Savkheda-Sangmeshwar 1 (सावखेड-संगमेश्वर 1)

सावखेड-संगमेश्वर 1 (सिद्धेश्वर शिव मंदिर), ता. गंगापूर, जि. औरंगाबाद


संगमेश्वर (सिद्धेश्वर) म्हणजे संगमेश्वर येथे सिद्धेश्वराचे प्रसिद्ध शिव मंदीर होते. म्हणून त्यास सिद्धेश्वर संगमेश्वर म्हणतात. जोगेश्वरीच्या जवळ असणारे संगमेश्वर ते हेच. गोदावरी आणि सिवना (शिवा) नदीचा संगम आणि त्या संगमावरील संगमेश्वर हे संगमेश्वर मंदिर पाण्यात बुडाले असल्याने तेथे जाता येत नाही.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


ठिकाणांचे महत्त्व :

1. आद्याचार्य श्रीनागदेवभट्ट यांना येथेच बोध झाला. “संगमेश्वरा माहोमासी शुद्ध चतुर्दसीचेनि अनुमाने भटा बोध जाला: “बोध म्हणजे जिवेश्वर भाव प्रगटणे. हे देव आहे. मी जीव आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी हे परमेश्वराचे जीव उद्धार करावयाचे व्यसन असलेले परमेश्वर अवतार असून तेच नित्य अच्यूत अशी परममुक्ती कैवल्य देऊ शकतात. असे आचार्यांना प्रत्यया आले.

2. येथे स्वामींनी श्रीनागदेवभट्टांना अन्यव्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण असे नव प्रकरणांपैकीचे पहीले पाच प्रकरणे निरूपण केले. म्हणजेच पाच प्रकरणांचा प्रकरण वश संगमेश्वर येथील आहे.

3. महत्त्वपूर्ण सूत्र तथा दृष्टांत (उदा. कासवीचा दृष्टांत, हीरेखाणीयाचा दृष्टांत) येथेच निरूपण केला.


स्थानाची माहिती :

संगमेश्वर (सिद्धेश्वर) म्हणजे संगमेश्वर येथे सिद्धेश्वराचे प्रसिद्ध शिव मंदीर होते. म्हणून त्यास सिद्धेश्वर संगमेश्वर म्हणतात. जोगेश्वरीच्या जवळ असणारे संगमेश्वर ते हेच. गोदावरी आणि सिवना (शिवा) नदीचा संगम आणि त्या संगमावरील संगमेश्वर हे संगमेश्वर मंदिर पाण्यात बुडाले असल्याने तेथे जाता येत नाही. त्याचे पुरातन फोटो आम्ही खाली दिलेले आहे.

सिद्धेश्वर संगमेश्वर येथे स्वामींना पाच दिवस गुंफेत अवस्थान झाले. “संगमेश्वरी अवस्थान : गुंफेदीस ५ : ” ही गुंफा संगमेश्वर मंदिराच्या पाठीमागे होती. याच गुंफेत आचार्य श्रीनागदेवभट्ट यांना बोध झाला. स्वामींच्या 5 दिवसांच्या वास्तव्यात येथे अनेक लीळा घडल्या. त्यामुळे येथे अनेक स्थाने असावयास हरकत नसावी.

1. अवस्थान तथा वसती स्थान :

2. संगमेश्वराच्या मंदिरातील रंगमाळिका पुसने स्थान :

3. रंगमाळिका पुसल्यानंतर “संगमेश्वराच्या दारापासी बीजे केले” त्या पायऱ्या तथा स्थान :

लीळा :

1. संगमेश्वरी आसन: लुडि क्रिडा.

2. गुंफे वस्ति : उमाइसे बीढारा पाठवणे.

3. भटा इश्वर प्रतीती करणे.

4. आबैयो रंगमाळिका प्रमार्जणे.

5. कळपीची गाय कळपी मीळो म्हणणे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


विद्यापीठ स्थानपोथी : स्थाने: ३ दिस : ७: मढु उत्तराभिमुखः पुर्व पसीम पटीशाळाः मढा पुर्वे संगमेश्वराचे देऊळः पूर्वाभिमुख दोरवढयाची पटीशाळः दक्षीणीलीसीडीः संगमेश्वरा पसीमे मढुःगंगेचिए थडीए पींपळुः संगमी तीन स्थानेःदक्षीणे परीश्रमः ।।७।।


अनुपलब्ध स्थान :

सावखेडा येथील खालील पूर्वार्ध लीळांची स्थाने अनुपलब्द्ध आहेत –

1. ब्राह्मणा भेटि स्थान.
2. संगमेश्वराच्या देउळातील आसन स्थान.
3. संगमेश्वराच्या देउळातील चरणचारी उभे राहणे स्थान.
4. संगमेश्वराच्या देउळातील दोन्हि दारसंका धरुण भितरी अवलोकणे स्थान.
5. आबाइसाच्या रंगमाळीका पूसने स्थान.
6. बाहीरिल चौकी उभे राहणे स्थान.
7. संगमेश्वराच्या गुंफेतिल अवस्थान.
8. संगमेश्वराच्या दुसर्या गुंफेतिल आरोगणा स्थान.
9. उपाध्या विष्णुभट्टा भेटि स्थान.
10. देउळातील पटिशाळेवरील आसन स्थान.
11. देउळातील पटिशाळेवरील वेढे स्थान.
12. गुंफेचा आंगणी चरणचारी उभे राहणे स्थान.
13. ढागावरील आसन स्थान.
14. सिवनेचा कपाटी आसन स्थान.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)



  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: