Shara (शारा)

शारा, ता.लोणार जि. बुलढाणा


येथील 1 स्थान हे शारा गावाच्या पूर्वेकडे 1 कि.मी.अंतरावर आहे.


जाण्याचा मार्ग :

शारा हे गाव, लोणार मेहकर मार्गावर लोणारहून उत्तरेस 3 कि. मी. आहे व मेहकरहून दक्षिणेस 21 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान शारा गावाच्या पूर्वेस 600 मीटर अंतरावर लिंबाच्या झाडाजवळ देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू बोणेबाइयांच्या समवेत लोणारहून मेहकरला परत जाताना त्यांना या ठिकाणी आसन झाले. बोणेबाइयांनी श्रीचरण प्रक्षाळण केले. विडा अर्पण केला. मग सर्वज्ञ येथून मेहकरकडे जाण्यास निघाले. (पू. ली. 100)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


शाऱ्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 100
  • Shara : लोणारमार्गी चोरुकुमति हरणे  :।।: 
  • मग गोसावीं अवळा वेळी बीजें केलेंः मार्गी जातां गोसावी नावेक स्त्रमु स्वीकरिलाः सेरेयापासि’ मार्गी वीहीरिः तेथ पींपळुः तेयातळी आसन जालें चरणक्षाळण जालेंः वीडा जालाः मग गोसावीं बीजें केलेंः एणीएपरतें मार्गी कांटीएतळी आसन जालेंः चरणक्षाळण जालें: गुळुळा जालाः वीडा ओळगविलाः मग गोसावीं बीजें केलेंः गोसावी जुझमालाचेया देउळापासि पावलेः पव्हेसि आसन जालेंः श्रीचरणप्रक्षाळण जालेंः गुळुळा जालाः वीडा जालाः मग गोसावीं बीजें केलेंः तवं पीपळापासि चोर देखिलेः बोणेबाई म्हणीतलेंः “बा मौन्यदेव होः चोर आलेः” सर्वज्ञ म्हणीतलेंः “बाइः भेओं नको” तवं ते सामोरे आलेः तवं गोसावीयांतें देखिलेंः “आरेः हे गोसावी रे गोसावीः” म्हणौनि जुहारू करूनि भवंताले उभे राहिलेः सर्वशैं म्हणीतलें: “काइ गा माहात्मे होः जें होउनि आलेति तें कां कीजे ना?” “ना जीः काइ गोसावीयांचा ठाई कैसें करावें?” सर्वतें म्हणीतले. “ऐसें काइ पाहाता? हे गोसावीचि नेसावें आणि गोसावींचि पांगुरावें जी जीः गोसावीं अवळा वेळी कैसें बीजें केलें? गोसावीयांसि सरिसे कोण्ही माणुस नाही?” सर्वझें म्हणीतलेंः “माहात्मे होः तुम्ही असाः नव्हे? काइसी अवेळ?” मग गोसावीं बोणेबाइयाकरवि वीडा देववीलाः तीएं च्यारिच्यारि पार्नेः एकएक पोफळ देत होतीः मग गोसावीं पुडवाटुवा झाडुनि तांबोळ दीधलेंः मग तेथौनि गोसावीं बीजें केलेंः ते गोसावीयांतें बोळवीत नीगालेः गोसावी तेयातें राहावीत होतेः परि ते नहातिः तीही म्हणीतलेंः “जी जीः आमचे पुढां आणीक असतिः ते मांग ओखटेः ते गोसावीयांचां ठाई उपद्रो करितीः” सर्वशं म्हणीतलें: “तैसें एथ कव्हणी काही न करीः” मग गोसावीयांसवेंचि आलेः पुढां तेः मागां गोसावीः ते सौंदरासंगमाचीए लवणीसि होतेः तेयां एरएरां खूण जालीः तवं तेही म्हणीतलेंः “हे गोसावी रे गोसावी रेः” मग एरएर तांबोळे जालीं: एरएर गोसावीया सरिसेचि नीगालेः मान्हवडेयांसि वाट फांकेः तवं बोळवीत आले तेथौनि ते मान्हवडेयाकडे गेलेः गोसावीं उजुचि बाणेस्वरासि बीजें केलें :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: