Raher (राहेर)

राहेर ता. बिलोली जि.नांदेड


राहेर येथील 7 स्थाने 5 ठीकानी आहेत -
1. आसन स्थान - येथील 2 स्थाने राहेर गावाजवळच पूर्वेकडे गोदावरी नदीच्या काठावर मंदीरात आहेत.
2. अवस्थान स्थान - येथील 1 स्थान राहेर गावाच्या उत्तरेकडे गोदावरी नदीच्या काठावर जुन्या नृसिंह मंदीरातील सभामंडप/चौक म्हणजे हे स्थान होय.
3. विरहण स्थान - येथील 2 स्थान आरोगणा स्थानाच्या पश्चिमेकडे गोदावरी नदीच्या काठावर जुन्या राम-लक्षमण मंदीरातील सभामंडप/चौक म्हणजे हे स्थान होय.
4. आरोगणास्थान - येथील 1 स्थान गोदावरी नदीच्या पात्रात खडक म्हणजे हे स्थान होय. (आता मंदिर बनले आहे.)
5. घाटी आसन स्थान - येथील 1 स्थान नवीन राहेर गावाच्या बाहेर आहे. (नवीन शोध)

स्थान उजवीकडून डावीकडे – 1,2, 3, 4,5 6.

जाण्याचा मार्ग :

राहेर हे गाव, नर्सी-लोहगाव-उमरी सडकेवर लोहगावहून उत्तरेस 15 कि.मी. आहे व उमरीहून दक्षिणेस 17 कि.मी. आहे. नांदेड ते राहेर (नर्सी मार्गे) 67 कि.मी. नर्सी ते राहेर 20 कि.मी. भोकर ते राहेर 40 कि.मी. नर्सी हे गाव, नांदेड देगलूर सडकेवर नांदेडहून आग्नेयेस 47 कि.मी. आहे. लोहगाव, नर्सी निझामबाद सडकेवर नर्सीहून पूर्वेस 5 कि.मी. आहे. राहेरला जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. आसन स्थान :

हे स्थान जुन्या राहेर गावाच्या पूर्वेस गावालगतच गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. मुख्या प्रवेशद्वार पश्मिमाभिमुख आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे पिंपळाचे झाड होते. त्या झाडाखालील हे स्थान होय..


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे एकांकामध्ये राहेरला वास्तव्य असताना ते वामनपंधी ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला जात होते. वामनपेंधीची पत्नी येल्हाइसा रोज सर्वज्ञांना भिक्षा वाढत असे. एके दिवशी काही कारणामुळे येल्हाइसा मरण पावली. तिला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणले. त्या वेळी सर्वज्ञ स्मशानभूमी शेजारील पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. वामनधीने सर्वज्ञांना पाहिले. जवळ येऊन दंडवत केला आणि “माझी पत्नी मरण पावली. आता आपणास भिक्षा कोण वाढेल?’ म्हणून दु:ख करू लागले. (पू.ली. 64, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

आसन स्थान

2. वामनपेंधीची मृतभार्या जीववणे स्थान :

हे स्थान आसन स्थान देवळाच्या पूर्वेस आवारामध्येच उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : वामनपंधीचे दुःख पाहून सर्वज्ञांना कीव उत्पन्न झाली. मग सर्वज्ञ येथे आले आणि “बाई उठा ना: तुम्हांसि एथ एक पाणिपात्र देणे असे:” असे म्हणताच येल्हाइसा खडबडून उठली. (पू.ली. 64)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

वामनपेंधीची मृतभार्या जीववणे स्थान

3. विहरण स्थान :

मुख्य मंदिरापासून पश्चिमेस एक फर्लाग अंतरावर जुन्या ओसाड राहेर गावामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण थडीवर राम-लक्ष्मणाचे प्राचीन देऊळ आहे. त्या देवळाच्या दक्षिणेस लिंगाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात हे स्थान आहे. मंदिर हेमांडपंथी आहे, चौकात नमस्कारी जागेला चंदन लावले असते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे विहरणासाठी येत असत. त्या वेळी त्यांना चौकात आसन होत असे. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. लिंगाच्या देऊळी आसन स्थान :

हे स्थान प्राचीन राम-लक्ष्मण मंदिर च्या दक्षिणेस आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. अवस्थान स्थान :

हे स्थान राहेर गावाच्या उत्तर विभागी गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर प्राचीन नरसिंहाच्या पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. मंदिर हेमांडपंथी आहे, चौक नमस्कारी आहे. चौकात नमस्कारी जागेला चंदन लावले असते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभूंचे कांकात येथे 20 दिवस वास्तव्य होते, (स्था.पो)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. खडकावरील आरोगणा स्थान :

हे स्थान नरसिंह मंदिराच्या ईशान्येस गोदावरी नदीच्या पात्रात दक्षिण बाजूला खडकावर देवळात आहे.


लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू गावामध्ये भिक्षा करून येथे येऊन आरोगणा करीत असत.(स्था.पो)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. घाटी आसान स्थान/लांसिपिली खेळवणें/व्याघ्रपिली खेळवणें स्थान :

हे स्थान हरनाळा नावाने ओळखले जाते, हे स्थान जुन्या ओसाड राहेर गावापासून 2 कि.मी. अंतरावर असलेल्या नवीन राहेर गावाच्या सीमेलगत आहे.

लीळा : स्वामीजींनी वाघीणीच्या दोन पिल्लांना पकडले, मांडीवर बसवून गोंजारले आणि त्यांच्याबरोबर खेळले. तितक्यात वाघीण आली आणि डरकाळी फोडू लागली, पण सर्वज्ञांनी तिच्याकडे पाहिल्यावर तिचा रोष शांत झाला व ती एका गायी सारखी पाय चाटत बसली, मग स्वामी तिचे पिले तिला देऊन ‘सांभाडा बाई आपुली पिले’ असे म्हणत निघून गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


निर्देशरहित स्थान :

1. विहरण स्थानाच्या दक्षिणेस काही अंतरावरील उत्तराभिमुख देवळातील महाद्वार स्थान.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. जुन्या ओसाड राहेर गावामध्ये पूर्वाभिमुख देवळातील स्थान, भिक्षान्न स्वीकार स्थान तथा भिक्षान्न वेचणे स्थान या लीळेचे आहे, असे सांगितले जाते. परंतु, यासंबंधी लेखी पुरावा अद्यापही उपलब्ध झालेला नाही.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1. वामनपेंधीच्या आवारातील पाणिपात्र स्थान.


राहेर ची एकूण स्थाने : 8

निर्देशरहित स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila –
  • Raher : राएरीं अवस्थान :।।: 
  • गोसावी राएरासि बिजें केलें: तेथ अवस्थान जालें :।।: टिप: स्वामि पहिल्यांदा एकांकात आले होते. यावेळीही एकांकातच राहेरला स्वामि दुसर्यांतदा आले.
  • Purvardha Charitra Lila – 35
  • Raher :॥: पंचकौळाचार्य गृह निवृत्ति :॥::  
  • गोसावी वीहरणस्थाना बीजें करितातिः दखिणेस्वराकडेः तवं सारस्वति भटीं गोसावीयांतें देखिलेंः आणि आड पालौ करौनि गेले तवं बाइसी देखिलें आणि म्हणीतलेंः “हां बाबाः हा ब्राह्मणुः मागां बाबाचेया दरीसनासि ए: दंडवत करीः श्रीचरणां लागेः आतां बाबातें देखौनि आड पालट करूनि’ गेलाः हे काइ बाबा?” सर्वतें म्हणीतलेंः “तें याकारणे: म्हेळीचेयापस्य सीक्षाचा अभिमानु थोरूः” मग यावरि पंचकौळ आचार्याची गोष्टि सांघीतली _ “पंचकौळ आचार्या एकुः तो पांचे कुळी आचार्याः तेयाचा सीक्ष तो एकें आचारीएं’ चाळविलाः तेणें अभिमानें तेयांसि तेणें वीखप्रळयो केलाः तेया पापास्तव ग्रहो जालाः जाउनि वेव्हारेया एकाचा पत्रः तेयाचा आंगीं संचरलाः अवधेयां ग्रहोंचा मुक्ष नाएकुः तो खांबी सांकळी आळिला असेः गांवोगांविचे गुणीए: जाणे : मंत्रवादी जे एतिः तो तेयांतें म्हणेः ‘एणें मंत्रे या झाडनीयां तुं मातें धाडिसीः एणे मंत्रः या झाडनीयां मी जाइनः एणें वोखदें मातें धाडिसी’:’ आणि तो हात झाहुनि जाए: ऐसा तो काइसेनि कोण्हाचेनीही न वचेंः मग एक दीसु गोसावीं पाणीपात्रासि बीजें केलेंः पाणीपात्र जालेंः मां तेयांचेया दाराआड पहीवा होताः तो ठाओवरि गोसावीं बीजें केलेंः पन्हीवा वोलांडीतचि नोलांडीतीचिः तो खांबी आळिला होताः तेणें यातें देखिलेंः आणि म्हणीतलेंः ” आगाः मातें सोडा का गाः मां मी पैला गोसावीयांपाठी जाइनः” तेही म्हणीतलेंः “आरे हा कहीं बोले नाः तो आतां बोलतु असेः तरि यातें सोडा ना काः हा मातें सोडा ऐसें कहींचि न म्हणेः” मग तीही सोडिलाः आणि तैसाचि गोसावीयांसरिसा नीगालाः सर्वे त्याचे बापभाउः चुलतेः माणुसांची मांदीः पुढे पुढे गोसावी जातिः गोसावीयांमागें तो जाए: तेयामागें तेयाचा बापः भाउः चुलतेः तेयामागें गांविची हाउळिः ऐसें गोसावीं नइसि-बीजें केलेंः सीळेवरि. श्रीचरणोदक घातलेंः मग श्रीकरिचे पाणीपात्र घातलें: गोसावीयांसि आसन जालेंः आरोगण करितातिः तवं ते आलेः गोसावीयांतें तेणें उचीष्ट प्रसादु मागीतलाः “जी जीः मज ताटप्रसादु देयावा जीः” सर्वज्ञ म्हणीतलें। “तु कवणु?” “जी जीः तें गोसावी जाणत असति की: ” सर्वों म्हणीतलें। “एथौनि जाणीजत असिजे पाः तें तैसेंचिः परि एही अवर्घा जाणावें कीः” म्हणौनि ऐसा श्रीकरू तेयांकडे दाविलाः मग तेणे अवघे गोसावीयांपुढे सांघीतलेः “जी जीः मी पंचकुळ आचार्या जीः माझे सीक्ष आणिका आचार्यापासि गेले जीः तेयांसि मीयां अभिमानें वीखप्रळयो केलाः तेया पापास्तव भी ग्रहो जाला जीः अवधेयां ग्रहोचा भुक्ष नाएकुः तो मी या वेव्हारेयाचेया पुत्रासि लागलाः गांवोगांविचे गुणिए: जाणेः जोइसीः मंत्रवादीः माने फेडावया एतिः तेयांतेंमीं म्हणे: ‘एणें मंत्रे तु मातें फेडिसी’: तें मी आधींचि म्हणौनि जाएः एतुकेनि ते हात झाडुनि जाति जीः गोसावी जरि मज प्रसादु देती तरि’ मी या ग्रहत्वापासौनि मुंचैन जीः आणि हा प्राणीया या दुखापासौनि मुंचैल जीः” सर्वतें म्हणीतलेः “तो एथिचीए दृष्टीसमोर न राहे की ” ना जीः मी असकेयां ग्रहेयांसि मुक्ष नाएकु जीः” मग गोसावीं वीनवणी स्वीकरिलीः गोसावीयांसि आरोगण जालीः गोसावी तेथौनि उठीलेः परतें सरौनि गुरूळा केलाः उदक स्वीकरिलेंः उदकासि वीनयोगु केला आणि तेणें बुंडिं सीतें उरली होती तो एउनि ताटप्रसादु घेतलाः सर्वतें म्हणीतलेंः “एयातें धरा गाः एव्हवीं आता हा पडैल” “ना जीः जैसा आला तैसा जाइलः” सर्वशैं म्हणीतलेः “तें आतां याचां ठाई नाहीं कीः” कींकळी देउनि मुर्छत पडिलेः इतुकेनि पडतपडतां तेही उचलुनि घरासि नेलाः मग तीही गोसावीयांसि आवारासि नेलें: मर्दना जालीः मार्ज- जालें पुजा केलीः आरोगण जालीः मग गोसावीं बीजें केलें :।।:
  • Purvardha Charitra Lila – 64
  • Raher : वामनपेंदी मृत्यभार्या जिववणे :।।:  
  • रारीं वामनपेंदी नांव ब्राम्हणुः गोसावी तयाचेया आवारासि पाणिपात्रसि बिजें केलेः तेहीं ब्राम्हणें देखिलें: आसनीं बैसवुनी नमस्कारू केलाः स्त्रीएतें बोलाउनी नमस्कारू करवूनि बरवें पाणिपात्र घालविलेः तेणें विनविलें: ‘‘जी जीः मास एक माझा घरी माझीयें ब्राम्हणीचेंनि हातें पाणिपात्र स्वीकरावें:’’ ऐसें त्यें दंपत्यी पाणिपात्रची आरोगणेची तत्परतां बहुत करीतिः तयाचि भार्या एल्हाइसें तें गोसावियांसि पाणिपात्र करितां निच बरवे पाणिपात्र देः ऐसां एकु दीं तें एल्हाइसें निवर्तलीः तें स्मशाना नेता वामनपेंधी रडों लागलेः ‘‘आहा आता काइं करीन? गोसावियांसि पाणिपात्र कोण देइल?’’ म्हणौनि दुःख करीः दुर्बळा ब्राम्हणः पसया पाइलीची लेंकुरवेः परि तयाचे तथा घरभंगाचे तेयासि काही न वटेः मां तो गोसावियांचीया पाणिपात्रासीचि रडेः दुःख करीः मग तें स्मशाना आणिली होतीः सरणावरि घातलीं: तियेची प्रांतीं गोसावियांसि पींपळातळी आसन असेः वामनपेंदी धार देयावेया गंगे घागरी भरूं आलेः तवं गोसावियांतें देखिलें: तें जवळी आलेः श्रीचरणां लागलें: पुढां बैसौनि दुःख करूं लागलेः गोसावी श्रीमुकुटें पुसिलें: वामनपेंदी म्हणितलें: ‘‘जी जीः ब्राम्हणी सरली जीः गोसावियांची देवकी दासी एल्हो निमाली जीः सर्पद्रष्ट जाली जीः गोसावियांसि पाणिपात्र दे जीः जीजी आतां गोसावियांसि पाणिपात्र कोण देइलः आहाः आतां काइं करीन?’’ ऐसां ऐसां शब्दीं दुख करीः तळमळीः गोसावी अनुकंपा स्वीकरिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटों: चालाः तुमची ब्राम्हणी एथौनि पडिताळीजैलः’’ मग तेही म्हणितलें: ‘‘जी तेथ गोसावियां काइसेया नेओ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि तुमची ब्राम्हणी जीवउं:’’ तेही म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘भटोः चालाः’’ गोसावी तयांचा हातु श्रीकरें धरूनि तियेजवळी बिजें केलें: तेथ उकड आसन जालें: श्रीकरें स्पर्शिलें: आणि तियेतें म्हणितलें: ‘‘बाइः उठाः तुम्हासि एथ एक पाणिपात्र देणें असेः यांसि एक पाणिपात्र देयाः’’ आणि तें बाइ शब्दासरिसीं जियालीः सरणावरूनि खडबडौनि उठिलीः लोका थोर आश्चर्य जालें: मग अवघीं आपुलालेया घरासि गेलीं: तियें गंगे स्नानवीधि सारूनि आपुलेया घरासि गेलीं: मग पाणिपात्रची आइती केलीः ब्राम्हणें गोसावियांसि विनविलें: ‘‘जी जीः गोसावी तेथ पाणिपात्र बिजें करावेः’’ गोसावी तयाचेया घरासि पाणिपात्र बिजें केलें: तवं तिया बाइया पाणिपात्र आणिलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः पाणिपात्र द्यालः तरि तें असेः’’ मग तियें भियालीः उगीची राहिलीं: घरांतु गेलीः मग वामनपेंदी हातीं ताट दिधलें: तेही गोसावियांसि पाणिपात्र दिधलें: मग तेथौनि गंगेसि बिजें केलें :।। (टिप: स्वामि पहिल्यांदा एकांकात आले होते. यावेळीही एकांकातच राहेरला स्वामि दुसर्यांतदा आले.)
  • Purvardha Charitra Lila – 63
  • Raher : ठाकुरभारीये पुत्रदान :।।: राहेर 
  • गोसावीयांसि वृक्षा एका तळिं आसन असे तवं तेथ ठाकुरू एकु भेटलाः तेणें वीळिचां गोसावीयांतें वीनवीलेंः “जी जीः माझेया आवारासि गोसावीं बीजें करावें. जी” गोसावीं वीनवणी स्वीकरिलीः मग गोसावीं तेथ बीजें केलें गोसावीयांसि आसन घातलेंः गोसावी आसनी उपवीष्ट जालेः श्रीचरण प्रक्षाळिलेः मग गोसावीयांसि मादनेयालागि वीनवीलेंः गोसावीयांसि पडदणी ओळगविलीः मग मर्दनामादर्ने जालें पुजाअवस्वरु जालाः ताट केलेंः मग गोसावीयांसि आरोगण जालीः गुळुळा जालाः वीडा ओळगविलाः मग सेजारी माचेयावरि सुपवती घातलीः तेथ पहुडु स्वीकरिलाः मग तेणें ठाकुरें आपुली वडील राणी स्त्रींधारू करुनि पाठवीलीः पुरुखांचे अमोघ वीर्ये म्हणौनिः श्रीचरण प्रक्षाळण केलें मग फोडी ओळगविलीयाः वीडीया करुनि दीधलीयाः मग श्रीचरण चुरूं लागलीं: ऐसी नावेक सेवा केलीः मग तिया म्हणीतलें: “जी जी: मज पुत्र होआवा जीः” सर्वशं म्हणीतलें: “एथ प्रवृति नाही. मग सर्वशं म्हणीतलेंः “बाइ आतां जाः” तैसीचि तीयां पाठवणी दीधलीः तीएं आलीं: मग अवधी व्येवस्ता तेयापुढां सांघीतलीः मग तेणें म्हणीतलेंः “एं म्हातारीः गोसावीयांसि न मनतीचिः” मग तेणें आपुली धाकुटी राणी पाठवीलीः “तुं जाएः” भग तीएं आली तेयांसि गोसावी भीतरि एओं नेदीतिचिः तीएचा एकुपाओ भीतरिः एक पाओ उंबरेयाबाहीरिः गोसावीं तेयां बाहीरुनिचि पाठवणी दीधलीः गोसावीं म्हणीतलेंः “बाइ जाः एथ ‘काही करणे न लगेः” मग तीएं आली मग तीया अवधी व्येवस्ता सांघीतलीः मगआपण आलाः गोसावीयांसि दंडवत घातलेंः श्रीचरणां लागलाः मग गोसावीयांतें वीनवीलें: “जी जीः गोसावीं कां न स्वीकरितीचि? मी नीपुत्रीकूः मातें पुत्रु नाही म्हणौनि पाठवीलीयाः गोसावीं मज पुत्रदान देयावें जीः” सर्वझें म्हणीतलेंः “तुम्हांसि पुत् होइल होः” तेणेंचि दीसें मासें तेयांचीए वडीली अस्त्रीएसि पुत्रु जालाः गर्भसंभूति होतीए समई गोसावीं बीजें केलेंः।।
  • Purvardha Charitra Lila – 62
  • Raher : लांसिपिली खेळवणें :।।: व्याघ्रपिली खेळवणें :।।:  
  • गोसावियांसि राएरीं अवस्थानः एक दिसु रानी जाळी एकी गोसावी बिजें केलें: तवं तेथ लाहांसि व्याली होतीः पीलीं ठेउनि पारधी गेली होतीः तियें दोनि पीलीं गोसावी खेळविलीं: दोन्हीं दोहीं काखेतळी धरिलीं: ऐसीं क्षण एकु खेळवीतातीः तवं लाहांसि आलीः खेळवितां देखिलें: आणि तें गोसावियांकडें डोळे रोहकीः घुरघुरीः गोसावी अवलोकिलीः आणि तियेचा रोखु निवर्तलाः मग तें जाळीचां तोंडी शुनयांचीया परि पाय मोडुनी मोळी टेंकुनी बैसलीः जीभवरि आपुलीं आवाळे वोठ चाटो लागलीः गोसावी नावेकु खेळविलीः स्तीति संक्रमिलीः वडवे धरूनि एरी कडेचीं एरीकडें घातलीं: मग तियेचीं तियें कडें घातलीं: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘घेया बाइः सांभाळा आपुलीं पीलीः’’ आणि तिये गोसावियांकडें येति परि तिकडें न वचेतिः मग गोसावी बिजें केलें: जवं गोसावियांसि देखे तवं पाहातचि होती :।।: (हें गोष्टि गोसावी सावळदेवां येतां व्याघ्रदरीसनीं बाइसांप्रति सांघितलीः।।:)

Raher Sthan Darshan by Sarang Dhar || Jay Krishni Mahanubhav ||



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: