Shendurjana Bajar (शेंदुर्जना बाजार)

शेंदूरजना (बाजार), ता. तिवसा जि. अमरावती


सेंदुर्जना (बाजार) येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) - गावाच्या दक्षिनेकडे सुर्यगंगा नदीच्या पूलाजवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

शेंदूरजना (बाजार) हे गाव, तिवसा-चांदूररेल्वे मार्गावर तिवशाहून दक्षिणेस 3 कि. मी. आहे व चांदूररेल्वेहून किंचित् ईशान्येस 30 कि. मी. आहे. माळधूरहून ईशान्येस शेंदूरजनाबाजार 6 कि. मी. आहे. शेंदूरजना बाजार येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. दांडी खालाविणे स्थान :

हे स्थान शेंदूरजना गावाच्या दक्षिणेस सूर्यगंगा नदीच्या पात्रात पुलाच्या पश्चिमेस देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू माळधूरहून शेंदूरजनाला आले. नदीमध्ये पालखी थांबविली. मग त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा विडा झाला. त्यानंतर ते येथून तिवशाला गेले. (ऋ. प्र. ली. 230, स्था, पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


शेंदूरजना चे स्थान : 1


  • Govind Prabhu Charitra Lila – 240
  • Shendurjana : माळधरा दांडी खालवणे :॥ तीवसा दांडी खालवणे :॥ सेंदुरजनी दांडी खालवणे :॥वरान उतरौनि भीस्नौरी अवस्थान:॥
  • मग खडकीए दांडी सांडीली : आवी भगवतीजनें टणकली : तीय राहीली : भट माहादाइसें ये दोघे गोसावियांसवें नीगाली : तवं रात्री जाली : मग गोसावी आरचि वरान उतरले : गोसाविया मागें भट माहादाइसें उतरली : तयाचेया आवारासि बीजें केलें : यकादसीचा दीम : तीये अवघीं वेसि घालुनि जागरना गेली होती : मटी वेसि माथां घेउनि उघडीली : माहादाइसी साउले फाडुनि काकडा केला : वाति लावीली : डेरामरि पाणीया तापतु होता : तेणें गोसावियाचे श्रीचरण प्रक्षाळीलें : मग भटाचे पाय धुतले : मग आपुले धुतले : मग मट तयातें बोलवाबया गेले : तयाते महणीतलें : ‘आगा! काइ जागरण करीत असा : राउळ तुमचेया घरासि आले असेति :” मग ते आवघेचि आले : गोसाविया से दंड. बत घातलें : श्रीचरणा लागले : मग गोसावियासि मर्दना मादणे जालें : पुजा केली : वन वोळगवीलें : मग आरोगणा जाली : पाट-बाज घालुनि सुपवति घातली : तीयवरि न नीजति : आवषया बाजा धातलीया : तयावरि न नीजति : मग लेकरवें नीजैली होती : मग गोसावी म्हणीतलें : “आवो हे घाल घालि :” म्हणौनि तिय बाजेपासि बीज केलें : मग लेकर उठवीली : मग तीय बाजेकरि पहुड स्वीकरीला : मग म्हणीतलें : “ऐया माशा होय म्हणे :” मी म्हणीतले : ” जी जी! आता को नव्हे : लेंकरुवें तवं उठवीली की “” आवो मेली जाय ” म्हणौनि हास्य केलें : मग मी माहादाइसी आंघोळ केलीया : माहादाइसी मणीतलें : “नागदेया जेवि:” भटौं म्हणीतले : ” तुमी यकादसि मोडाल तरि मी जेवीन : ” संग्रहेन म्हणीतलें : ” ना : हो का: ” मग दोघे जेवीली :॥ २४०।।



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: