Sasht Pimpalgaon (साष्ट पिंपळगाव)

साष्ट पिंपळगाव ता. अंबड, जि. जालना


येथील 2 स्थाने - आमच्या स्वामींचे 1 स्थान - हे स्थान पिंपळगांव गावाच्या पश्चिमेकडे 1 कि.मी.अंतरावर शेतात मंदीरात आहे.
श्रीप्रभू बाबांचे संन्यास स्थान - हे स्थान पिंपळगांव गावाच्या पश्चिमेकडे 500 मीटर अंतरावर नदीपात्रात आहे 


जाण्याचा मार्ग :

आपेगावहून ईशान्येस साष्टीपिंपळगाव 2 कि.मी. आहे. साष्टीपिंपळगाव पैठण-शहागड मार्गावर पैठणहुन आग्नेयेस 32 कि.मी. आहे. व शहागडहून वायव्येस 9 कि. मी. आहे. साष्टीपिंपळगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान आपेगावपासून ईशान्येस दीड कि.मी. आणि पिंपळगावच्या 1 कि.मी. अंतरावर बैलगाडी रस्त्याच्या उत्तरेस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे सोमनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या पटीशाळेवरील हे स्थान होय.थून खालील श्रीगोविंद प्रभू संन्यास स्वीकार स्थान पूर्वेकडे 500 मीटर अंतरावर आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात डोमलगावहून साष्टीपिंपळगावला आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. उपाध्यांना पाने आणण्यासाठी पाठविले. ते येईपर्यंत सर्वज्ञ येथेच होते. (पू. ली. 530, स्था. पो.) त्यानंतर ते येथून आपेगावला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. श्री गोविन्द प्रभू संन्यास स्विकार स्थान (पंचलिंगी) :

हे स्थान स्वामींच्या आसन स्थानापासून पूर्वेकडे 500 मीटर अंतरावर आणि पिंपळगावच्या पश्चिमेकडे 500 मीटर अंतरावर नदीपात्रात पूर्वाभिमुख देवळात आहे. येथील पाचही लिंग नमस्कारी आहेत.

लीळा : या ठिकाणी श्रीप्रभूबाबांना सन्यांसदिक्षा झाली असल्याने हे एक महत्वाचे स्थान आहे. पंचलिंगी हे श्रीगोविंदप्रभू चरणांकित या भागातील एकमेव स्थान आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. पंचदेऊळी आसन स्थान.


साष्ट पिंपळगावची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 530
  • Pimpalgaon (Sasthi) : पींपळगावी सोमनाथीं आसन :।।:
  • तेथौनि गोसावी सिध्दनाथाचिया देउळां बिजें केलें: मार्गीहुनि उपाध्यें पींपळगावां तांबुळ आणूं धाडिलेः मग सिध्दनाथीं रीगतां डाविएकडें पटिशाळेवरि आसन जालें: गुळळा जालाः विडा जालाः उपाध्ये येति तवं सिध्दनाथीं आसन जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर (नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव वरुण सास्टीपींपळगावला आले. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: