Sangam Jalgaon (संगम जळगाव)

संगमजळगाव, ता. गेवराई, जि. बीड.


येथील 3 स्थान-हे स्थान आगरनांदूर गावाच्या पूर्वेकडे 1 कि.मी. अंतरावर अथवा संगमजळगांव गावातच दक्षिणेकडे 1 कि.मी. अंतरावर संगमेश्वर महादेव मंदीरातील चौक म्हणजे 1 स्थान होय. बाकी दोन स्थाने याच मंदिराच्या परिसरात आहेत.


जाण्याचा मार्ग :

गेवराईहून बागपिंपळगाव, रेवकीदेवकी, झोपडपट्टीमार्गे संगमजळगावच्या स्थानाकडे जाता येते. हे अंतर 11 कि.मी. आहे. संगमजळगावला जाण्यासाठी गेवराईहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. संगमेश्वराच्या देवळाच्या चौकातील अवस्थान स्थान :

हे स्थान आगर नांदूर गावाच्या पूर्वेकडे 1 कि.मी. अंतरावर अथवा संगमजळगांव गावातच दक्षिणेकडे 1 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या पूर्व काठावर संगमेश्वर महादेवाच्या पश्चिमाभिमुख देवळातील चौक म्हणजे हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात मिरगावहून संगमजळगावला आले. संगमेश्वराच्या देवळाच्या चौकात त्यांचे पाच दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून आगरनांदुरला गेले.

सन 1987,88 मध्ये संगमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यामुळे सर्वज्ञांचे अवस्थान स्थान अनुपलब्ध झाले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. बहिर्वास वेढणे स्थान :

हे स्थान संगमेश्वराच्या देवळाच्या नैर्ऋत्येस गोदावरी नदीच्या पूर्व काठावर पश्चिमाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू विद्रुपा (क्षुद्रा) नदीत अवधूताकडून सांडोवा बांधून घेत होते. तेव्हा काळदासभट साडेगावहून उपहार घेऊन आले. सर्वज्ञ म्हणाले, “अभ्यागत आले. आता व्यापार पुरे करा.” मग सर्वज्ञांनी येथे येऊन बहिर्वास नेसला. नंतर भोजनतेकडे गेले. (पू. ली. 514)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. काळदासभटांचा उपहार स्वीकार स्थान :

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंनी काळदासभटांचा उपहार स्वीकार केला. (पू. ली. 514) (एकाच्या मते निर्देशरहित)

हे स्थान संगमेश्वराच्या दक्षिणेस श्री. कदम यांच्या शेतात उत्तराभिमुख देवळात आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

(1) मलीनाथाच्या देवळीतील पूजा आरोगणा स्थान.

(2) लिंगाच्या देवळीतील आसन स्थान.

(3) परिश्रय स्थान.

(4) क्षुद्रा नदी सेतु बांधणे स्थान.

(5) अवस्थान स्थान.


संगमजळगावची एकूण स्थाने : 8


  • Purvardha Charitra Lila – 513
  • Sangamjalgaon : संगमेस्वरीं अवस्थान :।।: (संगमजळगाव)
  • एरी दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालाः मग गोसावी तेथौनि बिजें केलें: संगमेस्वरीं पंचरात्र अवस्थान जालें: संगमेस्वराचें देउळ पूर्वाभिमुखः जगतिचां दारवंठां उत्तराभिमुखः इशान्ये कोनासमीप चौकीं गोसावियांसि अवस्थानः पूर्विलीए पौळी खिडकीः तियें खिडकीहूनि परिश्रयां बिजें करीतिः संगमेस्वरीं चैकी पहूड होएः मल्लिनाथाचिये देउळीये दुपाहारचा पूजावसरू होएः आरोगणा होए :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामीं रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला आले. स्वामींचे पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी मिरगाव मार्गे संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 514
  • Sangamjalgaon : क्षुद्रा नदी सेतु बांधणें :।।: / क्षुद्रा नदी सेतुबंधनी उपाध्यां भेटि :।।: (संगमजळगाव)
  • बाइसें नांदौरासि भिक्षे जातिः तें मार्गी क्षुद्रा नदी होंतीः तेथ चिखलु होताः तेणें बाइसें माखलीं येतिः एकु दीं उदेयाचा पूजावसर जालेंयानंतरें गोसावी क्षुद्रा नदीसि बिजें केलें: सरिसे अवधूत असतिः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘एथ ऐसीं प्रवृत्ति गाः जे क्षुद्रा नदीसि सेतु बांधावाः’’ अवधुती म्हणितलें: ‘‘जी एथ सेतु कैसा बांधवैल?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि तुम्ही पाषाण आणौनि द्याः मग हें बांधैलः’’ अवधुती म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग गोसावी पाटाउं पागेची उभी धाटी केलीः तें पाग भूमिका काळीः धारी लोहवीः तें मेघवर्णी पागः तियें मेघवर्णीए पागेचां उभे धाटिया धाटा केलाः तळपाची तळसूति केलीः मग उभे राहौनि गोसावी सेतु बांधतिः भक्तिजन पाषाण आण आणू देतिः ऐसा सांडोवा बांधौ सरलाः तवं उपाध्यें आलेः गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: तेथ उपाध्यासीं भेटि जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामीं रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला आले. स्वामींचे पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी मिरगाव मार्गे संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 514
  • Sangamjalgaon : काळीदासभटांचा उपहारू स्वीकारू :।।: (संगमजळगाव)
  • तवं साडेगाउनी काळीदासभट उपहार घेउनि आलेः गोसावी तयातें येत देखिलें: आणि म्हणितलें: ‘‘आतां एथ अभ्यागतें आलीं: पूरों द्या व्यापारू आतां महात्मेयां होआवें लागैलः भक्तिजनें आलीं:’’ अवधुती म्हणितलें: ‘‘हो जीः’’ मग गोसावीं वस्त्रापासी बिजें केलें: गोसावी शीघ्रता बहिर्वासु वेढिलाः फुटा पांगुरलेः फुटेयाची बुंथी घातलीं: भोजनतेयाकडें बिजें केलें: पुढां काळीदासभटः डोइये उपहाराची पाटीः मागें गौराइसांचिये डोइये आंबाचेया वडेयाचें मडकें: गौराइसीं गोसावियांतें देखिलेः आणि वरूतिया दृष्टी श्रीमूर्ति पाहातें येतें असतिः तेणे दुचितीं जालीं: आणि अडखुळलीं: आंबेचें मडकें फुटलें: तैसेचि वडे भरूनि घेउनि आलीं: गोसावी कपाटासि बिजें केलें: आसन जालें: तियें आलीं: भेटि जालीः तेहीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः मग गोसावियांसि गुळळा जालाः श्रीचरण प्रक्षाळिलेः टिळा जालाः बाइसीं दुपाहारचा पूजावसर केलाः बाइसीं गोसावियांसि ताट केलें: भक्तिजन अनुक्रमे आपुला ठाइं बैसलेः तया ठाये केलेः गोसावी पुसिलें: ‘‘बाइः हें पैल खापरि काइ?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आंबेचें मडकेः गौराइसें अडखळलीं: तें फुटलें:’’ गौराइसीं म्हणितलें: ‘‘तैसेचि भरूनि घेउनि आलीयें जीः सांडले वडे गोसावियांसि कैसें वाढीं जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आणा आरूतें:’’ मग तिहीं गोसावियांचां ताटी वडा ओळगवीलाः आंब वाढिलें: गोसावी प्रसादु केलाः अवघेयांचां ठाइं वाढिलेः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा जालाः मग बाइसें: काळीदासभटः गौराइसें जेविलीं: गोसावियांसि पहूड जालाः उपहूड जालाः विळवेर्‍ही होतें: नांदुर दृष्टी अवलोकिलें आणि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आतां एथें अभ्यागतें आलीं: हें तवं अरण्यः आतां ग्रामां मध्यें नंदापूरासि जाइजेः’’ गोसावी काळीदासभटांसि पाठवणीं दिधलीः मग तैसेचि गोसावी नांदौरासि बीजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामीं रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला आले. स्वामींचे पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी मिरगाव मार्गे संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 515
  • Sangamjalgaon : तीरीं मूर्तिवेधप्रकाशें श्रीक्रष्णवेधु प्रशंसा :।।: (संगमजळगाव)
  • बाइसासरिसी अवघीं भक्तिजनें गोसावी उजु वाटा पाठविलीः गोसावी उपाध्यांचेया खांदावरि श्रीकरूं घालूनि गंगेचेनि तीरें बिजें केलें: गोसावियांचिये श्रीमूर्तिची साउली उदकामाजी पडिलीः तेणें तळीची जळचर तिये वरूतीं आरूतीं आलीं: गोसावियांची श्रीमूर्ति पाहातें असतिः मग उभेया राहुनि गोसावीं उपाध्यातें म्हणितलें: ‘‘बटिकाः ये काइ गा पाहातें असति?’’ तवं तें उगेचि होतें: मग गोसावी उपाध्यातें म्हणितलें: ‘‘बटिकाः द्वापरीं श्रीक्रष्णचक्रवर्ति यमुनेचिया थडिया थडिया बिजें करीति असतिः पाताळगतें जळचरें: तेही तळु घेतला असेः तें श्रीमूर्ति अवलोकावेया वरूतीं येतिः जळचरे वेधुनि तल्लिने होतिः ऐसें गा तें वेधाचार्य’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः द्वापर तें गोसावीं आजी एथचि दाखविलें: द्वापरींचे गोसावीं तेचि आमचे गोसावीं होतिः तैसेचि गोसावियांची श्रीमूर्तिची धवधनी ये वरूति बगुटे करौनि घेतातीः’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘श्रीक्रष्णी शतासहस्त्रां वेधुः एथीचा नामीचि वेधुः’’ :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामीं रावसगाव येथे १ दिवस वसति व १० दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. त्यानंतर स्वामी पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला आले. स्वामींचे पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी मिरगाव मार्गे संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान) होते. तेव्हाची ही लीळा…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: