Saur (साउर)

तळवेल, ता. चांदूरबाजार जि. अमरावती


साऊर येथील 1 स्थान - साऊर येथील स्थान गांवातच मधोमध मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

तळवेलहून नैर्ऋत्येस साऊर पायमार्गे 4 कि. मी. आहे. साऊर हे गाव, आसेगाव-यावली मार्गावर आहे. वलगाव-चांदूरबाजार मार्गावरील शिराळा फाट्यापासून पश्चिमेस 6 कि.मी. अंतरावर साऊर आहे. अमरावती ते साऊर 29 कि. मी. साऊरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तळवेल ते साऊर 12 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान साऊर गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळाला उत्तराभिमुखही एक दरवाजा आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना राम्याहून साऊरला आले. आड अवलोकन केल्यावर त्यांना येथे आसन झले. गुळळा, विडा झाला. (पू. ली. 162, स्था. पो.) त्यानंतर ते येथून तळवेलला गेले.

आसन स्थानाच्या पूर्वेचे व पश्चिमेचे स्थान निर्देशरहित आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. बाळसमुद्र अवलोकणे स्थान


निर्देशरहित स्थाने : 2


साऊरची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 162
  • Saur : साउरीं बाळसमुदृ अवलोकणें: वस्ति :।।:
  • गोसावी साउरासि बिजें केलें: तेथ पस्चिमें उभेया राहुनि बाळसमुद्र अवलोकुनी चहुं दिसां अवलोकीलियाः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा बाळसमुद्र मां:’’ मग नावेक तियेची चैबारां आसन जालें: मग लिंगाचा देउळीं आसन जालें: गुळळा जालाः विडा जालाः मग धाबां आसन जालें: तेथचि वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-सिंनापूर-वाठवडा-वाकी-थुगांववरुन येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: