Salbardi (सालबर्डी)

सालबर्डी ता. मोर्शी जि. अमरावती


मौन्यदेव स्थान - माडु नदीच्या उत्तरेकडे काठावर मोठ्या मंदीरात आहे. ससारक्षण थांब्यापासुन जवळच आहे, उत्तरेकडे लहान रस्त्याने जीप जाते.
ससारक्षण स्थान - माडु नदीच्या दक्षिनेकडे काठावर मोठ्या मंदीरात आहे. बस थांब्यापासुन पश्चिमेकडे लहान रस्त्याने जीप जाते. मुक्ताबाइ गुंफा स्थान - गंगा नदीच्या उत्तरेकडे नदीच्या काठावर मंदीरात चौकात आहे. लहान रस्त्याने पायी जावे लागते. जीप गाडी जात नाही.


जाण्याचा मार्ग :

सालबर्डी हे गाव, मोर्शीहून उत्तरेस 10 कि. मी. आहे. रिद्धपूर ते सालबर्डी 35 कि. मी. खेड ते सालबर्डी 32 कि. मी. सालबर्डीला जाण्यासाठी मोर्शीहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. ससा रक्षण स्थान :

हे स्थान सालबर्डी एस. टी. बस थांब्यापासून वायव्येस दोन फाग अंतरावर पर्वताच्या आडोशाला पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळाच्या सभामंडपाला उत्तराभिमुख व दक्षिणाभिमुख असे दोन दरवाजे आहेत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूना एकांकामध्ये येथे एका वृक्षाखाली आसन होते. त्यावेळी पारध्यांनी सोडलेला पैजेचा ससा त्यांच्या मांडीखाली येऊन लपला. त्या सशाचे सर्वज्ञांनी रक्षण केले व पारध्यांना अहिंसाधर्माचे निरूपण करून त्यांना हिंसेपासून परावृत्त केले. (पू. ली. 42, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आसन स्थान :

हे स्थान ससा रक्षण स्थानापासून ईशान्येस एक कि. मी. अंतरावर माडू नदीच्या उत्तर काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. हे ठिकाण ‘मौन्यदेव’ या नावाने ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंना एकांकात येथे आसन असताना त्यांची व मुक्ताबाईंची भेट झाली. तिने सर्वज्ञांना विनंती करून आपल्या गुंफेत नेले. (पू. ली. 23, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. मुक्ताबाईच्या गुंफेतील पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान मौन्यदेव स्थानापासून ईशान्येस तीन फलांग अंतरावर गंगा नदीच्या पूर्व काठी पश्चिमाभिमुख देवळाच्या चौकात आहे. मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे.

लीळा : 1. मुक्ताबाईने येथे सर्वज्ञांची वनपुष्यांनी पूजा केली. दंडवत घातले. नंतर हात जोडून मुक्ताबाई म्हणाली, “इतके वर्षे तप केले, त्याचे फळ आज मिळाले.” मग तिने सर्वज्ञांना कंदमूळ फळांची आरोगणा दिली. (पू. ली. 23) 

2. बोल्हा बारीयाला येथेच सर्वज्ञांच्यापासून स्थिती झाली. (पू. ली. 24) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


सालबर्डी ची एकूण स्थान : 3


  • Purvardha Charitra Lila – 22
  • Salbardi : पर्वतीं क्रीडा/कृडा :।।:
  • ऐसींया उघडीया श्रीमूर्ति खडेयागोटेयाआंतु पहूड स्वीकरीतिः मग गोसावी पर्वता बीजें केलें: ऐसिया परि पर्वतीं सालबर्डी बारा वरिषें क्रीडा/कृडा केलीः एकु दीं मुक्ताबाइयेसि गोसावी भेटि दिधली :।।:
  • Purvardha Charitra Lila – 23
  • Salbardi : मुगताबाइये भेटि :।।: / मुक्ताबाइये भेटिः स्तीति :।।:
  • गोसावियांसि निंबातळी आसन जालें: तवं जपीये विष्णुभट गंगे संध्यास्नान करौनि हातीं तांबवटीः तांबवटीए तुळसीः ऐसें विज्ञानेस्वरा येत होतेः गोसावियांतें देखिलें: आणि साउमे आलेः दंडवत केलें: श्रीचरणां लागलेः गोसावी श्रीकरें पाठ स्पर्शिलीः ‘‘बाइः ब्राम्हण कैसा तापसुः तिन्ही रीतु साधलीया असतिः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो बाबाः अवघी पाठ उन्हें कर्पली असेः’’ याउपरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइल तेही कैसी तापसः’’ बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः तें कोण बाइल?’’ गोसावी म्हणितलें: ‘‘मुक्ताबाइः विक्रमाची राणीः भर्तृहरीची भावजैः भर्तृहरी तियेचेया आवारां भिक्षें गेलेः तवं तिहीं ताटी आइती भिक्षा करौनि ठेविली होतीः तियें न्हातें होतीः जैसा भर्तृहरीचा ‘भिक्षा’ शब्द आइकीलाः तैसीचि चोखणी लाविते उठिलीः केशाची वीरगुंठी घातलीं: ताट घेउनि दिगंबरें निगालीः तें वरूतें न पाहात निगालेः तियें पाठींचि निगालीः दारवंठां बोल्हा राऊत होताः तो बाारीः तो हातीं धरूनि बाहिरी निगालीं: तियें दोघें भर्तृहरीचिया गुरुची उपदेशींएं: एकविधा अवस्था पातलीः सर्वांगीं रोमा निगालीः सर्वांगा अवयवां तेचि पांगरूण जालीः रोमा सर्वांगीं पाहाळी गेलीः माथाचिया जटै पाघोळीयाः हातापायाची नखें चुंभळी वळीली असतिः तियें बैसति तरि तियेचीया जटै मागां पुंजा होतिः उभी होति तरि तयाचीया जटा भुइसीं काढेतः सेवाळैले दांतः ऐसीं कर्दळीं पर्वतीं असतिः।: गोसावियांसि एके ठाइं आसन जालें असेः तवं मुक्ताबाइया गोसावियांसि देखिलें आणि गोसावियांसि आदेशिलें: दंडवते घातलीं: श्रीचरणां लागौनि विनविलें: ‘‘जी जीः माझी पैर्‍हां पर्णकुटीका असेः तेथ गोसावी बिजें करावें:’’ गोसावियांसि तेथ बिजें करावाची प्रवृत्तिः आपुलेया आश्रमा घेऊनि आलीः कुशासन बैसों घातलें: मग गोसावी आसनीं उपविष्ट जालें: जटा सोडूनि श्रीचरण झाडिलें: मग श्रीचरण प्रक्षाळण केलें: मग गोसावियांसि बरवी वनपुष्पांची पूजा केलीः कंदमूळफळांची आरोगणा दिधलीः लवंगाजयफळांची मुखसुधि दिधलीः मग दंडवतें घालूनि दोन्ही हात जोडूनि पुढा उभीं ठेलीः मग म्हणितलें: ‘‘जी जीः आजी सुदिनः आजी भाग्य माझें: जे राऊळीं यां आश्रमां बिजें केलें: इतुके दी तप केलें: तयाचे फळ आजी जालें जी’’: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ते कैसें बाइ?’’ तिया म्हणितलें: ‘‘ना ऐसया पुरूखासि आजी दरीसन जालें जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ऐसें होए बाइः’’ तयासि स्तीति जालीः सर्वज्ञें बाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः कैसी बाइल निर्‍हा तापसः पाहाळीं गेली लोवं: चुंभळी वेळलीं नखें: भूइं काढति जटैः मुक्ताबाइ ऐसें नांवः बाइः कैसी बाइलनिर्‍हां तापसः’’ ऐसें मागुतें पुनःपुनः तोखतिः बाइसीं पुसिलें: ‘‘हां बाबाः तिचेया तेयासि किती वरूषें जाली?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तेरासें वरूषें:’’ बाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः तियें तेथ ऐसीं असतिः तरि तियेसी प्रावर्णे काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तियेचीया आंगीची रोमे पाहाळी गेली असतिः तेणें तियेचे अवघे देह आच्छादौनि गेलेः तें प्रावर्ण जाले असतिः’’ बाइसीं पुसिलें: ‘बाबाः तयासि काइ दिधलें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तयासि देहविद्या दिधलीः बोल्हा तो सिध्द जालाः तियें कर्दळीवनीं असतिः आणि हें तेथ बारा वरूषें होतें:’’ ऐसें गोसावी भक्तिजनाप्रति सांघितलें :।।: (हें गोष्टि गोसावी विज्ञानेस्वराचेया निंबातळी विष्णुभटाउपरि बाइसांप्रति सांघितलीः बाइः ब्राम्हणु कैसा तापसु :।।:)
  • Purvardha Charitra Lila – 24
  • Salbardi : बोल्हाबारीया स्तीति :।।:
  • बोल्हा तो मुक्ताबाइचा बारीः तो कंदमुळाः वनफळासि गेला होताः तो आलाः तेयासि गोसावियांचें दरीसन जालें: गोसावियांतें जोहारीलें: दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलाः पुढां बैसलाः आणि गोसावियांचे उदास्य वैराग्य देखौनि तयासि थोर आश्चर्य वर्तलें: मग तेणें श्रीमूर्तिचें कांटे फेडिलें: पोतुके भिजउनी श्रीमूर्ति असूध पुसिलें: मग तेही गोसावियांसि बरवी पूजा केलीः गोसावी बिजें करूं आदरिलें: मुक्ताबाइ अनुवर्जित आलीं: गोसावी तियेतें राहाविलें: ‘‘जी तरि बोल्हा अनुवर्जित येइलः’’ मग तो मुक्ताबाइया गोसावियांतें बोळवित पाठविलाः तो बोळवित निगालाः दूरस्थ अनुवर्जिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बोल्हेयाः आतां तुम्हीं राहाः मुक्ताबाइ तुमची अवसरी करीलः’’ मग तेणें म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ मग गोसावियांसि दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: राहीलें: आणि तेयासि गोसावियांपासौनि स्तीति जालीः मग गोसावी बिजें केलें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 42
  • Salbardi : ससीक रक्षण :।।:
  • गोसावियांसि गावीं एकी वस्ति जालीः मग उदेयाचि गोसावी विहरणा बिजें केलें: वृक्षाखाली आसन असेः तवं गांवीचा रावो ससेयाचीयें पारधी निगालाः मग दोघां पारधीयासि होड पडिलीः एक ससा दोघी पारधी होडेचा निवडीलाः जयाची सुनें ससा टाकी तो होड जिंकेः रानीं दरादरकुटा नाहीं: वोहोळखोहोळ नाहीः ऐसीं समस्थळ भुमिका चापडी तेथ दोही पारधीं वाटें ससा सोडिलाः तयापाठीं सुनी सोडिलीं: ससा भयभीत होउनि पळत जात होताः तवं गोसावियांसि देखिलें आणि तो गोसावियांतें टाकुनी आलाः तो काकुलती येउनि श्रीमुख अवलोकीतु बैसलाः तवं मागिलाकडौनि सुनी आलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे हो याः’’ म्हणौनि जानु वरती केलीः ससा जानुतळीं रीगालाः सुनी उभी राहिलीं: मागिलाकडौनि पारधी आलेः पुढां उभे राहिलें: तवं तैसें देखिलें: तिहीं दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलेः विनविलें: ‘‘ससा सोडिजो जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा एथ शरण आला असेः’’ पुढति तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः हा होडेचा ससाः सोडावा जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा नेदिजेः हा एथ शरण आलाः’’ पुढति विनविलें: ‘‘जी जीः हा होडेचा ससा जीः याकारणें काल लागैल जीः सुरीया काढेनां होती जीः हा सोडावा जीः’’ मागौतें सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः एथ शरण आलेयां काइ मरण असे?’’ मग तेही म्हणितलें: ‘‘जी जीः तरि हा गोसावी राखिलाः’’ म्हणौनि श्रीमुखाची वास पाहुनि निगते जालें: तेव्हेळी गोसावी निरूपण केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हां गाः ये तरि रानी वनी असतिः तन खातिः नदी वाहाळांची पाणी पीतिः यांतें तुम्हीं कां माराः ये तुमचे काइ करीति?’’ ऐसें बहुत निरूपण केलेः मग तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः आजीलागौनि न मारूं आणि काइ जीः’’ ऐसें म्हणौनि तेही दंडवते घातलीः श्रीचरणां लागलेः मग तें गेलेः आणि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘महात्मे हो आतां जाः खेळाः’’ ऐसें म्हणौनि जानू उचलिलीः दृष्टी अवलोकिलाः ससा निगालाः तयासि देहविद्येची रस्मी संचरीली म्हणौनि तो अद्यापी पर्वती अजरामर होउनि असेः मग बाइसीं पुसिलें: ‘बाबाः तें कोण नगर?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तें विंझेया पर्वतापासील पाळे दिवठाणेः’’ हे चरित्र ‘पांचाळेस्वरीं अभियोगें ब्राम्हणु रक्षण’ या प्रस्तावेयाउपरि बाइसाप्रति सांघितले :।।:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: