Rajur (राजूर)

राजूर, ता. भोकरदन, जि. जालना


येथील 1 स्थान - हे स्थान राजूर गावाच्या पश्चिमेकडे गावालगतच उंच टेकडीवर भव्य महादेव (भिवेंडेश्वर) मंदीर आहे, या मंदीराच्या चौकात एका बाजुस आहे. (येथील महादेवाचे पूजारी विचारल्यास सांगतात, किंवा येथे चंदन लावलेले असते त्यामुळे स्थान ओळखता येते.)


जाण्याचा मार्ग :

राजूर हे गाव, जालना सिल्लोड मार्गावर जालन्याहून उत्तरेस 25 कि.मी. आहे. व भोकरदनहून किंचित आग्नेयेस 26 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान राजूर गावाच्या पश्चिमेस टेकडीवर भीवंडेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळापुढे चौकात आहे. चौक नमस्कारी आहे. राजूर चे प्रसिध्द गणपती मंदिर विचारणे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपुरला जाताना कडेठाणहून राजूरला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 142, स्था.पो) दुसऱ्या दिवशी ते येथून शेंदुरजनला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

2. रिद्धपूरहून परतल्यावरचे गणेशाच्या देवळातील वसती स्थान.


राजूरची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 142
  • भिमडाऊवांचां राजौरीं वसति :॥:
  • उदयाचा पूजावसर जालेयानंतरे गोसावी राजौरासि बीजे केले : दुपाहाराचा विळीचां पूजावसर जालाः आरोगणा जाली : आग्नेय खिडकीः तिये खिडकीहुनि परिश्रया बीजे केले : परिश्रयो सारुनि मागुतें देउळात बीजे केले : उदका विनियोग जालाः मग आसन जालेः श्रीमुख प्रक्षाळिलेः गुळुळा जालाः भिमडाऊवांचां देउळीं वसति जाली : मग बीजे केले :॥:
  • (टिप – येथे हे पहील्यांदा येने. स्वामी कडेठान वरुण येथे आले…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Rajura : राजौरीं वसति :॥:
  • राजौरीं वसति :॥:
  • (टिप – येथे स्वामी दुसर्‍यांदा आले. यावेळी येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात आन्व्याला २० दिवस वास्तव्यानंतर स्वामी करंजखेडला आले. यावेळी स्वामींचे करंजखेडला ३ महिने वास्तव्यास थांबुन पुढे हिवरळि(जालना)कडे निघाले तेव्हा राजौर येथे वसतिस थांबले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: