Sakat (साकत)

साकत, ता. जामखेड जि. अहमदनगर


येथील स्थाने साकत गावाच्या नैऋत्येकडे सरकारी दवाखान्याजवळच्या मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

साकतला जाण्यासाठी जामखेड व पाटोदा येथून मार्ग आहे. जामखेड ते साकत 12 कि. मी. पाटोदा ते साकत (महासांगवीमार्गे) 8 कि. मी. सौताड्याहून आग्रेयेस साकत पायमार्गे 6 कि. मी. आहे. साकतला जाण्यासाठी जामखेड व पाटोदा येथून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान साकत गावाच्या नैर्ऋत्य विभागी सरकारी दवाखान्याजवळ उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे बीजेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पाटोद्याहून साकतला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ला. 335, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून सौताड्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान.


साकतची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: