Savkhed Ganga (सावखेडगंगा)

सावखेडगंगा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद


येथील 1 स्थान - सावखेड गावाच्या वायव्येकडे मराठी शाळेच्या चौथऱ्यावर हे स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

सावखेड हे गाव, श्रीरामपूर-वैजापूर मार्गावर नाऊरहून उत्तरेस 3 कि.मी. आहे व वैजापूरहून दक्षिणेस 18 कि.मी. आहे. सावखेडा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान सावखेड गावाच्या वायव्य विभागी मराठी शाळेच्या नैर्ऋत्येस जवळच चौथऱ्यावर पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे सिद्धनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पुरणगावहून सावखेड्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 285, स्था, पो. शा. खा. द. प्र.) दुसऱ्या दिवशी ते येथून वांजरगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


सभामंडपातील स्थान निर्देशरहित आहे.


सावखेड्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –
  • Savakhedganga : सांगवखेडां सिद्धनाथीं आसनः वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे.. येथे हे पहील्यांदा येने.. स्वामी पुणतांबा-हिंगुणि-पूरणगाव-धोतर्यावरुण आले व वांजरगाव-डोमेग्राम कडे निघले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: