Shendi (Pokhardi) (शेंडी-पोखर्डी)

शेंडी (पोखर्डी), ता. जि. अहमदनगर


शेंडी(पोखर्डी) गावाच्या उत्तरेस 600 मीटर अंतरावर मंदीरात 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

शेंडी हे गाव, अहमदनगर-औरंगाबाद मार्गावर अहमदनगरहून ईशान्येस 9 कि. मी. आहे. शेंडीला जाण्यासाठी अहमदनगरहून एस. टी. बस सेवा तसेच सिटी बस सेवा उपलब्ध आहे. वांबोरी ते शेंडी 16 कि. मी. डोंगरगण ते शेंडी 10 कि. मी. नागापूरहून पूर्वेस शेंडी (गजानन कॉलनी, गुप्तावडगाव मार्ग) 8 कि. मी. आहे. हा मार्ग जीप मेटॅडोर या वाहूनांसाठी तथा पायी जाण्यासाठी ठीक आहे. नागापूरहून शेंडी (अहमदनगरमार्गे)14 कि. मी. आहे. शेंडी येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. जेऊरमार्गी अदृश्य होणे स्थान :

हे स्थान शेंडी गावाच्या उत्तरेस 600 मीटर अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ ‘श्रीकृष्ण मंदिर’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात भिंगारहून डोंगरगणकडे जात असताना शेंडी गावापासून थोड्या अंतरावर आल्यावर तेथे दोन रस्ते फुटलेले होते. बाइसांनी सर्वज्ञांना विचारले, “हे दोन्ही रस्ते कुठे जातात?” सर्वज्ञ म्हणाले, ‘हा रस्ता जेऊरला जातो व हा रस्ता डोंगरगणला जातो,” बाइसांचे जेऊरला नातेवाईक होते म्हणून त्यांनी सर्वज्ञांना जेऊरला जाण्याविषयी आग्रह केला. तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, “तिकडे जाण्याची आमची इच्छा नाही.” बाइसांनी जास्तच आग्रह केला. म्हणून सर्वज्ञ येथे असलेल्या रिंगणीच्या झाडाखाली अदृश्य झाले. सर्वज्ञ अदृश्य झाल्याचे पाहून बाइसा बेशुद्ध होऊन खाली पडल्या, मग सर्वज्ञ प्रगट झाले. त्यांनी बाइसांना सावध करून उठविले आणि सांगितले, “असा आग्रह पुन्हा कधीही करू नका.” यावर सर्वज्ञांनी क्षीराब्धि गमनाची लीळा सांगितली. मग सर्वज्ञ येथून माळवीपिंपळगावला गेले. (पू. ली. 363, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


शेंडीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: