Rama (रामा)

रामा, ता. भातकुली जि. अमरावती


रामा येथील 1 स्थान गांवाच्या पश्चिमेकडे गांवातच च्यार बाजुंनी पायर्या असलेले मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

रामा हे गाव, आसेगाव-यावली मार्गावर टाकरखेड्याहन वायव्येस 4 कि. मी. आहे. अमरावती ते रामा (थूगाव मार्गे) 30 कि. मी. व टाकरखेडा मार्गे 28 कि. मी. आहे. रामा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. स्थानापासून जवळच थोड्या अंतरावर महानुभाव मठ आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान रामा गावाच्या पश्चिम विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. देवळाकडे चढून जाण्यासाठी पूर्व बाजूने पायऱ्या आहेत.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना थूगावहून राम्याला आले. त्यांना येथे आसन झाले. त्यावेळी गावातून एक ब्राह्मण आला. त्याने सर्वज्ञांना आरोगणेची विनंती केली. मग दहीभात घेऊन आला. सर्वज्ञांनी आरोगणा केली. गुळळा, विडा झाला. (पू.ली. 161,ख.प्र.,स्था. पो.) त्यानंतर ते येथून साऊरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


राम्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 161
  • Rama : रामा लिंगाचा देउळी वस्तिः ब्राम्हणाचा दधिभात आरोगण :।।:
  • तेथौनि गोसावी रामेयासि बिजें केलें: गावापसिमे काटीयेतळीं नावेक आसन जालें: मग लिंगाचा देउळीं नावेक आसन जालें: तवं एक ब्राम्हण लिंगासि आलाः तेणें गोसावियांसि आरोगणेचे विनविलें: गोसावी मानिलें: मग तेणें गोसावियांसि दधिभाताची आरोगणा दिधलीः विडा ओळगविलाः चांगदेवभटां प्रसाद जालाः मग लिंगाचा देउळीं वस्ति जालीः उदेयाचि गणेसाचां सांजा नावेक आसन जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-एळवन-लाखापुरी-सिंनापूर-वाठवडा-वाकी-थुगांववरुन येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: