Sanvatsar (संवत्सर)

संवत्सर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर


येथे 3 स्थाने आहेत -
संवत्सर आश्रम गावाच्या पश्चिमेकडे गोदावरी नदीच्या काठावर हे स्थान आहे.
दुसरे स्थान मंदीराच्या बाजुलाच आहे.
तीसरे पांच पायरीचे स्थान तेथुन जवळच गोदावरी नदीच्या पूलाखालून गेल्यावर लहान मंदीरात हे स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

संवत्सर हे गाव, कोपरगाव-वैजापूर (धोत्रा मार्गे) मार्गावर कोपरगावहून पूर्वेस 7 कि.मी. आहे व वैजापूरहून नैर्ऋत्येस 27 कि.मी. आहे. सुरेगावहून कोळपेवाडी, धारणगाव, कोपरगाव, संजीवनी साखर कारखानामागे संवत्सरला जाता येते. संजीवनी साखर कारखाना ते संवत्सर 3 कि.मी. दौड-मनमाड लोहमार्गावरील कोपरगाव रेल्वे स्थानकापासून 3 कि.मी. अंतरावर संवत्सर हे गाव आहे. संवत्सरला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानालगतच महानुभाव आश्रम आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान संवत्सर गावाच्या पश्चिम विभागी महानुभाव आश्रमामध्ये उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सोनारीहून संवत्सरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर झाल्यावर ते येथून नदी पलीकडील सिंगेश्वराकडे गेले. (पू. ली. 276)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. परिश्रय स्थान :

हे स्थान वसती स्थान देवळाच्या पश्चिम बाजूस दक्षिणाभिमुख देवळात आहे. (स्था. पो.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आसन स्थान :

हे स्थान संवत्सर गावाच्या पश्चिमेस अडीच फर्लाग अंतरावर गोदावरी नदीच्या उत्तर काठी पूर्वाभिमुख देवळात आहे. या स्थानाला पाच पायऱ्यांचे’ स्थान असे म्हणतात.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू सोनारीहून आल्यावर त्यांना प्रथम येथे आसन झाले. (चि. म. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. सिंगेश्वरी आसन स्थान.


संवत्सरची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 276
  • Savatsar : संवत्सरीं सिंगश्वरीं आसनः आदित्यीं वसति : दुसरां सिंगश्वरीं आसन :॥:
  • गोसावी सिंगश्वरा बीजे केलेः तेथ चौकीऔभे राहीलेः बाइसीं झाडुनि आसन केलेः मग गोसावी सिंगश्वराचेया गाभारेयाच्या दारसंका धरुनी क्षणु एकु भितरीं अवलोकन केलेः आणि येउनि आसनीं उपविष्ट जालेः दुपाहाराचा पूजावसरु जालाः आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा ओळगविलाः पहुड उपहुड जालाः मग आदित्यीं वसति जाली :॥: गोसावीयांसि उदयाचा पूजावसरु जालेयानंतरे गोसावी पैलाडी दुसरां सिंगश्वरीं बीजे केले : तेथ आसन जालेः दुपाहाराचा पूजावसरु जालाः आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा ओळगविलाः पहुड उपहुड जालाः :॥:
  • (..येथे हे पहील्यांदा येने…स्वामी नासिक-सुकिना-नांदौर-सोनारीवरुण आले व कोंकमठनकडे निघले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: