RanJogeshwari (रानजोगेश्वरी)


रानजोगेश्वरी (वृद्धासंगम), ता. शेवगाव, जि. अहमदनगर


रानजोगेश्वरी (वृद्धासंगम)  हे स्थान खिरडी स्थानापासून उत्तरपूर्वेस (ईशान्येस) दीड अथवा 3 कि.मी. आहे असे बोलल्या जाते. कारण हे ठिकाण मुख्य धरणाच्या जवळ आहे आणि येथून पैठण 5 कि.मी. आहे. म्हणून हे स्थान कधीच खुले होणार नाही असे समजते. जेव्हा 44 वर्षांनी खिर्डी चे स्थान खुले झाले तसेच खूप दुष्काळी परस्थितीत झाले तरच हे स्थान करने शक्य होईल.


खिरडी स्थानापासून उत्तरपूर्वेस (ईशान्येस) दीड अथवा 3 कि.मी. वृद्धानदी आणि येळगंगा नदीच्या दक्षिण काठावर जोगेश्वरीच्या दक्षिण पाठशाळेत पश्चिम विभागी उत्तराभिमुख गुंफेत दोन महिने स्वामींचा मुक्काम झाला. यालाच रानजोगेश्वरी किंवा वृद्धासंगम सुद्धा म्हणतात. येथील स्थाने धरणाच्या अथांग पाण्यात बुडालेली आहेत.

रानजोगेश्वरी (वृद्धासंगम) हे गावाचे नाव नसुन ठिकाणाचे नाव आहे. गोदावरीच्या उत्तर काठावर पैठण जवळ, ज्या ठिकाणी एलगंगा(एळा) व वृद्धा या नद्या ज्या ठीकाणी गोदावरी नदिला भेटतात, त्या संगमाजवळील हे ठिकाण. संगमाजवळचे हे जोगेश्वरी चे देऊळ त्यावेळेस रानात होते म्हणून याला रानजोगेश्वरी सुद्धा म्हणतात. आज मात्र हे ठिकाण पैठणच्या नाथसागर धरनात लुप्त झालेले असल्यामुळे वंदनास उपलब्ध नाही.


अनुपलब्ध स्थान :

रानजोगेश्वरी-वृद्धासंगम येथील खालील उत्तरार्ध लीळांची स्थाने अनुपलब्द्ध आहेत –

1. जोगेश्वरी गुंफे अवस्थान
2. जोगेश्वरी दारवंठा आसन स्थान
3. जोगेश्वरीच्या देउळामागे भीडी आसन स्थान
4. जोगेश्वरीच्या देउळा पटीशाळेवरील आसन स्थान
5. चिंचेची पालवी उतरणे स्थान
6. गुंफेच्या आंगणी मादने स्थान
7. संगमेश्वराच्या देउळातील चौकातील आसन स्थान
8. वडाखालील आसन स्थान
9. वडाच्या पूर्वे उभे राहणे स्थान
10. जोगेश्वरीच्या देउळा भितरी रिगता डावेया हाता आसन स्थान
11. उत्तरे परिश्रय स्थान
12. पश्चिमे परिश्रय स्थान

(स्थानपोथी अथवा उत्तरार्ध लीळाचरीत्रामध्ये याचा उल्लेख येतो)

Google Map Area Link 👈 (किल्क करा)


रानजोगेश्वरी चे स्थान : 12


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: