Rokada-Kada (रोकडा-कडा)

रोकडा (कडा), ता. गेवराई, जि. बीड.


येथील 1 स्थान - हे स्थान ओसाड रोकाडा गावात गोदावरी नदीच्या पैल (दक्षिणेकडील) काठावर लहान मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

बळेगाव हून दक्षिणेस रोकडा (कडा) नदीपलीकडे अर्धा कि.मी. आहे. येथून पांचाळेश्वर चे स्थान 1 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान गोदावरी नदीच्या दक्षिण काठी गढीवर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात बळेगावहून रोकड्याला आले. त्यांना येथे थोडा वेळ आसन झाले. मग ते येथून पांचाळेश्वरला गेले. (पू. ली. 544, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

(1) नदीच्या थडीचे आसन स्थान


रोकड्याची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 544
  • Rokada (Kada) : डोणीं आरोहणें गंगा उतरौनि कडां आसन :।।:
  • तेथौनि गोसावी बिजें केलें: पीवळदरडी वरिलीकडें वोतापासी बिजें केलें: तेथ डोणी होतीः गोसावी डोणीसि बैसलेः बाइसें मुख्यकरौनि अवघी भक्तिजनें बैसलीं: गोसावी गंगा उतरलेः कडां नावेक आसन जालें: बाइसीं चरणक्षाळण केलें: गुळळा जालाः विडा ओळगवीलाः मग गोसावी तेथूनि बीजें केलें: रोकडा नावेक आसन जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामींचे आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. पूढे स्वामी नंदापूर(नांदौर)-बागपिंपळगाव-खामगाव-शहागड-गांधारी-डोंबलगाव-सास्टीपींपळगाव-आपेगाव वरुण बळेगावला आले. स्वामींचे येथे ५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते. गंगा उतरौनि ‘कडां’ या ठिकाणी आसन जाले. व ‘रोकडा’ या ठिकाणी नावेक आसन जालें. पूढे स्वामीं पांचाळेश्वरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: