, काथ, गुळ ह्या मिश्रणाने सांधलेले होते) तेव्हा मुस्लिम राजाने म्हटले की खालचा भाग बैलांना, घोड्यांना पाणी पिण्याकरीता होईल म्हणून घेऊन जाऊ म्हणून खालचा ‘नांदी सारखा’ भाग घेउन निघाले. परंतु तो तेथुन 2 किलोमीटर अंतरावर आजचे आखतवाडा गाव येथे पुन्हा अडकला. बैलाकडून ओढल्या गेला नाही. तेव्हा त्याने तो भाग तिथेच सोडून दिला. ह्या दोन्हीही रांजनाच्या ठिकाणी त्या वेळेस परमेश्वर भक्त ईश्वर पारायण, कैवल्यवासी श्री नारायणराव आण्याजी तडस रा. शिरजगांव बंड यांनी मंदिर बांधले होते. तसेच मंदिराच्या व्यवस्थापनेकरीता दोन्हीही ठिकाणी 40-40 एकर एकुण 80 एकर जमिन मंदिराला दान दिली होती. आजही जे सद्भक्त श्रद्दाभाव ठेवून पुजा अर्चना करतात त्यांचे मनोदय ह्या ठिकाणी पुर्ण होतात. असे हे साध्यपर तसेच साधन पर हेतु पुर्ण करणारे अत्यंत चमत्कारीक स्थान आहे. दरवर्षी आषाढी पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी ह्या ठिकाणी यात्रा भरते.

सर्वांना महाप्रसादाचे भोजन दिल्या जाते. गावामध्ये, मार्गामध्ये प्रसादवंदन असते.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: